- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Rohit Pawar : ‘मला अजितदादांसारखं व्हायचं नाही’; रोहित पवारांनी सांगितलं राजकारणात का आलो ?
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील दोन्ही गटातील वाद वाढला आहे. शरद पवार गटाचे नेते यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच आता अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit […]
-
जयंत पाटील, आव्हाड, रोहित पवारांच्या आमदारकीवर टांगती तलवार; अजित पवार गटाचं मोठं पाऊल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या 13 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काल (22 सप्टेंबर) ही याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 13 पैकी 10 आमदार विधानसभेचे आणि 3 आमदार विधान परिषदेचे आहेत. (NCP (Ajit […]
-
India Canada Row : भारताच्या एका निर्णयामुळे डळमळीत होऊ शकते कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी आणि समर्थक निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडा या देशातील संबंध ताणले गेले आहेत. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याच्या आरोपानंतर भारताने कॅनडियन नागरिकांना अनिश्चित काळासाठी व्हिजा न देण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या अर्थव्यवस्थेत भारतीय विद्यार्थांचा मोठा वाटा असून, भारताकडून याबाबत कठोर निर्णय घेण्यात आल्यास कॅनडाची एजुकेशन इकोसिस्टम डळमळीत होऊ शकते. […]
-
Supriya Sule : अजितदादा माझे मोठे बंधू पण…, संसदेत सिंचन घोटाळ्यावर बोलल्यानंतर सुळेंचं स्पष्टीकरण
Supriya Sule on Ajit Pawar : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांना अजित पवारांच्या (Ajit Pawar) सिंचन घोटाळ्याबाबत ( Irrigation scam ) सुळेंनी संसदेत घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अजितदादा माझे मोठे बंधू आहेत. पण मी संसदेत उपस्थित केलेल्या सिंचन घोटाळ्याबाबतचा मुद्दा हा पंतप्रधान मोदी आणि […]
-
शिंदेंच्या मतदारसंघात भाजपाची घुसखोरी? रोहित पवार म्हणाले, श्रीकांत शिंदेंसह सर्वच खासदार..
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडत अजित पवार सरकारमध्ये दाखल झाल्यानंतर पक्षातील दोन्ही गटातील वाद वाढला आहे. शरद पवार गटाचे नेते यासाठी भाजपलाच जबाबदार धरत आहेत. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघालेले असतानाच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे गटाला डिवचले आहे. आ. पवार आज कल्याणमध्ये आहेत. येथे त्यांनी शिंदे गटाचे खासदार […]
-
Supriya Sule : भाजप खासदाराविरुद्ध सुळेंनी दिली हक्कभंगाची नोटीस, नेमका वाद काय ?
Supriya Sule : भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri) यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबाबत भर संसदेत अपशब्द वापरले. त्यांच्या या वक्तव्यावरून प्रचंड संताप व्यक्त होत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सुद्धा आक्रमक झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी रमेश बिधुडी यांच्या विरोधात थेट हक्कभंगाची नोटीस धाडली आहे. त्यामुळे आगामी काळात […]
-
Road Accident : ‘समृ्द्धी’वर भीषण अपघात! भरधाव कार दुभाजकाला धडकली, एक ठार
Road Accident : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे (Samruddhi Highway Accident) सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव वेगातील स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू […]
-
India Canada Conflict : अजेंडा 2024, आता भारत विरुद्ध कॅनडा; ठाकरे गटाकडून मोदी सरकार लक्ष्य
India Canada Conflict : खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Conflict) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका […]
-
Maharashtra Rain : नागपुरात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. काल शुक्रवारीही दिवसभर अनेक जिल्ह्यांत पाऊस झाला. दरम्यान, आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची […]
-
IND vs AUS : पराभव ऑस्ट्रेलियाचा पण, धक्का पाकिस्तानला; नेमकं काय घडलं ?
IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील (IND vs AUS) पहिलाच सामना टीम इंडियाने जिंकत आघाडी घेतली. घरच्या मैदानावर टीम इंडिया शेरच आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाला असला तरी त्याचा फटका मात्र पाकिस्तानला संघाला बसला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला […]
-
Horoscope 23 September 2023: ‘कर्क’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope 23 September 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. परंतु […]
-
सोमय्या प्रकरणात लोकशाही वाहिनीवर मोठी कारवाई ! पुढील ७२ तास प्रक्षेपण बंद ठेवण्याचे आदेश
नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ लोकशाही (lokshahi marathi ) या मराठी वृत्तवाहिनीवर प्रसारित करण्यात आला होता. याप्रकरणी आता या वृत्तवाहिनीवर कारवाई करण्यात आली आहे. आज सायंकाळपासून ते 25 सप्टेंबर असे तीन दिवस या वाहिनीचे प्रक्षेपण बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. याबाबतची माहिती लोकशाहीचे संपादक कमलेश […]
-
एकनाथ शिदेंनंतर मुख्यमंत्री कोण? आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बच्चू कडू स्पष्टच बोलले…
Bachchu Kadu On BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी करण्यास विलंब झाल्याने सुप्रीम कोर्टाने नुकतंच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या कृतीवर ताशेरे ओढले. कोर्टाने नार्वेकरांना या संदर्भात आठवडाभरात अहवाल सादर करण्याचे निर्देशही दिले होते. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा विषय लांबणीवर टाकण्याची शिंदे गटाची […]
-
Ind Vs Aus : पहिल्याच सामन्यात भारताचा 5 गडी राखून दणदणीत विजय…
Ind Vs Aus : वन डेच्या पहिल्याचं सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वनडेचा पहिला सामना आज मोहालीमध्ये खेळवला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 276 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताचा कर्णधार राहुलने 58 धावांची नाबाद खेळी करीत विजय खेचून आणला आहे. Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; […]
-
Lok Sabha Election 2024: अखेर जेडीएसची भाजपबरोबर युती ! लोकसभा निवडणूक एकत्र लढणार
नवी दिल्ली : भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दक्षिणेतील राज्यातून एक साथीदार आज मिळाला आहे. कर्नाटकातील जेडीएस (JDS) हा प्रादेशिक पक्ष भाजपच्या (bjp) नेतृत्वाखालील एनडीए (NDA) आघाडीत सहभागी झाला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीविरुद्ध लढण्यासाठी एनडीएला बळ मिळाले आहे. जेडीएसचे प्रमुख व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री […]
-
ICC कडून वनडे वर्ल्डकपच्या बक्षीसांची रक्कम जाहीर, विजेत्या संघाला मिळणार 33 कोटी
ODI World Cup Tournament Prize Money : एकदिवसीय विश्वचषकाविषयी क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भारत एकट्याने या मोठ्या स्पर्धेचं यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील […]
-
Prakash Ambedkar: महिला आरक्षणाची बिजे कोणी रोवली? प्रकाश आंबेडकरांनी सांगून टाकलं
Prakash Ambedkar on Women’s Reservation : देशात सध्या महिला आरक्षण विधेयकावरुन(Women’s Reservation Bill) वादंग पेटलेलं असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनीही(Prakash Ambedkar) उडी घेतली आहे. महिला आरक्षणाचे बिजे काँग्रेस-भाजपने नाहीतर बाबासाहेबांनी रोवली असल्याचं विधान प्रकाश आंबेडकरांनी केलं आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. यावरुन महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस-भाजपमध्ये जुंपलेली असतानाच […]
-
Sunil Shelke : ‘…तेव्हा भाजपसोबत जाण्यास रोहित पवार तयार होते’; अजितदादा गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट
Sunil Shelke On Rohit Pawar : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचं सत्र सुरु आहे. एकीकडे शरद पवार(Sharad Pawar) गटाचे आमदार रोहित पवार(Rohit Pawar) यांनी अजित पवार गटावर(Ajit Pawar Group) ब्लॅकमेलिंगचा आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे अजित गटाच्या आमदारांकडूनही रोहित पवारांना(Rohit Pawar) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. आज त्यांनी माध्यमांशी […]
-
चीनची रेलगन सुसज्ज आण्विक विमानवाहू नौका सज्ज, हिंदी महासागरात भारताला थेट धोका
बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात (South China Sea) अमेरिकेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे चीन आधीच त्रस्त आहे. त्यामुळे दक्षिण चीन समुद्रात आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी चीनने विमानवाहू जहाज (aircraft carrier) तयार केलं आहे. चीनने रेलगनने सुसज्ज अणुऊर्जेवर चालणाऱ्या विमानवाहू जहाजाचे अनावरण केले आहे. ही युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येणार आहे. रेलगनसह सशस्त्र विमानवाहू वाहक ही […]
-
Sharad Pawar : ‘ते’ फोटो सोशल मीडियावर का वापराले? शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांकडे नाराजी
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे बंडखोर खासदार प्रफुल्ल पटेल यांचा दोन दिवसांपूर्वी राज्यसभेतील आणि कॅफेटेरियामधील फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. या फोटोंवर राज्यात बरीच चर्चा झाली. बंडानंतरही पवार आणि पटेल यांच्यातील गोडवा कायम असल्याचा संदेश राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गेला होता. (Why use photos on social media, Sharad Pawar’s displeasure […]
-
Single: प्रथमेश अन् अभिनय पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र; ‘या’ सिनेमात हास्याचा धमाका!
Single Marathi Movie: मराठी अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र बघायला मिळणार आहे. (Marathi Movie) ते दोघे सिंगल या सिनेमात हटक्या अंदाजात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव सिंगल (Single Marathi Movie) आहे. यामध्ये प्रथमेश आणि अभिनय या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका साकारत असल्याचे बघायला मिळणार आहे. […]
-
सर्वोच्च न्यायालयानं दट्ट्या लावल्यानंतरच सुनावणीला वेग; अनिल परब यांचा राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल
Anil Parab on Rahul Narwekar : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीत चालढकल केल्याने विधानसभा अध्यक्षांना शेलक्या शब्दांत सुनावलं आहे. त्यानंतर आता त्या आमदारांच्या सुनावणीच्या प्रक्रियेच्या घडामोडीला वेग आला आहे. त्यावरुन आता विरोधकांनी विधानसभा अध्यक्षांना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब (Anil Parab)यांच्या कामावर टीका केली आहे. Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे […]
-
omar abdullah : ‘दहशतवाद्यांना बाहेर फेकून द्या’ म्हणणाऱ्या रमेश बिधुरींवर अब्दुलांचा संताप; म्हणाले..,
omar abdullah : दहशतवादी बोलले त्याची सवय पण नंतर जे काही बोलले त्याची लाज वाटत असल्याचा संताप नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला(omar abdullah) यांनी व्यक्त केला आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात बोलत असताना भाजप खासदार रमेश बिधुरी( ramesh bidhuri) यांची जीभ घसरली आहे. बिधुरी यांच्या विधानानंतर देशभरातील नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात […]
-
Donald Trump Video : ट्रम्प पुन्हा अडचणीत! महिलेच्या छातीवर दिला ऑटोग्राफ; ट्रम्प यांच्या कृतीवर नेटकऱ्यांचा आक्षेप
Donald Trump Signs Women Top : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादात सापडतात. काही दिवसांपूर्वी एका लेखिनेके ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यामुळं जगभर खळबळ उडाली होती. त्यानंतर ट्रम्प यांच्या आणखी एका कृतीमुळं मोठा वाद निर्माण झाला आहे. अमेरिकेतील आयोवा येथे ट्रम्प प्रचार करत असताना अचानक […]
-
Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे बोलले; ‘दादांसारखा भाऊ..,’
Sunil Tatkare : अजितदादांसारखा भाऊ मिळालायं, सुप्रियाताई भाग्यवानच असल्याचं अजित पवार गटाचे(Ajit Pawar Group) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) स्पष्ट केलं आहे. महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेदरम्यान, सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांना उद्देशून प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केलं होतं. […]
-
मिरज शासकीय रुग्णालयात माणसांबरोबरच प्राण्यांवरही इलाज होतो का? रोहित पवारांचा आरोग्यमंत्री सावंतांना रोखठोक सवाल
Rohit Pawar : काल राज्याच्या आरोग्य मंत्रालयाची एक जाहिरात एका राष्ट्रीय वृत्तपत्रात प्रकाशित झाली होती. यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला होता. गरीब जनतेसाठी औषध खरेदी आणि ग्रामीण रुग्णालयांसाठी सरकारकडे निधी नाही. मात्र, आरोग्य खात्याच्या जाहिरातबाजीसाठी सरकार कोट्यावधींचा खर्च करतं, अशी टीका रोहित पवारांनी (Rohit Pawar)केली होती. अशाचत आता मिरज रुग्णालयातील […]
-
Ramesh Bidhuri Controversy : मुल्ला उग्रवादी, दहशतवादी, याचं काही ऐकू नका, बाहेर फेकून द्या; भाजप खासदाराची लोकसभेतच शिवीगाळ
Ramesh Bidhuri Controversy : संसदेच्या विशेष अधिवेशनात विविध विषयांच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभेत चांद्रयान-3 च्या यशाची चर्चा सुरु होती. त्यावेळी दिल्लीतील भाजप खासदार रमेश बिधुरी (Ramesh Bidhuri)यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने एकच खळबळ उडाली. चांद्रयान 3 (Chandrayaan 3)च्या यशाबद्दल चर्चा करताना रमेश बिधुरी यांनी अनेक […]
-
Shantit Kranti 2: ‘तीन दोस्तांची धमाल मस्ती दाखवणारा ‘शांतीत क्रांती २’ चा ट्रेलर प्रदर्शित
Shantit Kranti 2 Trailer Out: तीन मित्रांची धमाल कथा सांगणारी वेब सीरिज ‘शांतीत क्रांती’ (Shantit Kranti 2) ही वेब सीरिज (Web series) चाहत्यांना चांगलीच आवडली होती. (Trailer Out) अभय महाजन (Abhay Mahajan), ललित प्रभाकर आणि अलोक राजवाडे यांनी या तीन धमाल मित्रांची भूमिका साकारली होती. (Marathi Movie) अनेकांनी या सीरिजला आपली मोठी पसंती दर्शवली होती. […]
-
World Cup 2023 : पाकिस्तानचा संघ ठरला; कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या…
World Cup 2023 : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून(PCB) पाकिस्तान संघाची(Pakistan Team) घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह(Nasim Shah) दुखापत झाल्याच्या कारणामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होता, नसीम शाहच्या जागी हसन अलीचा(Hussan Ali) समावेश करण्यात आला होता. ‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), […]
-
संजय राऊत वैयक्तिक आयुष्यात शक्ती कपूर यांच्यासारखा…; नितेश राणेंची घणाघाती टीका
Nitesh Rane on Sanjay Raut : देशाच्या 75 वर्षांच्या संसदीय परंपरेचा अविभाज्य भाग असलेले जुने संसद भवन मंगळवारी (19 सप्टेंबर) इतिहासजमा झालं. गणेश चतुर्थीच्या दिवशी संसदेचे कामकाज नवीन संसद भवनात (new Parliament House) सुरू झालं. त्यानंतर नवीन संसदेत पहिल्यांदा महिला आरक्षण विधेयक (Women’s Reservation Bill) पास झालं. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय […]
-
Parineeti Raghav Wedding: परिणीती राघवच्या लग्नासाठी चोख बंदोबस्त; पाहुण्यांसाठी फोनवर…
Parineeti-Raghav Wedding: परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि राघव चड्ढा (Raghav Chadha) यांच्या लग्नाचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरु झाल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीमध्ये परिणीती-राघव यांचा मेहंदी सोहळा पार पडला. ज्याचा एक फोटो सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा गुरुद्वाराचा फोटो असल्याचे सांगितले जात आहे. ज्यामध्ये परिणिती तिच्या हातावर मेहंदी बघायला मिळाली. परिणीती आणि राघवच्या लग्नाचे […]
-
अहमदनगर : आईच्या झोपेच्या गोळ्या अन् दरोड्याचा बनाव : पत्नीने थंड डोक्याने काढला पतीचा काटा
Crime : अहमदनगर : शारिरीक आणि मानसिक छळाला वैतागून पत्नीनेच दरोड्याचा बनाव रचून पतीची हत्या केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात एकलहरे- बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नईम पठाण असं मृत पतीचं नाव आहे तर, बुशरा पठाण असं आरोपी पत्नीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिसांनी पत्नी बुशरा आणि तिच्या दोन साथीदारांना […]
-
Anil Parab : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना… अनिल परबांचा नार्वेकरांवर हल्लाबोल
Anil Parab : आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणीत चालढकल केल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) कडक शब्दांत ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण (Maharashtra Politics) चांगलेच तापले आहे. अध्यक्ष नार्वेकरांनी काल अचानक दिल्ली गाठली त्यामुळे चर्चांना अधिकच उधाण आले. यानंतर सुनावणी प्रक्रियेला वेग आला असला तरी विरोधकांनी राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर जोरदार टीका करण्यास […]
-
दिल्ली दौऱ्यात ठरवली नार्वेकरांनी रणनीती; आता ‘या’ दिवशी होणार आमदार अपात्रतेची सुनावणी
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या सोमवार (25 सप्टेंबर) रोजी आमदार अपात्रता प्रकरणात पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायालयाने एका आठवड्यात पुढची सुनावणी घेण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले होते. यानंतर काल (21 सप्टेंबर) दिल्लीमध्ये कायदेशीर सल्ला घेवून पुढची रणनीती ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता सोमवारच्या […]
-
Sanatan Dharma : ‘सनातन’ वादाची ‘सुप्रीम’ दखल; उदयनिधींना धाडली नोटीस
Sanatan Dharma : तामिळनाडू सरकारचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांनी सनातन धर्माबद्दल (Sanatan Dharma) केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात संतापाची लाट उसळली होती. या वादाची सुप्रीम कोर्टाने गंभीर दखल घेत तामिळनाडू सरकार आणि उदयनिधी स्टॅलिन यांना नोटीस बजावली आहे. यामुळे आता उदयनिधी स्टॅलिन यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी काही […]
-
Rohit Pawar : अजित पवार गट करतोय आमदारांना ब्लॅकमेल; रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ
Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) शरद पवार गटातील एक खासदार आणि आमदार अजित पवार गटात जाण्यासंदर्भात माहिती मिळाल्याने खळबळ उडाली आहे. हे लोकप्रतिनिधी कोण आहेत, त्यांनी खरंच अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे का याची स्पष्ट माहिती अद्याप मिळाली नसली तरी या मुद्द्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार […]
-
अजितदादा अन् शिंदेंना भाजपने का जवळ केलं? रोहित पवारांच्या उत्तरात दडलाय भाजपचा प्लॅन
Rohit Pawar : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) राज्यात जोरदार तयारी सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपने (BJP) आपला 45+ अजेंडा सेट केला आहे. यासाठी मित्रपक्षांना सोबत घेण्याचाही प्लॅन केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना सोब घेऊन जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. दुसरीकडे […]
-
Lalbaugh Raja: किंग खान मुलासोबत घेतला लालबाग राजाचं दर्शन
Shah Rukh Khan: मुंबईच्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आणि बॉलिवूड़चं (Bollywood) थोडं जुनं कनेक्शन असल्याचे नेहमी बघायला मिळत असते. (Social media) अनेक बॉलिवूड कलाकार गणपती उत्सवामध्ये अवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असताना बघायला मिळत असतात. #WATCH | Shah Rukh Khan visits Lalbaugcha Raja in Mumbai to seek blessings from Lord Ganesh pic.twitter.com/NqIvMMi2uz — ANI (@ANI) […]
-
सामंतांच्या भावाला तिकीट मिळालं तर मी स्वतः प्रचार करील; कदमांचं क्लिअर पॉलिटिक्स !
Maharashtra Politics : मागील काही दिवसांपासून शांत असलेले माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) आता निवडणुकीच्या तोंडावर चांगलेच सक्रिय झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांसह (Lok Sabha Election) शिवसेना आमदार प्रकरण, महायुती सरकार, उद्धव ठाकरे या मुद्द्यांवर त्यांनी रोखठोक मते व्यक्त केली. कदम यांनी आज रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत […]
-
Journey Trailer: एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित
Journey Trailer: सचिन जीवनराव दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘जर्नी’ सिनेमाचा एका अनोख्या लढाईची रहस्यमय कथा सांगणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. (Marathi Movie) सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत या सिनेमात शंतनु मोघे, शर्वरी जेमेनिस, ( Journey Trailer Out) शुभम मोरे, अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकार गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने, माही बुटाला, निखिल राठोड यांच्या मुख्य […]
-
National Cinema Day: या दिवशी कोणताही सिनेमा पाहा फक्त ९९ रुपयात
National Cinema Day 2023: मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय सिनेमा दिन जाहीर करण्यात आला. गेल्या वर्षी देखील सिनेमाचा हा फेस्टिव्हल जोरदार साजरा करण्यात आला होता. (National Cinema Day Offer) यामुळे आता यावर्षी देखील हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (Multiplex Association of India) १३ ऑक्टोबर २०२३ या दिवशी ‘राष्ट्रीय सिनेमा दिन […]
-
शिंदेंचं काम, बापही पळतोय, बेटाही पळतोय; कदमांचा ठाकरेंवर हल्लाबोल
Ramdas Kadam : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. दोन्ही गटात […]
-
Manapman Muhurta: सुबोध भावेंनी केली नव्या सिनेमाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात
Subodh Bhave New Movie: २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सुबोध भावे (Subodh Bhave) दिग्दर्शित या सिनेमाचे जोरदार कौतुक होत आहे. (Social media) तसेच या सिनेमामधील हटके गाणे देखील ऐकायला आणि पाहायला मिळत असतात. गेल्या वर्षी सुबोध भावे दिग्दर्शित ‘कट्यार काळजात घुसली’ सिनेमाला ७ वर्ष पूर्ण झाली. […]
-
टीम इंडिया मैदानात! आज ऑस्ट्रेलियाला देणार टक्कर; जाणून घ्या, प्लेइंग-11
IND vs AUS : विश्वचषक स्पर्धेआधी आजपासून टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज मोहाली (पंजाब) येथे दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. विश्वचषकाआधी होणारी तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका दोन्ही संघासाठी चाचणी परीक्षा ठरणार आहे. वर्ल्डकपसाठी तयारी करण्याची संधीही या मालिकेतून दोन्ही संघांना मिळणार आहे. चार […]
-
BJP : कामं करा, नाहीतर राजीनामा द्या; बावनकुळेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?
BJP : राज्यात निवडणुकांची तयारी जोरात सुरू झाली आहे. सत्ताधारी भाजपाच्या (BJP) नेत्यांनी मतदारसंघांचे दौरे सुरू केले आहे. विरोधकांनीही चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात या नेतेमंडळींचे सोशल इंजिनियरिंगही पाहण्यास मिळत आहे. गणेश मंडळांना भेटींच्या माध्यमातून मतदारसंघांचाही कानोसा घेतला जात आहे. त्यातच काल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पुण्यात होते. येथे त्यांनी गणेश […]
-
Sujay Vikhe : ‘जिनको शक था हमारी काबिलियत पर’.. शेरोशायरीतून खा. विखेंचे विरोधकांना चिमटे
Sujay Vikhe : देशाच्या नवीन संसद भवनातून कामकाज सुरू झाले आहे. सध्या येथे विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात भाजप खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी शेरोशायरी करत भारताच्या चांद्रयान मोहिमेचे (Chandrayaan 3) कौतुक केले. तसेच विरोधकांनाही खोचक टोले लगावले. चांद्रयान 3 मोहिम यशस्वी झाल्याबद्दल खा. विखे यांनी पंतप्रधान मोदी आणि संपूर्ण वैज्ञानिकांचे अभिनंदन […]
-
‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले
Arvind Sawant : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आता ठाकरे […]
-
Maharashtra Rain : पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार
Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. मागील आठवड्यापासून पाऊस होत असला तरी आधीचा दीड महिना पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी […]
-
आमदार अपात्र होणार म्हणूनच राहुल नार्वेकरांची चालढकल; राष्ट्रवादीच्या आमदाराचा गंभीर आरोप
Satara : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांच्याकडून आता ठाकरे आणि शिंदेंना नोटीसा पाठवल्या जाणार असल्याचे समजते. मात्र या सगळ्याच प्रकरणात विलंब झाल्याने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. आताही राष्ट्रवादी काँग्रेसचे […]
-
Horoscope Today : ‘या’ राशीच्या व्यक्तींनी आज दूरवरचे प्रवास टाळले पाहिजेत!
Horoscope 22 September 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries) – आजच्या दिवशी नोकरीत तुमच्या मनाच्या विरोधात वातावरण […]
-
आधी लांडग्याचे पिल्लू म्हटले ! आता पडळकरांनी थेट अजित पवारांसमोरच ठाण मांडले !
मुंबईः धनगर समाजाला (Dhangar Reservation)अनुसूचित जमातीतील आरक्षण मिळविण्यासाठी पंधरा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीत हे आंदोलन सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मुंबईत एक बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते. याचबरोबर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, आ. […]
-
Women Reservation Bill : मोठी बातमी! लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही महिला आरक्षण विधेयक एकमताने मंजूर
Womens Reservation Bill : काल महिला आरक्षण विधेयक (Women Reservation Bill) लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज हे विधेयक चर्चेसाठी राज्यसभेत मांडले गेले होते. दिवसभराच्या चर्चेनंतर राज्यसभेतही (Rajya Sabha) हे विधयेक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने 215 मते मिळाली. त्यामुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, नवीन संसदेत […]
-
महिला आरक्षण हा जुमला, आजही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असे मंत्री…; आदित्य ठाकरेंची राज्यासह केंद्रावर टीका
Aditya Thackeray On Women’s Reservation Bill : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत मंजूरी मिळाली. आज विधेयकावर राज्यसभेत चर्चा झाली. एकदा हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं की, राष्ट्रपतींकडे सहीसाठी जाईल, त्यानंतर या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होईल. दरम्यान, या विधेयकावर बोलतांना हा सरकारी जुमला असल्याची टीका विरोधकांनी केली. आज उबाठाचे आमदार […]
-
कार्पोरेट्सची अब्जावधी रुपयांची कर्जमाफ करायची अन् पोशिंद्याला…; सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
Supriya Sule on state Goverment : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. आताही औंढा तालुक्यातील जोडपिंपरी येथील शेतकरी भुजंग माणिकराव पोले (Bhujang Manikrao Pole) यांनी बॅंकेतच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोले यांनी महाराष्ट्र बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली होती. पीक कर्ज मागणी प्रस्ताव सादर करून त्यांनी 1 लाख 60 हजार रुपयांच्या कर्जाची मागणी […]
-
महायुतीच्या समन्वयकपदाची जबाबदारी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकरांवर
पुणेः आगामी निवडणुकीच्या दृष्टीने भाजपकडून तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी पुणे शहरामध्ये नवीन पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात महायुतीतील सर्व घटक पक्षांशी योग्य समन्वय राखण्यासाठी भाजपचे (BJP) प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandip kharadekar) यांची पुणे शहर महायुतीच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली. राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची […]
-
Maharshtra Politics : भाजपच्या मोठ्या नेत्याच्या कन्येवर मोठी जबाबदारी; स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार फायदा
Maharshtra Politics : महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या नेत्यांच्या आगामी पीढी देखईल राजकारणात सक्रीय झाली आहे. त्यामध्ये आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याच्या कन्येवर देखील पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. हे नेते म्हणजे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील. तर त्यांची मुलगी अंकिती पाटील-ठाकरे यांच्यावर पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी मोठी जबाबदारी सोपविली आहे. Tamanna Bhatia कडून […]
-
राहुल गांधी, शरद पवारांना मुस्लिम मते हवी, पण…; इम्तियाज जलील यांची घणाघाती टीका
MP Imtiaz Jalil on Rahul Gandhi : केंद्र सरकारने मांडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला (Women’s Reservation Bill) काल लोकसभेत (Lok Sabha) मंजुरी मिळाली. सध्या या आरक्षणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. काल एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी, खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. महिला आरक्षण विधेयकात मुस्लिम महिलांसाठी कोणतीही तरतूद नसल्यानं त्यांनी […]
-
Tamanna Bhatia कडून महिला आरक्षणाचं कौतुक; संसदेला देखील दिली भेट
Tamanna Bhatia : महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन'(Women’s Reservation) लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल(Arjun Meghwal) यांनी मांडलं असून त्यावर राज्यसभेच्या खासदारांमध्ये चर्चासत्र सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे, मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर होणं बाकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिकक असल्याचं […]
-
Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…
नगर : धनगर समाजाला (Dhangar Reservation) एसटी (ST) संवर्गामध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी चौंडीत गेल्या पंधरा दिवसापासून यशवंत सेनेच्यावतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. आता येथील एका उपोषणकर्त्याची प्रकृती आणखी खालावली आहे. सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणास्थळीच ऑक्सिजन (oxygen) लावण्यात आला आहे. त्यांनी काल (ता. २०) पासून पाणी देखील सोडले आहे. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 धनगर […]
-
India Canada Row मुळं महागाई वाढणार; सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट बिघडणार?
India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar)यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील वाद (India Canada Row)चांगलाच पेटला आहे. दिवसेंदिवस भारत आणि कॅनडामधील तनाव कमी होण्याऐवजी तो आणखीच चिघळत चालला आहे.दोन्ही देशांनी एकमेकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टीही केली आहे. एवढंच नाही तर काही काळासाठी व्यापारावरही निर्बंध आणले आहेत. दोन्ही देशांमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे बराच […]
-
Radhakrishn Vikhe : संजय राऊत सर्वात मोठा दलाल; मंत्री विखेंची कडव्या शब्दांत टीका
Radhakrishn Vikhe : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishn Vikhe) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यामध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पेटले आहे. मुंबईतल्या पत्राचाळ घोटाळ्यात मराठी माणसाची फसवणूक करुन राऊतने कोट्यवधींची संपत्ती गोळा केली. कोरोनाच्या काळात एकीकडे लोकांचा जगण्याचा संघर्ष सुरु असताना दुसरीकडे मात्र मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्यात ज्याने धन्यता मानली तो संजय […]
-
Dhangar Reservation चा निर्णय होईपर्यंत समाजाला आदीवासींच्या योजना लागू होणार; मुख्यमंत्र्यांचा दिलासा
Dhangar Reservation : धनगर आरक्षणाच्यासाठी (Dhangar Reservation) आरक्षणाबाबत बिहार, झारखंड आणि तेलंगणामध्ये झालेल्या निर्णयांचा अभ्यास करणार, तसेच हा निर्णय होत नाही तो पर्यंत आदीवासी समाजाला जे लाभ मिळतात ते धनगर समाजाला मिळावे अशी चर्चा देखील या बैठकीत झाली. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Shinde) म्हणाले. आज धनगर आरक्षणासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. त्यानंतर […]
-
व्यक्तिगत, मर्यादाबाह्य टीका अशोभनीय…; पडळकरांच्या वक्तव्यावर बावनकुळे स्पष्टच बोलले…
Chandrasekhar Bawankule : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि मुख्य म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. अजित पवार लबाड लांडग्याचं पिल्लू तर सुळे लबाड लांडग्याची लेक अशी टीका त्यांनी केली होती. तर दरम्यान, आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) यावर प्रतिक्रिया दिली. […]
-
पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची जगभर वाहवा! टॉप 150 मिठाईच्या दुकानांमध्ये कयानी बेकरी, चितळे बंधूंचा समावेश
Kayani Bakery : पुणे तिथं काय उणे असं म्हटल्या जातं. विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेले पुणे खाद्यसंस्कृतीमुळेही नावाजले आहे. आता पुण्याचा जगभरात डंका झाला आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने पुण्याच्या खाद्यसंस्कृतीची वाहवा केली आहे. पुणे कॅम्पची कयानी बेकरी (Kayani Bakery) आणि चितळे बंधू (Chitale brothers) मिठाईवाले यांचा जगातील टॉप 150 मिठाईच्या दुकानांच्या यादीत समावेश करण्यात आला […]
-
मनोज जरांगेंना रुग्णालयातून डिस्चार्ज; आता साखळी उपोषण करून थोपटणार सरकार विरोधात दंड
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते अंतरवली सराटी गावात साखळी उपोषण करणार आहेत. https://www.youtube.com/watch?v=oTEzlFgbZb0 17 दिवस उपोषण केल्याने त्यांची प्रकृती खालावली होती. रविवारी छत्रपती संभाजीनगर […]
-
Revenue Department ची मोठी कारवाई! बदलीनंतरही कामावर हजर न झाल्याने 11 अधिकारी निलंबित
Revenue Department : राज्याच्या महसूल विभागाने बदली झाल्यानंतर देखील कामावर हजर न झालेल्या महसूल विभागातील तब्बल 11 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच या अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यापासूनच कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली होती. मात्र त्याला या अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय […]
-
Hemangi Kavi Post: हेमांगी कवी अन् युवराज सिंग एकत्र; काय आहे नेमकं कारण…
Hemangi Kavi: मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. ती सोशल मीडियावर (Social media) तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. महिलांबद्दल एखादा विषय असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग असो हेमांगी याबाबत अगदी खुलेपणाने बोलत असल्याचे बघायला मिळत असते. View this post on Instagram A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi) नुकतंच […]
-
India Canada Row : निज्जरच्या हत्येनंतर कॅनडातील हिंदूंना 1985 सारखी भीती; वाचा काय घडलं होतं?
India Canada Row : खलिस्तानी समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या (HardeepSingh NIjjar) हत्येनंतर भारत आणि कॅनडा या दोन्ही देशामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. ज्या पद्धतीने या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे ते बघता कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदू समुदायामध्ये 1985 चे वर्ष आठवत वेगळ्याच भीतीचे काहूर माजले आहे. 1985 मध्ये नेमकं असं काय घडले होते. ज्याची आठवण सध्याच्या […]
-
BSNL चा नवा धमाका! रिटायरमेंट प्लॅन लॉन्च; काय आहे खास?
BSNL : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनल BSNL ही खासगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel, Vi सारखाच आपल्या युजर्सला चांगला अनुभव देण्यासाठी नवनवीन प्लॅन आणत आहे. यावेळी BSNLने एक नाही तर दोन नवीन धमाकेदार प्लॅन आणले आहेत. BSNL कंपनीने या दोन नवीन प्लॅनला रिटायरमेंट प्लॅन (Retirement Plan)असं नाव दिलं आहे. या प्लॅनची किंमत 411 रुपये आणि 788 […]
-
धर्माबद्दलच्या विधानानंतर Prakash Raj यांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसात गुन्हा दाखल
South Film Industry: दक्षिणेपासून ते बॉलिवूडपर्यंत (Bollywood) आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांचे नेहमी मनोरंजन करणारे अभिनेते प्रकाश राज (Actor Prakash Raj) हे कायम चर्चेत असतात. ते सतत ट्विटरवरून अनेक सामाजिक आणि राजकीय विषयांबद्दल सडेतोड मतं मांडत असल्याचे बघायला मिळत असतात.(Police ) त्यांनी बंगळुरूमध्ये अधिकृत तक्रार दाखल केल्याची सध्या माहिती मिळत आहे. एका युट्यूब चॅनेलने चिथावणीखोर […]
-
Sanjay Shirsat : लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तार करावाच लागेल; शिरसाटांनी करून दिली आठवण
Sanjay Shirsat : शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपच्या निवडणुकांच्या तयारीबद्दल प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की, येणारी लोकसभा भाजपसाठी महत्त्वाची, पण मंत्रिमंडळ विस्तारही करावा लागेल. असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला मंत्रिमंडळ विस्ताराची आठवण करून दिली आहे. मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण …पण […]
-
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, गुंतवणूकदारांना 2.5 लाख कोटींचा फटका
Indian stock market : यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) निर्णयानंतर, गुरुवारी, 21 सप्टेंबर रोजी भारतीय शेअर बाजारात (Indian stock market) मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 570 अंकांच्या घसरणीसह बंद झाला. तर निफ्टी 19,750 च्या खाली घसरला आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही 1 टक्क्यांहून अधिक घसरले. त्यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे अडीच लाख कोटी […]
-
मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Sultan of Delhi: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ यासारख्या बॉलीवूडच्या (Bollywood) हिट चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लुथरिया (Milan Luthria) पुन्हा एकदा आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी प्रोजेक्ट ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) च्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे. या टीझरच्या सोशल मीडियावर (Social […]
-
CPCB Bharti 2023 : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळात ७३ पदांसाठी भरती जाहीर, पगार 1 लाख रुपये; झटपट करा अर्ज
CPCB Bharti 2023: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रदूषण रोखण्यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करते. प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे आणि त्या माहितीचा प्रचार करणे आणि परिसरातील प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करते. त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज असते. दरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सल्लागार ‘A’, सल्लागार ‘B’, सल्लागार ‘C’ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची भरती […]
-
World Cup 2023 : दक्षिण आफ्रिकेला दुहेरी झटका; ‘हे’ दोन प्रमुख खेळाडू संघातून बाहेर
ICC Mens Cricket World Cup : दक्षिण आफ्रिकेच्या वनडे वर्ल्ड कप जिंकण्यांच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिच नॉर्खिया (Enrich Norkhia)आणि सिसांडा मगाला (Sisanda Magala)यांना फिटनेस टेस्ट पास करता आली नाही. त्यामुळे हा दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa team)संघाला मोठा धक्का मानला जात आहे. भारत अन् कॅनडामधील तणाव […]
-
Supriya Sule : मैत्रिणीसाठी सुप्रिया सुळे भाजप खासदारांशी भिडल्या, वाचा नक्की काय घडलं?
Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लोकसभेमध्ये आपल्या मैत्रिणी साठी आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर (Women’s Reservation Bill) चर्चा सुरू होती. कानिमोझी करूणानिधी या तामिळनाडूतील डीएमकेच्या खासदार सभागृहात बोलण्यासाठी उठल्या त्यावेळी हा प्रकार घडल्याचं पाहायला मिळाला. India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! महिंद्राचा कॅनडातील व्यवसाय बंद काय […]
-
सरकारी पैशाची उधळपट्टी करून त्यावर रुबाब करण्यापेक्षा…; रोहित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं
Rohit Pawar : सध्या राज्यात आरोग्य, बेरोजगारी, महागाई असे कितीतरी प्रश्न आ वासून उभे आहेत. अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अनेक वर्षापासून सार्वजनिक आरोग्य धोरण निर्माते आणि डॉक्टर आणखी काही रुग्णालये स्थापन करण्याची गरज व्यक्त करत आहे. मात्र, राज्यात पुरेशा आरोग्यविषयक पायाभूत सुविधा नाहीत. अशातच राज्य सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची (Ministry of Health) एक जाहीरात […]
-
India Canada Row : गुंतवणूकदारांना धक्का! कॅनडातील सर्व व्यवसाय बंद करण्याचा महिंद्रांचा निर्णय
India Canada Row: खलिस्तानी अतिरेकी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येत भारताचा हात (India Canada Row) असल्याचा आरोप करत कॅनडाच्या (Canada) पंतप्रधानांनी खळबळ उडवून दिली. मात्र, त्यांच्या या आरोपांनंतर भारत आणि कॅनडा (Canada India Relation) यांच्यातील वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. ट्रुडो (Justin Trudeau) यांच्या आरोपांनंतर भारत सरकारनेही जशास तसे उत्तर दिले. कॅनडाच्या एका वरिष्ठ […]
-
भारत अन् कॅनडामधील तणाव शिगेला; जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडले?
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येमागे भारताचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला. या गंभीर आरोपांनंतर दोन्ही देशातील संबंधात तणाव शिगेला पोहोचला असून, आता भारताने पुढील आदेशापर्यंत कॅनडियन नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. ट्रुडो यांच्या आरोपांनंतर आतापर्यंत अनेक घडामोडी घडल्या असून, आतापर्यंत […]
-
Chandrashekhar Bawankule : ‘लबाड लांडग्याचं पिल्लू’ म्हणाले पडळकर, अन् माफी मागितली बावनकुळेंनी…
Chandrashekhar Bawankule : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी(Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्याबद्दल खालच्या पातळीची भाषा वापरुन टीके केल्याने राजकीय वर्तुळात वादंग पेटल्याची परिस्थिती आहे. पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी गोपीचंद पडळकरांच्या अजित पवारांबद्दलच्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली आहे. एवढंच नाहीतर अजितदादांनी पडळकरांना […]
-
नगर हादरलं! घरातून सात लाख लुटून व्यावसायिकाचा खून, पत्नीना जबर मारहाण
अहमदनगर – दिवसेंदिवस अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात चोरीच्या आणि हत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवगावमध्ये चोरांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना ताजी असतांनाच आता याच घटनेची पुनरावृत्ती श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर उक्कलगाव रस्त्यावर एकलहरे शिवारात चोरांनी एका व्यावसायिकाचा निर्घृण खून करत घरातून लाखो रुपयांची […]
-
‘आदित्य ठाकरेंनी ठरवलं अन् केसरकरांना गेला कार्यकर्त्यांचा फोन’; कोकणात नेमकं काय घडलं?
Aditya Thackeray : राज्यात गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले. बाप्पांच्या दर्शनाच्या निमित्ताने राजकीय नेत्यांचे सोशल इंजिनिअरींगही पाहण्यास मिळत आहे. कोकणात गणेशोत्सवाचा वेगळाच उत्साह आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मंडळाला आणि घरांतील बाप्पाच्या दर्शनासाठी भेटी देत आहेत. त्यामुळे कोकणातील राजकारणाचा पारा चढला आहे. ठाकरे यांच्या […]
-
Women’s Reservation : ‘सगळा कारभार पतीच पाहतात’; महिला आरक्षणावर बच्चू कडूंचा ‘प्रहार’
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयकावरुन (Women’s Reservation) विरोधकांकडून जोरदार रस्सीखेच सुरु होती. अखेर लोकसभेत ‘नारी शक्ती वंदन’ विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं आहे. यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. श्रेयवादीचीही लढाई सुरू झाली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी या विधेयकावर भाष्य केले आहे. सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या […]
-
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा धडाका! ऑस्ट्रेलियन संगीत परिषदेत दाखवली अनोखी कमाल
Rockstar DSP: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तेलुगु सिनेमाचा बोलबाला ठरला आहे. एकीकडे राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या RRR चित्रपटाने सहा ॲवॉर्ड्स आपल्या नावेकेल्याचे बघायला मिळाले होते. अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राईजने २ ॲवॉर्ड्स (Awards) जिंकले. तसेच संगीताची जागतिक पोहोच आणि प्रभाव सातासमुद्रापार आहे. View this post on Instagram A post shared by […]
-
Maharashtra Politics : शिंदे अपात्र ठरल्यास CM कोण? अजितदादा, विखे, गडकरीही रेसमध्ये
Maharashtra Politics : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politics) घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अॅक्टिव्ह झाले आहेत. या कारवाईत जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अपात्र ठरून त्यांच मुख्यमंत्रीपद गेल्यास त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री कोण याची जुळवाजुळव करण्यास भाजपने (BJP) सुरुवात केल्याची माहिती आहे. शिंदे […]
-
Mla Disqualfication : SC ने कान पिळल्यानंतर नार्वेकरांचा वेग वाढला; ठाकरे-शिंदेंना नोटीस पाठवणार?
Disqualification MLA : सर्वोच्च न्यायालयाने(Supreme Court) कान पिळल्यानंतर आता अपात्र आमदारांच्या कारवाईने वेग धरल्याचं चित्र दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) यांनी उद्धव ठाकरे(Udhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांना नोटीसा जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांतच यांसदर्भातील नोटीस विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर […]
-
शिवशक्ती पॉइंटवर हालचालींना वेग; विक्रम लँडर अन् प्रज्ञान रोव्हरसाठी पुढील काही तास महत्त्वाचे
नवी दिल्ली : इस्रोने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून इतिहास रचला होता. अशाप्रकारे दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत पहिला देश ठरला आहे. चंद्रावर एक दिवस 14 दिवसांची असते. ज्यावेळी चंद्रयानचे यशस्वी लँडिंग करण्यात आले त्यावेळी तेथे सूर्योदय होता. मात्र, त्यानंतर रात्र सुरू झाल्याने प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडर स्लिपमोडमध्ये टाकण्यात आले होते. […]
-
Akhil Mishra Passed Away: 3 इडियट्स फेम अभिनेत्याचा इमारतीवरून पडून मृत्यू
Akhil Mishra Death: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेता आमिर खानचा सुपरहिट चित्रपट ‘थ्री इडियट्स’मधील लायब्रेरियन दुबेची भूमिका करणारा अभिनेता अखिल मिश्रा (Akhil Mishra Passed Away) यांचा इमारतीवरून पडून धक्कादायक मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अखिल मिश्रा हे ५८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने […]
-
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे ‘यारियां 2’ सिनेमातील नव गाण प्रदर्शित
Song Out Yaariyan 2: यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील (Social media) यारियां 2 मधील ‘ऊंची ऊंची दिवारें’चे नव गाण प्रदर्शित करण्यात आला आहे सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत […]
-
कुलीचा ड्रेस डोक्यावर सामान अन्…; आनंद विहार रेल्वे स्टेशनवर दिसला राहुल गांधींचा नवा ‘अवतार’
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज एकदमच वेगळ्या रुपात दिसले. कधी ट्रकचालकांशी गप्पा, कधी थेट शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते. आज मात्र राजधानी नवी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्टेशन गाठले. येथे त्यांनी हमालाचा गणवेश परिधान करत चक्क प्रवाशांचे सामानही उचलले. या खास प्रसंगाचा व्हिडीओ काँग्रेस (Congress) पक्षाने राहुल गांधी आणि […]
-
Women’s Reservation : 27 वर्षांची प्रतीक्षा संपणार; लोकसभेनंतर राज्यसभेतही ‘महिला आरक्षण विधेयक’ मंजूर होणार?
Women’s Reservation : महिला आरक्षण विधेयक नारी शक्ती वंदन'(Women’s Reservation) लोकसभेनंतर आता राज्यसभेतही मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. राज्यसभेत केंद्रीय कायदा मंत्री अर्जून मेघवाल(Arjun Meghwal) यांनी मांडलं असून त्यावर राज्यसभेच्या खासदारांमध्ये चर्चासत्र सुरु आहे. लोकसभेत हे विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे, मात्र, राज्यसभेत अद्याप मंजूर होणं बाकी आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिकक असल्याचं […]
-
KaalaPaani Teaser: अमेय वाघची नवी हिंदी वेबसिरीज, ‘काला पानी’ चा टीझर प्रदर्शित
KaalaPaani Teaser: अमेय वाघची असूर ही वेबसिरीज (webseries) जोरदार गाजल्याचे बघायला मिळाले होते. गेल्या काही दिवसापासून या वेबसिरीजचा दुसरा सिझन चाहत्यांच्या भेटीला आला होता. (Teaser Out) तसेच आता या सिझनला देखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Social media) आता असुर नंतर अमेय वाघची (Amey Wagh) आणखी एक हिंदी वेबसिरीज चाहत्यांच्या पुन्हा एकदा भेटीला येत आहे. […]
-
मोठी बातमी : वाढत्या तणावात कॅनडाला भारताचा मोठा झटका; अनिश्चित काळासाठी व्हिसा बंदी
नवी दिल्ली : खलिस्तानी दहशदवाद्यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत या दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमिवर भारत सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार भारत सरकारने पुढील आदेशापर्यंत कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देण्यास बंदी घातली आहे. जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमागे भारतीय एजन्सी असल्याचा दावा केला होता. […]
-
PM Narendra Modi : प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन प्रमुख पाहुणे? वर्षातला हा दुसरा भारत दौरा
PM Narendra Modi : जी-20 शिखर परिषदेनंतर आता यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या(Republic Day) कार्यक्रमासाठी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(Joe Biden) हे प्रमुख पाहुणे असणार आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी प्रजासत्ताक दिनासाठी जो बायडेन यांना आमंत्रित केले आहे. यासंदर्भात अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेटी(Eric Garcetti) यांनी माहिती दिली आहे. US President Joe Biden has been invited […]
-
Asian Games 2023 : टीम इंडियाच! मलेशियाला पराभवाची धूळ चारत सेमी फायनलमध्ये धडक
Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) पहिल्याच सामन्यात भारताच्या महिला क्रिकेट संघाने जबरदस्त कामगिरी केली. स्पर्धेतील उपांत्य पूर्व सामन्यात टीम इंडियाने मलेशियाचा (Malaysia) पराभव करत सेमी फायनलमध्ये एन्ट्री घेतली. या सामन्यात शेफाली वर्माने जबरदस्त फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने (Team India) 15 ओव्हरमध्ये 173 […]
-
Sai Pallavi Wedding: अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न? ‘तो’ फोटो व्हायरल
Actress Sai Pallavi Wedding: सध्या मनोरंजनविश्वात लगीनघाई सुरू आहे. एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत आहेत. सध्या साउथची अभिनेत्री साई पल्लवी ही देखील गुपचूप लग्न केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच साई पल्लवी (Actress Sai ) ही कायम चर्चेत असते. साई पल्लवीचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. ती सोशल मीडियावर (Social media) कमी सक्रिय […]
































































































