- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Manipur Violence : मणिपुरातील सरकार बरखास्त करा, विरोधकांशी चर्चा करा; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut on Manipur Violence : मणिपूर पेटलेलच आहे. तीन महिन्यात मणिपूर कधीच शांत झालं नाही. मणिपुरात आजही हिंसा, जाळपोळ, महिलांवरील अत्याचाराच्या घटना सुरुच आहेत. केंद्र सरकार आणि तेथील राज्यपाल दंगली नियंत्रणात आणण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. त्यामुळे संसदेतही मणिपूरवर चर्चा होऊ दिली जात नाही. मणिपूरवर पंतप्रधानांच्या उपस्थितीत चर्चा व्हावी त्यावर पंतप्रधानांनी उत्तर द्यावे ही […]
-
पाकिस्तानचा रडीचा डाव सुरूच, भारतात येण्यापूर्वी ICC कडून मागितली सुरक्षेची हमी
World Cup 2023 : आगामी काळात विश्वचषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या सर्व सामन्यांमध्ये भारत- पाकिस्तानचा सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या असतात. मात्र, ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच पाकिस्तान संघाकडून रडीचा डाव सुरू झाला असून, स्पर्धेसाठी भारतात दाखल होण्यापूर्वीच पाकिस्तानी संघाकडून आयसीसीकडे सुरक्षेची हमी मागण्यात आली आहे. पाकिस्तानमधील सुरक्षेची स्थिती बघता आयसीसीकडे अशा प्रकारे हमी मागणे हास्यास्पद […]
-
निवडणुकांसाठी आम्ही सुद्धा तयारच पण…; लांबलेल्या निवडणुकांवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis on Mumbai Municipal Election : विरोधकांकडून निवडणूक घेण्याचे आव्हान देण्यात येत आहे. मात्र, निवडणूक घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेमध्ये दिली. आम्हालाही निवडणूक हवी आहे, आम्ही निवडणुकीसाठी तयार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी एक एक काय फोडता हिंमत […]
-
Devendra Fadanvis : आळंदीतील लाठीचार्जचे व्हिडीओ एडीट केलेले; फडणवीसांचे पलटवार करत गंभीर आरोप
Devendra Fadanvis : आळंदीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज केला गेला ही वस्तुस्थिती नाही. मात्र या प्रकरणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर एडीट करून टाकण्यात आले. कारण त्यानंतर पोलिसांनी तेथील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज रिलीज केलं. त्यात कोणावरही लाठीचार्ज झालेला नाही. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (Devendra Fadanvis on Aalandi baton charge on varkari Aashadi Wari by Police ) […]
-
Amit Shah in Pune: मोदींनंतर अमित शाह यांचाही पुणे दौरा… मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीही असणार उपस्थित
Amit Shah in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे शहराच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांना टिळक राष्ट्रीय पुरस्कार गौरवण्यात आले. तसेच त्यांनी दोन मेट्रो मार्गाचं लोकार्पण केलं. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या घरांचे हस्तांतरण आणि पायाभरणी आदींसह विविध कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आहे येत्या रविवारी […]
-
Ahmednagar BJP : बाहेरून आलेल्यांच्या पालख्या उचलणार नाही… शहराचा आमदार भाजपाचाच व्हावा
Ahmednagar BJP : राज्यात आगामी निवडणुका पाहता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. यातच आता आगामी विधानसभा पाहता नगर शहरातील इच्छुकांसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान नुकतेच भाजपने नव्याने काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या नगर शहराच्या अध्यक्षपदी अभय आगरकर यांची नियुक्ती झाली आहे. आगरकर यांच्या दांडग्या अनुभवामुळे भाजपाला नक्कीच चांगले दिवस […]
-
धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवार साहेबांचा विरोधच पण..; आव्हाडांनी फोडलं मोठं गुपित!
Jitendra Awhad on Dhananjay Munde : अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यानंतर पक्षात दोन गट निर्माण झाले.अजित पवार यांनी आ. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य नेत्यांना घेऊन सरकारला पाठिंबा दिला. आता हे नेते सरकारमध्ये मंत्री आहेत. मात्र, धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास शरद पवार यांनीच एकेकाळी विरोध […]
-
Ahmednagar News : अहमदनगरला येताय तर जाणून घ्या वाहतुक मार्गातील बदल…
अहमदनगर जिल्ह्यात सध्या अनेक विकासकामे सुरु आहेत. अनेक रस्त्यांचे, पुलांचे कामे प्रगतिपथावर आहेत. मात्र या कामांमध्ये वाहतुकीमुळे अडथळा निर्माण होत आहे. परिणामी कामांचा वेग मंदावत आहे. यावर उपाय म्हणून व विकासकामे तातडीने मार्गाने लागावी. यासाठी वाहतुकीच्या मार्गात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काही वाहतुकीच्या मार्गामध्ये काही […]
-
इम्रान खानला दणका! समर्थक 120 अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई; कारणही आले समोर
Pakistan News : सतत अशांत आणि धुमसणाऱ्या पाकिस्तानातून मोठी बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी मोठी कारवाई केली आहे. 9 मे रोजी पाकिस्ताच्या लष्करी छावण्यांवर हल्ला करत तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या लोकांवर कारवाई न करणाऱ्या 120 लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. लष्करी छावण्यांवर हल्ला करणारे लोक हे माजी पंतप्रधान इम्रान खान […]
-
‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारला रोखठोक सवाल
Dr. Pradeep Kurulkar : हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून पाकिस्तानी हेर महिलेला देशाच्या संरक्षणविषयक माहिती पुरविणाऱ्या डीआरडीओच्या संचालक प्रदीप कुरुलकरविरोधात देशद्रोहाचा खटला का लावण्यात येत नाही, असा सवाल काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. विधीमंडळ अधिवेशनातही काल त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा […]
-
रविकांत तुपकर खरंच नाराज आहेत? शेट्टी म्हणतात…
रविकांत तुपकर यांनी व्यक्त केलेल्या नाराजीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी खुलासा केला आहे. ते लेट्सअपसोबत बोलत होते.
-
टीम इंडिया फेल! पहिल्याच टी 20 सामन्यात विंडीज संघाने मिळवला दणदणीत विजय
IND vs WI : एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत जबरदस्त प्रदर्शन करत मालिका विजय साकारणाऱ्या टीम इंडियाची टी-20 मालिकेतील सुरुवात खराब राहिली. पहिल्याच सामन्यात विंडीज संघाकडून दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. वेस्टइंडिज संघाने विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. https://letsupp.com/sports/west-indies-caption-rovman-powell-story-how-he-faces-situation-in-his-life-74978.html या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्टइंडिज संघाने 150 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय […]
-
शरद पवार मोदींसह एकाच मंचावर का हजर होते? जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं नेमकं कारण
Jitendra Awhad : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक पुरस्कारासाठी पुण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी हजर राहू नये अशी विरोधकांनी विनंती केलेली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. पंतप्रधान मोदींबरोबर पवार व्यासपीठावर उपस्थित होते. या घडामोडीची राज्याच्या राजकारणात बरीच चर्चा झाली. विरोधी पक्ष नाराज असल्याचेही बोलले गेले. त्यानंतर आता […]
-
सरकारी पदभरतीत पेपर फुटीच्या बातम्या छापणाऱ्यांवर हक्कभंग आणू; फडणवीसांनी दिली तंबी
Monsoon Session : सरकारी पदभरतीचे कामकाज पूर्ण पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. सरकार ठरलेल्या मुदतीत रोजगार उपलब्ध करून देणारच आहे. यामध्ये कोणतीही गडबड नाही. मात्र असे असतानाही वृत्तपत्रात चुकीच्या बातम्या छापल्या जात आहेत. कोणतीही माहिती न घेता या बातम्या छापल्या जात आहेत. या प्रकाराची सगळी माहिती माझ्याकडे आहे. या ज्या बातम्या आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. […]
-
Gadar 2 song out : सनी देओल पुन्हा निघाला ‘गडी लेके’; गदरचं एव्हरग्रीन गाणं गदर 2 च्या प्रेक्षकांच्या भेटीला…
Gadar 2 song out : सनी देओल आणि अमिषा पटेल यांच्या ‘गदर 2’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या बहुप्रतिक्षित ‘गदर 2’ चा ट्रेलर मोठ्या धडाक्यात रिलीज झाला. सनी देओल, अमिषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा स्टारर चित्रपट ‘गदर 2’ ची घोषणा झाल्यापासून प्रेक्षाकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे. त्यात आता या चित्रपटातील एव्हरग्रीन असं […]
-
भारताच्या गोलंदाजांचं जोरदार कमबॅक; वेस्ट इंडिजकडून 150 धावांचं लक्ष्य
India vs West Indies 1st T20 Score Update : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-20 मध्ये काय कमाल करुन दाखवू शकतो याची प्रचिती आली आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचेही पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून […]
-
Pune News : सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला हिंदू देवतांवर बोलणं भोवलं! डेक्कन पोलिसांनी केलं अटक…
Pune News : हिंदु देवतांवर बोलणं सिम्बायोसिस कॉलेजच्या शिक्षकाला चांगलंच भोवलं आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. या शिक्षकावर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकवत असताना हिंदू-देवतांचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओच एका विद्यार्थ्याने शूट केला आहे. यासंदर्भातील व्हिडिओ समोर आल्यानंतर आरएसएस प्रणित अखिल […]
-
Aditya Thackery : राज्यात अकार्यक्षम बेकायदेशीर मुख्यमंत्री, ज्यांनी उद्योगधंदे राज्याबाहेर ढकलून दिले; आदित्या ठाकरेंचं टीकास्त्र
Aditya Thackery : राज्यात येणारे उद्योग राज्याबाहेर गेल्याने सध्या राज्य सरकारवर टीका होत आहे. त्यात आता ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे यांनी टीका देखील या मुद्द्यावरून चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायाला मिळालं. खोके सरकारच्या नाकर्तेपणाची आणि उद्योगजगताचा सध्याच्या सरकारवर अजिबात विश्वास नसण्याची साक्ष देणारी ‘श्वेतपत्रिका’ आज प्रकाशित झाली! असं आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackery Criticize Shinde Fadnavis […]
-
‘माझा जीव जाता जाता वाचला’, घातपाताच्या कटाबद्दल भाजपच्या बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
Sudhir Mungantiwar : गेल्या काही दिवसापासून अनेक राजकीय नेत्यांना धमक्या मिळाल्या आहेत. त्यानंतर एनआयए (NIA) आणि एटीएस (ATS) महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापे टाकून दहशतवाद्यांना अटक केली. ISIS शी संबंधित लोकांचा शोध घेतला जात आहे. एनआयए आणि एटीएसने अटक केलेल्या आरोपींकडून रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान, आरएसएस आणि भाजपच्या बड्या नेत्यांना टार्गेट केलं जाणार […]
-
सुवेंद्र गांधींना पकडून हजर करा; दिल्ली न्यायालयाचे आदेश
Ahmednagar News : भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुवेंद्र गांधी यांना एका खासगी प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने फरार घोषित केले आहे. सुवेंद्र गांधी यांना पकडून तीन दिवसांत न्यायालयात हजर करा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना दिल्लीतील गणपती ट्रेडर्सकडून 2011 साली सुवेंद्र गांधी यांनी 8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले […]
-
अनेकांनी देसाईंना ब्लॅकमेल केलं, आत्महत्येचं कनेक्शन ‘एमएमआरडीएशी’; आव्हाडांचा गौप्यस्फोट
Jitendra Awhad on Nitin Desai death : प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी काल कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. देसाई यांच्या आत्महत्येने चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. आर्थिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार […]
-
Delhi Ordinance Bill लोकसभेत मंजूर; विरोधकांचा सभात्याग, आपचा खासदार निलंबित
Parliament Monsoon Session: दिल्ली सेवा विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. आवाजी मतदानाने हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सभात्याग केला. तर आपचे खासदार सुशीलकुमार रिंकू यांनी सभागृहात चुकीचे वर्तन केले. रिंकू यांनी सत्ताधारी पक्षाच्या खासदारांवर कागद फाडून फेकला. त्यामुळे सभापती ओम बोर्ला यांनी रिंकू यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. (Delhi ordinance […]
-
LetsUpp Special : भारतीय नारी सब पे भारी! पुणे मेट्रोचे ‘सारथ्य’ सात तरुणींच्या हाती…
भारतात रेल्वे सुरु झाल्यानंतर रेल्वेचे सारथ्य पुरुषांच्याच हाती आपण पाहिलं पण पुण्यात सुरु झालेल्या मेट्रो ट्रेनचं सारथ्य सात तरुणींच्या हाती आहे. या सात तरुणींचं पायलटचं प्रशिक्षण पूर्ण झालं असून मेट्रो ट्रेन चालवित आहे. दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे वनाझ ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड […]
-
नॅचरली करप्ट पार्टी म्हणता मग सत्तेत का घेतले ? सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल
Supriya Sule on BJP : भाजपकडून (BJP) आमच्यावर टीका करताना घराणेशाहीचा मुद्दा नेहमीच पुढे केला जातो. मला ते मान्य आहे. कारण मी स्वतः घराणेशाहीचं प्रॉडक्ट आहे. मी प्रतिभा शरद पवार यांची कन्या असल्याचा मला अभिमान आहे. पण, एनडीएत (NDA) घराणेशाहीचं मेरीट सांगणारे नेते नाहीत का? राष्ट्रवादीला (NCP) नॅचरल करप्ट पार्टी म्हणता, मग महाराष्ट्रात राष्ट्रवादीला सत्तेत […]
-
हॉटेल व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या; सोलापुरातील धक्कादायक घटना
Solapur Hotel Owner Suicide : सोलापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाने रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. अजिंक्य जयवंत राऊत (वय 55 वर्षे ) असं या हॉटेल व्यावसायिकाचं नाव आहे. सोलापुरातील लेडी डफरिन (इंदिरा गांधी) चौक ते जुन्या एम्प्लॉयमेंट चौकाच्या दरम्यान हॉटेल ध्रुव हे राऊत यांचं हॉटेल आहे. त्यांच्या […]
-
आमचं तुमच्याकडे लक्ष आहे पण तुमचं आमच्याकडे लक्ष नाही; अजित पवारांच्या टोलेबाजीवर जयंत पाटील निशब्द
Mahrashtra Monsoon Session : अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी झाल्याने विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. आता अजित पवारांच्या जागेवर काँग्रेसचे विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते झाले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यावेळी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार राजकीय टोलेबाजी पाहिला मिळाली आहे. त्यात अजित पवार व […]
-
ठाण्यातील महाविद्यालयात NCC ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल
ठाणे : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात (Bandodkar and Joshi Bedekar College) एनसीसीच्या (NCC) द्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. तालिबांनी पध्दतीने शिक्षा देण्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी पावसाच्या पाण्यात जमिनीवर डोके ठेवून उभे असल्याचे […]
-
मेटाकडून नवीन AI टूल लॉंच, लिहिलेल्या मजकूराचं आवाजात रुपांतर होणार
सोशल मीडिया फर्म Facebook आणि Instagram ची मूळ कंपनी Meta ने आपले नवीन AI टूल AudioCraft सादर केले आहे. हे टूल ओपन सोर्स एआय टूल म्हणून सादर करण्यात आले आहे. या टूलच्या मदतीने लिहिलेल्या मजकूराचे आवाजात रुपांतर होणार आहे. तसेच ऑडिओ आणि संगीत तयार करता येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. नितीन देसाईंना ‘ते’ सहन […]
-
दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा झुल्फिकार बडोदावाला 11 ऑगस्टपर्यंत ATS कोठडीत
पुणे : काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना (Pune Police) रात्री गस्तीवर असताना मोस्ट वॉन्टेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) हाती लागले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असून हे दहशतवादी आता दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहे. दरम्यान, त्यानंतर झुल्फिकार बडोदावाला (Zulfikar Barodawala) यालाही अटक करण्यात आली असून तो दहशतवाद्यांनी पैसे पुरवत असल्याचं तपासात निष्पन्न झालं. (Zulfiqar Badodawala […]
-
बिलाला विरोध केला तरीही ‘आप’ तुम्हाला.., केंद्रीय मंत्री अमित शाहांचा काँग्रेसला सल्ला
दिल्लीत केंद्र सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात अध्यादेश आणला जात आहे. त्यावरुन आम आदमी पक्ष आणि भाजपचे खासदार समोरा-समोर उभे ठाकले आहेत. या अध्यादेशाचं भाजपकडून समर्थन तर आम आदमी पक्षाकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. त्यावरुनच आता काँग्रेस नेते अधीर चौधरी यांनीही या वादात उडी घेत टीप्पणी केली आहे. त्यावरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसला खोचक […]
-
संग्राम थोपटेंचं विधानसभा अध्यक्षपद कोणी अडवलं होतं? काँग्रेसच्या बाकावरुन थेट अजितदादांकडे बोट
मुंबई : महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांची विधानसभा अध्यक्षपदी वर्णी लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोडा घातला होता का? असा सवाल आता विचारला जात आहे. याचं कारण ठरलं ते आज (3 ऑगस्ट) सभागृहात घडलेला एक प्रसंग. विधानसभेतील या प्रसंगाच्या निमित्ताने संग्राम थोपटे यांच्या हुकलेल्या विधानसभा अध्यक्षपदाच्या जखमेवरील खपलीही पुन्हा एकदा निघाली आहे. […]
-
बापलेकाच्या नात्याची तरल गोष्ट ‘बापल्योक’ चा टीझर रिलीज; ‘या’ दिवशी येणार चित्रपट
Nagraj Manjule Baplyok : दिग्दर्शक नागराज मंजुळेने (Nagraj Manjule) मनोरंजन क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक म्हणून ओळखले जात असतात. त्यांनी सतत त्यांच्या चित्रपटात गावाकडील कलाकृतींतून सिनेसृष्टीत एक मोठा ठसा उमटवला आहे. परंतु आता लवकरच नागराज मंजुळेंचा एक नवा चित्रपट (New Movie) चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ‘बापल्योक’ (Baplyok Marathi Movie) असे या मराठी चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा […]
-
सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना जारी
Pune : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन विभाग या दोन विभागांतर्गत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता आदी योजना 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्याकरिता केंद्र शासनाने सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या […]
-
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
Free treatment in Public hospitals : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) सर्व रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्याची मागणी होत होती. दरम्यान, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आलं आहे. आज राज्य सरकाराने याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये […]
-
‘त्या’ अधिकाऱ्यावर देशद्रोहाचा खटला का नाही चालवत? जयंत पाटलांचा खडा सवाल…
डीआरडीओचे अधिकारी प्रदीप कुरुलकरांचा खटला देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत का चालवला नाही? असा खडा सवाल आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत केला आहे. सध्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तरांच्या तासात धारेवर धरलं जात आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणात अडकलेले प्रदीप कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाऐवजी ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट अंतर्गत खटला सुरु आहे. त्यावरुन जयंत पाटील […]
-
Video : राजू शेट्टींनी माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत! तुपकरांचा नेतृत्वाला थेट इशारा
बुलढाणा : नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटत असतील तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. त्यामुळे नेतृत्वाने माझे पंख छाटण्याचे प्रयत्न करु नयेत, असा थेट इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांनी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना दिला आहे. लेट्सअप मराठीशी त्यांनी विशेष संवाद साधला. त्यावेळी ते बोलत […]
-
‘शिंदे, मी, अजितदादा, भुजबळ अन् विखे पाटील…’; पाच नेत्यांचा संदर्भ देत फडणवीसांच्या वडेट्टीवारांना शुभेच्छा!
मुंबई : महाराष्ट्र विधानसभेला विरोधी पक्षाची उज्ज्वल परंपरा आहे. या परंपरेमध्ये शिंदे साहेब, मी, अजित दादा, भुजबळ साहेब, विखे पाटील साहेब जे सगळे एकत्रितपणे पहिल्या रांगेत बसलेले आहेत, आपणही त्याच रांगेत अर्थात उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये बसावं, आपलं देखील नाव यावं असं म्हणतं असं म्हणतं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनियुक्त विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार […]
-
‘महाविजय २०२४’ ची जबाबदारी मुरलीधर मोहोळ यांच्या खांद्यावर!
पुणे : भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol यांच्यावर पार्टीकडून नव्या संघटनात्मक जबाबदाऱ्या सोपविल्या असून ‘महाविजय २०२४’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे ‘पुणे लोकसभा समन्वयक’ आणि ‘हर घर तिरंगा अभियाना’ची जबाबदारीही देण्यात आली आहे. या नवीन जबाबदाऱ्यांचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी मोहोळ यांना मुंबई प्रदेश कार्यालयात सोपविले. (Muralidhar Mohol also […]
-
Nitin Desai Death : देसाईंनंतर…महानोर…असा कसा नियतीचा खेळ…! सोनालाची भावूक पोस्ट
Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आज प्रसिद्ध निसर्गकवी ना. धों. महानोर यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. त्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने एक […]
-
मधकेंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज करा; ग्रामोद्योग मंडळाचं आवाहन
Pune : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधकेंद्र योजना (मधमाशापालन) संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभांसाठी जिल्ह्यातील व्यक्ती व संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. या योजनेमध्ये मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान मिळणार असून 50 टक्के स्वगुंतवणूक करणे आवश्यक आहे. शासनाच्या हमी भावाने मधखरेदी / […]
-
Hariyana Violence : ‘जमावाने दिल्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा’, एफआयआर दाखल…
Hariyana Violence : हरियाणामधील नूहमध्ये घडलेल्या हिंसाचारात 800 जणांच्या जमावाने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्याची माहिती एफआयआरमध्ये देण्यात आली आहे. नूहमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून काढण्यात आलेल्या जलाभिषेक मिरवणुकीमध्ये दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीनंतर मोठा हिंसाचार घडला होता. त्यानंतर आता पोलिस ठाण्यात एफआयआर नोंद करण्यात आली आहे. मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी […]
-
सत्यजीत तांबेंना न्याय दिला… देवेंद्र फडणवीसांची नजर आता संग्राम थोपटेंवर!
मुंबई : “शेवटी ज्याला कुठे न्याय मिळत नाही त्याला आम्हाला न्याय द्यावा लागतो. आता तुम्ही ठरवा न्याय देणार आहात का?” अशी टोलेबाजी करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाला आणि भोरचे आमदार संग्राम थोपटे यांना चिमटे काढले. विधानसभा विरोधी पक्ष नेतेपदी आमदार विजय वडेट्टीवर यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर भाषणात फडणवीस बोलत होते. दरम्यान, […]
-
सीमा हैदर आठवले गटात प्रवेश करणार? चर्चांमध्ये पक्षाकडून स्पष्टीकरण
Seema Haider Join RPI Party : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरबाबत अनेक प्रकारच्या बातम्या ट्रेंड होत आहेत. काही दिवसांपूर्वी सीमाला भारतीय सिनेमांमध्ये काम करण्याची ऑफर असल्याची बातमी समोर आली आणि त्यानंतर आता सीमा हैदर भारतीय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाकडून (RPI) ऑफर देण्यात […]
-
शेअर बाजारात तिसऱ्या दिवशीही मोठी घसरण, गुंतवणूकदारांना तब्बल एक लाख कोटींचा फटका
मुंबई : भारतीय शेअर बाजार (गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली. आज सेन्सेक्स 542 अंकांनी घसरला. तर निफ्टी 19,400 च्या खाली आली. तथापि, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला काही प्रमाणात आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी क्षेत्र वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक घसरले. जागतिक बाजारातील संकेतामुळं रियल्टी, बँकिंग आणि मेटल यांच्या शेअरमध्ये […]
-
OMG 2 Trailer : ‘त्या’ प्रकरणात पंकज त्रिपाठीच्या मदतीला धावणार अक्षय; ‘ओह माय गॉड 2’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
OMG 2 Trailer Out : 2012 मध्ये आलेल्या अक्षय कुमार आणि परेश रावल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ओह माय गॉड’ हा चित्रपट अत्यंत गाजला होता. या यशस्वी चित्रपटाच्या 11 वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतच या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. ‘ओह माय गॉड’ मध्ये अक्षयने भगवान श्रीकृष्णाच्या भूमिकेत दिसला […]
-
चीनमध्ये फक्त दोनच तास फोन वापरण्याची परवानगी? कायदाच पारित होणार…
चीनमध्ये 18 वर्षाखालील मुलांसाठी फोन वापरण्याची मर्यादा निश्चित करावी, अशी शिफारस चीनच्या सायबर नियामक संस्थेने शिफारस केली आहे. या संस्थेने 18 वर्षांखालील मुलांसाठी फक्त दोन तास फोन वापरण्याची सूचना केली आहे. या नियम लागू केल्यास मुलांचं आरोग्य निरोगी राहणा असून अपव्यव टाळता येणार असल्याचंही संस्थेने म्हटलं आहे. या निर्णयामुळे इंटरनेट आणि टेक कंपन्यांसाठी तोट्याचा ठरणार […]
-
मी भुजबळांच्या तालमीतला पैलवान, विरोधी पक्षनेते होताच वडेड्डीवार म्हणाले…
Assembly Session : मी छगन भुजबळांच्या तालमीत तयार झालेला पैलवान आहे, सत्ताधाऱ्यांकडं 200 आमदार असताना मला ही संधी मिळाल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेड्डीवारांनी छाती ठोकून सांगितलं आहे. राजकारणातल्या राजकीय उलथापालथनंतर अधिवेशनात आज विजय वडेड्डीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर वडेट्टीवार विधासभेत बोलत होते. Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र […]
-
Ahmednagar : गावच्या कारभाऱ्यांनो तयारीला लागा! ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल लवकरच…
अहमदनगर – मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील 188 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना (Ward composition) मार्च महिन्यांत जाहीर करण्यात आली होती. आता प्रभाग रचनेनुसार मतदार यादी 10 ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यावर 10 ते 21 ऑगस्ट दरम्यान हरकती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर या 188 ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी 25 ऑगस्ट रोजी जारी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. […]
-
Nitin Desai Death : देसाईंचा एन. डी स्टुडिओ महाराष्ट्र सरकार घेणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आश्वासन
Nitin Desai Death : नितीन चंद्रकांत देसाई मृत्यूप्रकरणात एआरसीचा म्हणजे ज्या कंपनीने त्यांना कर्ज दिलं त्या अॅंगलने देखील चौकशी केली जाईल. तसेच या कंपनच्या माध्यामातून जाणीवपूर्वक त्यांचा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जात होता का? त्यांच्यावर जोर जबरदस्ती केली गेली का? कर्ज देताना त्यांची फसवणूक झाली का? हे देखील तपासले जाईल. तर देसाईंचा हा स्टुडिओ […]
-
तुमच्याकडे साधी ग्रामपंचायतही नाही, मागच्या दाराने आमदार झालात; महाजन-खडसे भिडले !
Mahrashtra Monsoon Session : मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात आता विस्तव जात नाही. जिल्ह्याचे राजकारणात दोघे एकमेंकाना पाण्यात पाहतात. त्यांचे राजकीय भांडणे थेट विधिमंडळातही गाजतात. आज विधानपरिषदेत दोन्ही नेते एकमेंकावर तुटून पडले. दोघांनी एकमेंकाची थेट लायकीच काढली. दोघांमधील भांडणे विकोपाला गेली. दोघांसमोर सभापतीही हतबल झालेल्या दिसल्या. शेवटी काँग्रेसचे भाई जगताप यांनी […]
-
‘मेक इन इंडिया’साठी केंद्राचं मोठं पाऊल, लॅपटॉप, टॅबलेटच्या आयातीला लावला ब्रेक…
केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅबलेट, ऑल-इन-वन पर्सनल कॉम्प्युटर, अल्ट्रा स्मॉल फॉर्म फॅक्टर (यूएसएफएफ) कॉम्प्युटर आणि सर्व्हरच्या आयातीवर ‘बंदी’ लावली आहे. आयात प्रतिबंध तात्काळ प्रभावाने लागू आहे. उत्पादनाची आयात निर्बंधांच्या श्रेणीमध्ये ठेवली म्हणजे त्यांच्या आयातीसाठी परवाना किंवा सरकारची परवानगी अनिवार्य असणार आहे. China : बिजींगमध्ये पावसाचा कहर; 20 जणांचा मृत्यू; मेट्रो-रेल्वे बंद, विमानांची 400 उड्डाणं रद्द परकीय […]
-
तुम्ही लढा, चांगल्या दिवसांत आम्ही.., दादांकडून वडेट्टीवारांचं अभिनंदन पण थोरात-चव्हाणांना टोले
Ajit Pawar : अजित पवारांसह (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या सुमारे ४० आमदारांनी राष्ट्रवादीत बंड करून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. त्यापूर्वी अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते. मात्र, आता ते सत्तेत सहभागी झाल्यानं विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. दरम्यान, या जागेवर आता मविआच्या वतीने कॉंग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांची नियुक्ती करण्यात आली. […]
-
Assembly Session : आता चिमटे काढण्याच्या भानगडीत पडू नका, विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होताच वडेट्टीवारांनी भरला दम
Assembly Session : राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे असणार? आता पुढचा विरोधी पक्षनेता कोण? या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेता म्हणून घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अनेकांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला तर काहींनी चिमटे काढल्याचं दिसून आलं होतं. त्यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी […]
-
Monsoon Session : नंबर एक अन् नंबर दोनचा उपमुख्यमंत्री कोण? जयंत पाटलांची शिंदेंना गुगली!
Jayant Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. […]
-
Nitin Desai Death : देसाईंच्या आत्महत्येला कारणीभूत कोण? शेलार, लाड यांचे सभागृहात गौप्यस्फोट
Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना रसेश शहा नावाचे एक गृहस्थ आणि एडलवाईजची असेट रिक्रेशन या कंपनीने कर्ज दिले होते. त्यानंतर याच कर्जाच्या वसूलीची पद्धत आणि व्याजदर यामुळेच देसाई यांनी त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. असा थेट आरोप आमदार प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांनी केला. ( MLA Ashish Shelar […]
-
“मलाही त्या खुर्चीवर बसायचं होतं, पण…” : अखेर जयंतरावांच्या पोटातील गोष्ट ओठांवर आलीच!
मुंबई : मलाही विरोधी पक्ष नेतेपदाच्या खुर्चीवर बसायचे होते. पण छगन भुजबळ यांच्यामुळे बसता आले नाही. भुजबळ म्हणाले, जयंतराव तुम्ही पक्ष बघा, दादांना विरोधी पक्षनेते होऊ द्या आणि नंतर काय झालं ते सर्वांनी बघितलचं, असं म्हणतं अखेर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांच्या पोटातील गोष्ट ओठावर आणली आहे. विजय वडेट्टीवर यांची विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती […]
-
विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या […]
-
माझी जबाबदारी बदलणार नाही; शिंदेंना कव्हर करत फडणवीसांनी क्लिअर केला सस्पेन्स
Devendra Fadanvis On CM Change Rumors : राष्ट्रवादीतील बंडानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्री पदावर अजितदादांची वर्णी लागणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी असे कोणतेही बदल होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही या चर्चा काही केल्या थांबतांना दिसत नाहीये. त्यात आता फडणवीसांनी आपली जबाबदारी बदलणार नसल्याचे सांगत […]
-
‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना
मुंबई : विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवर (Vijay Vadettivar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वडेट्टीवार यांना त्यांच्या जागेवर स्थानापन्न केले. दरम्यान, वडेट्टीवार विरोधी पक्ष नेत्यांच्या जागेवर जात असतानाच “आता तिकडे जाऊ नका, परत […]
-
Nitin Desai Death : देसाईंच्या स्टुडिओबाबत राऊतांनी सरकारकडे केली ‘ही’ मागणी
Sanjay Raut News : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या एनडी स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार यांनी देसाई यांच्या स्टुडिओबाबत सरकारकडे मोठी मागणी केली आहे. नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; […]
-
अजितदादांनी हाताला धरून खुर्चीत बसवलं, शिंदेंच्या कोट्यांनी सभागृह हसलं; वडेट्टीवारांचं सत्ताधाऱ्यांकडून हटके अभिनंदन
Leader of Opposition : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. […]
-
शिंदेंची अनुपस्थिती अन् अजितदादा थेट मुख्यमंत्र्यांच्या जागेवर; खुद्द नार्वेकरांनीच हाताला धरुन बसवलं खुर्चीत
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार (Ajit Pawar) येणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु आहेत. त्याबाबत स्वतः शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा खुलासा करुन या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. मात्र या ना त्या कारणामुळे या चर्चा सातत्याने डोकं वर काढतात. आता पुन्हा एकदा या चर्चांना सुरुवात होण्याचे कारण म्हणजे […]
-
Tesla Office In Pune : ठरलं! एलॉन मस्कही पुणेकर होणार; भारतातील पहिलं ऑफिस विमान नगरमध्ये थाटणार
Tesla Office In Pune : पुण्यात पिकतं ते जगभर खपतं असे म्हटले जाते. पुण्यातल्या प्रत्येक गोष्टीची सर्वदूर चर्चा केली जाते. नुकत्याच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यादरम्यान संपूर्ण देशाच्या नजरा पुण्यावर खिळल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुणे शहर चर्चेत आले आहे. यावेळी कारण ठरले आहे ते ट्विटरचा मालक एलॉन मस्क. गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला कंपनी भारतात […]
-
नितीन देसाईंना ‘ते’ सहन झालं नाही; देसाईंच्या आत्महत्येवरून राऊतांचा भाजपवर संताप
Sanjay Raut on Nitin Desai Death : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ […]
-
N D Mahanor : ‘अखेर पावसाळ्यातच हा वृक्ष उन्मळून पडला’… महानोरांच्या निधनाने शरद पवार भावूक
ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महानोर यांच्या निधनाने व्यथित झाले आहेत. त्यांनी अत्यंत […]
-
लालबागच्या राजाला माझा अखेरचा सलाम…; नितीन देसाईंनी रेकॉर्ड केलेल्या क्लीपमध्ये नेमकं काय?
Nitin Desai Audio Clips : सुप्रिसद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी बुधवारी कर्जत येथील एन.डी. स्टुडीओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या अकाली एक्झिटने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह राजकीय क्षेत्रालाही मोठा धक्का बसला आहे. देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी काही ऑडिओ क्लीप्स रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. ज्यात त्यांनी काही व्यावसायिकांची नावे घेतली आहे. या सर्व क्लिप्स पोलिसांनी […]
-
मंत्र्याचं नाव छापलं नाही, आमंत्रणही दिलं नाही दोन अधिकाऱ्यांना मिळाली ‘जबर’ शिक्षा
Karnataka News : काँग्रेसशासित कर्नाटकातून मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत छापले नाही. तसेच त्यांना पंचायत इमारतीच्या उद्घाटनालाही बोलावले नाही म्हणून दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मूडबिद्री तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी दयावती आणि इरुवेल ग्रामपंचायत विकास अधिकारी कांथाप्पा यांना निलंबित केले आहे. इरुवेल […]
-
महानोरांच्या निधनाने ग्रामीण साहित्याचा आवाज हरपला; राजकीय नेत्यांकडून हळहळ!
N D Mahanor Passed Away : ज्येष्ठ कवी साहित्यिक ना. धों. महानोर यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील रूबी हॉल क्लिनीक येथे उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. राजकीय क्षेत्रातील नेत्यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली. माझे जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचा रानकवी ना. […]
-
IPS अधिकाऱ्याची अवघ्या 3 तासांत बदली; तुकाराम मुंढेंचाही मोडला रेकॉर्ड
IPS अधिकारी प्रभाकर चौधरी यांची आतापर्यंत आठ वर्षात 18 वेळा बदली झालीय तर तुकाराम मुंढे यांची 18 वर्षांत 22 वेळा बदली झालीय. मुंढेंचा रेकार्ड मोडणारे आणि योगी सरकारला नकोसे झालेले प्रभाकर चौधरी नेमके कोण आहेत? या व्हिडिओमधून पाहूया…
-
मोठी बातमी! ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
N D Mahanor Passes Away : प्रसिद्ध निसर्गकवी ना. धो. महानोर यांचं निधन झालं आहे. पुणे शहरातील रूबी हॉल क्लिनिक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यू समयी त्यांचे वय 81 वर्षे होते. महानोर यांनी ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘रानातल्या कविता’ या गाण्यांमधून पळसखेडची लोकगीते प्रसिद्ध केली. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वात शोककळा पसरली आहे. महानोर यांच्यावर पुण्यातील […]
-
‘याच दबावाने, घिसाडघाईने 20 कामगारांचा बळी घेतला’; ‘समृद्धी’ अपघातांवर ठाकरे गटाचा घणाघात
Samruddhi Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका कायमच सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महामार्गावर ठाणे जिल्ह्यातील शहापूरजवळ भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत वीस जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरून आता ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. या मोठ्या दुर्घटनेन वीस गोरगरीब कुटुंबांचा संसार उघड्यावर पडला. या अपघाताच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, अशा घटनांवर […]
-
Nitin Desai Death : नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून मिळाले उत्तर
Nitin Desai Death : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल त्यांच्या स्टुडिओत गळफास घेत आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. देसाई यांची ही अकाली एक्झिट प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले? याची उत्तरे आता शोधली जात असून नवीन माहिती समोर आली आहे. पोलिसांनी काल नितीन देसाई […]
-
आज मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना बसणार पावसाचा तडाखा, ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Rain : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाने दाणादाण उडाली आहे. तर काही ठिकाणी अजूनही पावसाचे दर्शन झालेले नाही. सध्या होत असलेला पाऊस हा सर्वत्र नाही तर काही मोजक्याच ठिकाणी होत आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ अशा ठिकाणी तुफान पाऊस झाला आहे. तर राज्यात अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. आजही हवामान विभागाने मुसळधार पावसाची […]
-
फडणवीसांचा ‘गुरुजी’ शब्द खटकला; ठाकरे गटाच्या आमदाराने थेट केला ‘हा’ आरोप
Bhaskar Jadhav : शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलने केली. भिडे यांच्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल झाला. त्यानंतर काल विधीमंडळाच्या अधिवेशनातही या घटनेचे जोरदार पडसाद उमटले. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन केले. या निवेदनात […]
-
आधी आराम केला, मग काम असल्याचा बहाना सांगून…; नितीन देसाईंच्या मित्रानं सांगितली नेमकी घटना
Nitin Desai death : चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण कलाविश्वात खळबळ उडाली आहे. नितीन देसाई यांनी वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांच्या एनडी स्टुडिओत (ND Studio) आत्महत्या केली. ते आर्थिक विवंचनेत असल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोलल्या जात आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चाहते आणि मित्रांनी यावर शोक […]
-
मानहानी प्रकरणात राहुल गांधींचे सुप्रीम कोर्टात उत्तर; ‘मोदींनी माझे भाषण ऐकले नाही’
Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित मानहानी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी (4 ऑगस्ट) होणाऱ्या सुनावणीपूर्वी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. सत्र न्यायालयात अपील प्रलंबित असल्याचे त्यांनी बुधवारी (2 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती द्यावी. पूर्णेश मोदींनी त्यांचे भाषण थेट ऐकले नाही. माझी केस अपवाद म्हणून दिलासा […]
-
‘स्तनपानाचे संरक्षण’ ही सामूहिक बांधिलकी; रोटरी व विखे पाटील फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगच्या संयुक्त उपक्रम
अहमदनगरः १ ते ७ ऑगस्ट या काळात दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह अनेक देशांमध्ये साजरा होतो. याची मूळ संकल्पना व जागतिक समन्वय वाबा (WABA:World Alliance of Breastfeeding Action) या संस्थेची आहे. १९९२ मध्ये पहिला जागतिक स्तनपान सप्ताह साजरा झाला. प्रत्येक वर्षी नवीन घोषवाक्यासह हा दिवस साजरा होतो. या वर्षीचे घोषवाक्य ‘इनेबल ब्रेस्टफीडिंग- मेकिंग अ डिफ्रन्स फॉर […]
-
संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे(Sambhaji Bhide) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. माजी राज्यमंत्री सुबोध सावजी(Subodh Sawaji) यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान, “भिडेंना अटक करा अन्यथा मी त्यांचा मर्डर करणार” अशी धमकी सावजी यांनी दिली आहे. यासंदर्भात सावजी यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांना निवेदन दिलं आहे. नितीन […]
-
१८ वर्षांखालील मुलांनी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणे अनैतिक आणि बेकायदेशीर; उच्च न्यायालयाचा निर्णय
लिव्ह-इन रिलेशनशिपच्या (Live in relationship) मुद्द्यावरून अनेकदा प्रश्न उपस्थित होत असतात. अनेकांच्या मते हा मूलभूत हक्क आहे. मात्र, आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’बाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) एक मोठा निर्णय दिला. १८ वर्षांखालील मुले ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मध्ये राहू शकत नाहीत. १८ वर्षांखालील मुलांचं ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणं केवळ अनैतिकच नाही तर बेकायदेशीरही आहे, असं सांगत […]
-
भिडेंना गुरुजी म्हणण्यावरुन उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका; ‘…ही पद्धतच घातक’
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : फडणवीस जर भिडे यांना गुरुजी म्हणत असतील तर त्यांचं सगळंच बरोबर असं म्हटलं पाहिजे, अशी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. संभाजी भिडेंबाबत मी काय बोलणार? शासनकर्ते ते आहेत त्यांनी यावर बोललं पाहिजे. मी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया कशी काय देणार? राज्यकर्त्यांनी सांगितलं […]
-
संभाजी भिडेंना वक्तव्य भोवलं! आठ दिवसांत पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश…
Sambhaji Bhide contraversy : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं आहे. अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भिडेंना आठ दिवसांत हजर राहण्याबाबत नोटीस जारी करण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्यासह आयोजकांनाही नोटीस जारी करण्यात आली आहे. (sambhaji bhide ordered to appear before police within 8 days) रेल्वेतील गोळीबार धार्मिक हिंसेतून नाहीतर, […]
-
राज्यात कोरोनाची रिएंट्री! रुग्णांची संख्या शंभरीकडे, मुंबई-पुण्यात सर्वांधिक रुग्ण
Corona Updates : भारतात कोरोनाचा (Corona) धोका कमी झाल्यानंतर सर्वकाही सुरळती चाललं असतांना आता पुन्हा एकदा राज्यात रिएंट्री झाली आहे. गेल्या २४ तासात राज्यात नवे २४ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळं राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढतांना दिसते. याशिवाय, राज्यात H1N1, H2N2 चे रुग्ण आढळून आले आहेत. सध्या राज्यात ९६ कोरोनाचे रुग्ण आढळून […]
-
अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, पंतप्रधान मोदींना मागितला वेळ
Ayodhya Temple : अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. अयोध्येत त्या दिवशी एकच कार्यक्रम असावा आणि तोही अराजकीय असावा, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मत आहे. याशिवाय त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही. या […]
-
Mumbai Jaipur Express Firing : आरपीएफ जवान चेतन सिंग मानसिकदृष्ट्या अस्वस्थ? रेल्वेने उत्तर दिले
जयपूर-मुंबई ट्रेन गोळीबारातील आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंग याच्याबाबत नवा खुलासा झाला. रेल्वेने सांगितले की, आरोपीच्या नियमित वैद्यकीय तपासणीत कोणताही गंभीर मनोविकार (मानसिक आजार) आढळला नाही. चार जणांच्या हत्येचा आरोपी चेतन सिंग हा मानसिक आजारी असल्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यावर, रेल्वेने सांगितले की, त्यांनी खाजगी स्तरावर तपास केला, जो त्यांनी गुप्त ठेवला. […]
-
भरतीमधील तोतयागिरीला आता बसणार चाप ! वनविभागाची भरती संगणकीकृत, मानवी हस्तक्षेपच नाही
मुंबई : वन विभागाच्यावतीने नुकतीच वन संरक्षक (Forest guard) पदांची परीक्षा घेण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर हा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांना या परीक्षेचे उत्तर सांगू, असं आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना घडली. याशिवाय, नोकरीला लावून देण्याचं आमिष दाखवूनही फसवणूक केली जाते. दरम्यान, आता वन विभागाच्यावतीने (Forest Department) ही […]
-
Jailer Trailer Launch: रजनीकांतच्या ‘जेलर’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, ‘थलैवा’च्या जबरदस्त अॅक्शनने मन जिंकली
रजनीकांत यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘जेलर’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये थलायवाच्या धमाकेदार अॅक्शनसह नेत्रदीपक संवाद चाहत्यांना खूप आवडत आहेत. पुन्हा एकदा रजनीकांत आपल्या धमाकेदार अॅक्शनने पडद्यावर दिसणार आहेत. पोलिसाच्या भूमिकेत असलेला रजनीकांत बॉक्स ऑफिसवर धमाल करायला सज्ज झाला आहे. (jailer trailer release rajinikanth action role as police man best dialogues will stole hearts) रजनीकांत […]
-
एमआयडीसीला मंजुरी देण्याची कृपा करुन हाताला काम द्या, युवकाचं उद्योगमंत्र्यांना रक्तरंजित पत्र…
मागील काही दिवसांपासून नगर जिल्ह्यासह राज्यात कर्जत-जामखेड एमआयडीसीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधी गटातील दोन लोकप्रतिनिधी देखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. मात्र, अद्यापही हा प्रश्न मार्गी लागला नाही. कर्जत-जामखेड एमआयडीसीसाठी आता एका युवकाने आपल्या रक्ताने थेट उद्योगमंत्री उदय सामंत यांना पत्र पाठवले आहे. या मागणीसाठी आत्तापर्यंत मोठे आंदोलने देखील झाली आहेत. […]
-
राज्यात आता पोलीस ठाणे वाढणार, नवे १८ हजार पोलीस पदे भरणार; फडणवीसांची घोषणा
(प्रफुल्ल साळुंखे) विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात आगामी वर्षभरात १८ हजार ५५२ पोलिसांची ( police) पद निर्माण होणार आहेत, अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. विधानसभेत विरोधकांनी २९३ अंतर्गत उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.(Devendra Fadnavis On police department Police stations will be increased 18 thousand new police posts will […]
-
उत्तर प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही लव्ह जिहाद विरोधी कायदा आना, आमदार प्रसाद लाड आक्रमक
आमदार प्रसाद लाड यांनी महाराष्ट्रातही उत्तरप्रदेश प्रमाणे लव्ह जिहादच्या विरोधात कडक कायदा करावा, मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, त्याचप्रमाणे लैंड जिहाद सारख्या विषयांचा देखील गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी केली आहे. विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाने दाखल केलेल्या 260 च्या प्रस्तावावर बोलत असताना आमदार लाड यांनी ही मागणी केली आहे.(On the lines of Uttar Pradesh, the […]
-
गुन्हेगारीचा प्रश्न थेट विधानसभेत! आमदार संग्राम जगतापांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचला…
Ahmednagar News : अहमदनगरमधील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न आता थेट विधानसभेत गाजला आहे. अधिवेशनात आमदार संग्राम जगताप यांनी गुन्ह्यांचा पाढाच वाचून दाखवला आहे. वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनावरच कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीतच तीन हत्यांच्या घटना घडत असल्याने पोलिस निरीक्षकांची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी आमदार जगताप […]
-
पुण्यात प्राध्यापकाकडून देवतांविषयी वादग्रस्त विधान, विद्यार्थी आक्रमक
Pune News : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि शिर्डीचे साईबाबा यांच्याविषयी अपशब्द वापरले होते. यावरुन राज्यभरात गदारोळ सुरु आहे. या घटनेचे पडसाद विधानसभेत देखिल पाहायला मिळाले. आता पुण्यातून आणखी एक प्रकरण समोर आले आहे. एका प्राध्यापकाने हिंदू देवतांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील एका हिंदी […]
-
WTC Points Table: पाकिस्तान पहिल्या तर भारत दुसऱ्या स्थानावर, इंग्लंडला मोठा फटका
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या गुणतालिकेत सध्या पाकिस्तानचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन्ही सामने जिंकून पाकिस्तानने एकूण 24 गुण मिळवले आहे. यासोबतच पाकिस्तान संघ 100 गुणांच्या टक्केवारीसह पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. (wtc points table 2023 25 after england vs australia ashes series pakistan at top […]
-
50 हजाराच्या लाचप्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला रंगेहात पकडले, ACB ची मोठी कारवाई
Pune Crime : पुण्यातील विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) सेवेत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50,000 रुपयांच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-corruption Department) त्यांना सापळा रचून 15 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (A police officer in Pune was arrested […]
-
‘मराठी पाऊल पडते पुढे’च्या सेटवरच स्वत:ला संपवलं; धनुष्यबाणाचं टोकं अन् समोर.., प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं स्टुडिओतील चित्र
Nitin Desai Death : एनडी स्टुडिओमध्ये मराठी पाऊल पाऊल पडते पुढेच्या सेटवर धनुष्यबाणाच्या टोकासमोरच नितीन देसाईंनी गळफास लावून घेत आपली जीवनयात्रा संपवली असल्याचं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे. त्यावेळी सेटवर काय परिस्थिती होती, याबाबत एका प्रत्यक्षदर्शींकडून माध्यमांना सांगण्यात आलं आहे. नितीन देसाई यांची एक्झिट मनाला चटका लावणारी ; राजकीय नेत्यांकडून हळहळ ! सकाळी 9 वाजताच्या सुमारास […]
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहांचे पुणे दौरे वाढले; उद्धव ठाकरेंनी सांगितला अर्थ…
Uddhav Thackeray On Narendra Modi : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्या पुण्यामध्ये वाढत असलेल्या दौऱ्यांवरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला आहे. आज ठाकरे विधानभवनामध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवरुन संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मणिपूर घटनेवरुन केंद्रातील भाजप सरकार जोरदार हल्लाबोल केला आहे.(Pm Narendra Modi […]
-
WTC Points Table: पॉइंट्स टेबल: इंग्लंडचे 19 गुण कमी, ऑस्ट्रेलियाचेही मोठे नुकसान, जाणून घ्या काय आहे कारण?
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली. पण आता दोन्ही संघांना जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे. खरं तर, बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचे 19 गुण कमी करण्यात आले. तर ऑस्ट्रेलियन संघाला 10 गुणांचा धक्का बसला आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे गुण का कापले गेले […]

































































































