- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
-
Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एस एफ आय कार्यकर्त्यावर हल्ला..
Pune SFI ABVP: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) दोन विद्यार्थी संघटनांमध्ये जोरदार राडा झाला आहे. (Pune University) स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) या दोन विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ […]
-
‘सर्वपक्षीय बैठकीला समाजवादीच्या अबू आझमींना आमंत्रण नाही, पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे नाराजी
Abu Azmi On Maratha Reservation All Party Meeting: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली होती. परंतु या समाजवादी पक्षाला आमंत्रण न दिल्यामुळे आमदार अबू आजमी (Samajwadi Party Abu Azmi) यांनी नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना (CM Eknath Shinde) पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाला आम्ही अगोदरही […]
-
Supriya Sule: ‘गृहमंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्या’; सुप्रिया सुळेंची पुन्हा मागणी
Supriya Sule On Devendra Fadnavis Resign Demand: महाराष्ट्रातील सुरू असलेल्या सध्याच्या परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आपलं मत व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. जालन्यात अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. तसंच, पुण्यात कोयता गँग सक्रीय आहे. ड्रग्ज माफियांचं साम्राज्य या राज्यात आहे. इतकचं काय तर राज्यातील मराठा, धनगर, लिंगायत हे […]
-
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीत नेमकं काय ठरलं?
Maratha Reservation All Party Meeting: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे, अनि परब, शेकापचे जयंत पाटील आदी अनेक नेतेमंडळी उपस्थित होती. या बैठकीत […]
-
Aishwarya Rai Birthday : मॉडेलिंगपासून करिअरला सुरूवात केली, आज करोडोंची मालकीन झाली…
Aishwarya Rai Birthday: बॉलिवूड अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai) आज तिचा 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. केवळ अभिनयच नाही तर आपल्या सौंदर्यानेही ऐश्वर्याने आपलं नाव कमावलं. 1998 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणारी ऐश्वर्या आता ग्लोबल आज मोठी स्टार अभिनेत्री बनली आहे. बॉलिवूडसोबतच तिने काही हॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. दरम्यान, ऐश्वर्या […]
-
मराठा आरक्षणासंदर्भातील सर्वपक्षीय बैठकीवर संभाजीराजे छत्रपतींचा बहिष्कार; ट्वीट करत सडकून टीका
Maharashtra Maratha Reservation: राज्यभरात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पेटलेला असताना आज मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. बैठकीला सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधी पक्षांमधील अनेक मंत्री उपस्थित होते. परंतु, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) मात्र बैठकीला अनुपस्थित होते. उपमुख्यमंत्री यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवली असल्याचे बघायला मिळाली आहे. अशातच […]
-
Maratha Reservation : आरक्षणावर रितेश देशमुख, हेमंत ढोमे हे सेलिब्रिटी नेमकं काय म्हणाले? कोणी दिलं आंदोलनाला समर्थन?
Celebrity on Maratha Reservation : चाळीस दिवसांचा अल्टिमेटम देऊनही मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) न मिळाल्यानं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं. त्यांच्या उपोषणाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांच्या आंदोलनाला पाठिबा दिला. सर्व स्तरातून मराठा आंदोलनाला पाठिंबा मिळत असतांना अनेक सेलिब्रिटी कलावंतांनी मराठा आरक्षण आणि मनोज […]
-
Maratha Reservation: आमदार कैलास पाटील यांना मुंबई पोलिसांकडून अटक
Kailas Patil arrested: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. अनेक जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयाला टाळा ठोकल्यामुळे आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांना मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) अटक करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी […]
-
Diwali 2023 : फराळ बनवताना शंकरपाळे बिघडतात? जाणून घ्या रेसीपी…
Diwali 2023 : दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे गृहीणींना फराळ बनवण्याची घाई झालेली आहे. मात्र अनेकदा गडबडीमध्ये फराळातील पदार्थ बिघडतात. त्यात शंकरपाळे जास्त बिघडण्याची शक्यता असते. कारण शंकरपाळे अनेकदा कडक होतात किंवा वातट होतात. तर अनेकदा तळताना तेलात विरघळतात देखील त्यामुळे शंकरपाळे बिघडू नये म्हणून त्याची खास रेसीपी जाणून घ्या… गोड शंकरपाळे : साहित्य – […]
-
R. Tamil Selvan : भाजप आमदाराला तुरुंगवासाची शिक्षा; अधिकाऱ्यांना मारहाण करणं भोवलं
R. Tamil Selvan : मुंबई महापालिका (BMC)अधिकाऱ्यांना मारहाण करणं भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन (R. Tamil Selvan)यांना चांगलंच महागात पडलं आहे. भाजपचे (BJP)आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायालयाने (Court of Special Sessions, Bombay)हा निर्णय दिला आहे. शिक्षेत सवलत दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने यावेळी म्हटले. Manipur : […]
-
Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
Manipur Violence : देशाच्या ईशान्येकडील राज्य मणिपूर मागील सहा महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत धुमसत आहे. अजूनही येथील हिंसाचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सरकार येथील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यानंतर आता सरकारने मणिपूरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. समाजकंटकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होणारे आक्षेपार्ह मेसेज फोटो आणि व्हिडिओंना आळा घालण्यासाठी 5 नोव्हेंबरपर्यंत इंटरनेटवर बंदी वाढविण्यात आली आहे. काही दिवसांंत […]
-
Tiger 3: टायगर 3 चित्रपटासाठी अॅडव्हान्स बुकींगची तारीख ठरली!
Tiger 3 Movie : यशराज फिल्मचा स्पाय युनिव्हर्स चित्रपट टायगर 3 येत्या 12 नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगबाबत अपडेट समोर आली आहे. येत्या 5 नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या अॅडव्हान्स तिकीटासाठी बुकींग सुरु करण्यात येणार आहे. ऐन सणाच्या दिवसांतच हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांना चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागली आहे. मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सर्वपक्षीय […]
-
Rahul Narvekar : ‘मी अशा दबावाला बळी पडत नाही’; नार्वेकरांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
Rahul Narvekar : विधानसभेच्या अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. मंगळवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषदेत राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आज नार्वेकर […]
-
मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सर्वपक्षीय बैठकीवरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षण, राज्यातील आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. या बैठकीला शरद पवार, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित आहेत. मात्र उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) बोलवण्यात आलं नाही. यावरुन खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
-
Pramod Kamble : नगरच्या शिल्पकारानं बनवलेल्या सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं आज अनावरण
Pramod Kamble : सध्या देशात क्रिकेटचे (Cricket)महायुद्ध रंगले आहे. क्रिकेट वर्ल्डकप (World Cup 2023)सुरु आहे. यातच क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे (Sachin Tendulkar Statue)अनावरण आज बुधवारी (दि. 1) वानखेडे स्टेडियमवर केले जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेंतर्गत वानखेडे स्टेडियमवर उद्या 2 नोव्हेंबरला भारताचा श्रीलंकेविरुद्ध […]
-
Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा’; आमदार गडाखांनी केली मागणी
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासही राज्यात ठिकठिकाणी आंदोलन तसेच उपोषण सुरु आहे. नगर जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे (Manoj Jaragne) यांच्या उपोषणाला व मराठा आरक्षणाच्या मागणीला आमदार शंकरराव गडाख(Shankarao Gadakh) यांनी देखील आपला पाठिंबा दर्शिवला आहे. नेवासा येथे मराठा समाज बांधव साखळी उपोषणास बसले असून या उपोषण स्थळाला […]
-
Maratha Reservation : नवले पुलावर जाळपोळ; मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल!
Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलावर मराठा आंदोलकांनी जाळपोळ केल्याप्रकरणी आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड पोलिसांकडून 10 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. मराठा आंदोलकांनी काल नवले पुलावर प्रवासी वाहतूक थांबवत जाळपोळ केल्याची घटना घडली. या घटनेनंतर सिंहगड पोलिस ठाण्यात 10 जणांसह अन्य 400 ते 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली आणि […]
-
Maratha Reservation : उद्धव ठाकरेंना बैठकीला बोलावलं का? देसाईंनी स्पष्टच सांगितलं
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा (Maratha Reservation) करण्यासाठी आज राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली असून या बैठकीला सुरुवात झाली आहे. सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांना बोलावले पण, उद्धव ठाकरेंना निमंत्रण दिले नाही. यावरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका करत मुख्यमंत्री संकुचित मनोवृत्तीचे आहेत, असे म्हटले. त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी या […]
-
दिल्ली आणि मुंबईत वर्ल्डकप सामन्यांदरम्यान आतिशबाजी नाही, बीसीसीआयचा निर्णय
World Cup 2023 : मुंबईतील ढासळत्या एअर क्वॉलिटी इंडेक्सची मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यानंतर, बीसीसीआयने जाहीर केले की वर्ल्डकपमध्ये मुंबई आणि दिल्लीतील सामन्यांदरम्यान फटाके वाजवले जाणार नाहीत. कारण या आतिशबाजीने प्रदूषणाची पातळी वाढू शकते. गुरुवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंकेचा सामना होणार आहे. बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात पुढील सोमवारी दिल्लीतील अरुण […]
-
Tyler Christopher : हॉलिवूडवर शोककळा! अभिनेता टायलर ख्रिस्टोफरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Tyler Christopher Death: काही दिवसांपूर्वी प्रसिध्द अभिनेते मॅथ्यू पेरी यांचे निधन झालं आहे. पेरी यांच्या निधनाच्या हालिवूड सावरत नाही तोच आता आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. जनरल हॉस्पिटल आणि डेज ऑफ अवर लाइव्ह या लोकप्रिय शोसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता टायलर ख्रिस्टोफर (Tyler Christopher) याचे निधन झाले आहे. टायलरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याची […]
-
Maratha Reservation : ‘…तर पाणीही बंद करणार’; मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा अल्टिमेटम!
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत संध्याकाळपर्यंत फैसला झाला नाहीतर आजपासून पाणीही बंद करणार असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला अल्टिमेटम दिला आहे. दरम्यान, मागील आठ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं(Manoj Jarange Patil) आमरण उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे संतप्त मराठा आंदोलक तरुणांकडून आमदार, खासदारांचे घरे जाळली जात आहेत. अशातच आता सरकारने फैसला […]
-
Sanjay Raut : ‘घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच’; सरकारच्या ‘खेळी’वर राऊतांचा संताप
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) राज्यातील वातावरण तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरुच आहेत. काही जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर जोरदार हालचाली सुरू करण्यात आली आहे. आज सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. याच मुद्द्यावर ठाकरे गटाचे नेते प्रचंड संतापले असून सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाला या […]
-
Maratha Reservation : गाडीची तोडफोड; मंत्री हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया…
Maratha Reservation : मराठा आरक्षणाबाबत सरकारला लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागणार असल्याची प्रतिक्रिया वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Musrif) यांनी दिली आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत जाळपोळ, गाड्यांची तोडफोड करण्याचं सत्र सुरु आहे. अशातच आकाशवाणी आमदार निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची आज सकाळच्यादरम्यान गाडी फोडण्यात आली. […]
-
Israel Hamas War : निर्वासितांच्या छावणीवर इस्त्रायलचा एअर स्ट्राईक; 50 जण ठार
Israel Hamas War : इस्त्रायल आणि पॅलेस्टाइन यांच्यातील युद्ध (Israel Hamas War) अजूनही सुरुच आहे. हमासच्या अतिरेक्यांनी इस्त्रायलमध्ये रॉकेट हल्ले करत युद्धाला सुरुवात करून दिली. त्यानंतर खवळलेल्या इस्त्रायलने सडेतोड प्रत्युत्तर दिले. या युद्धात संपूर्ण गाझा पट्टी (Gaza) उद्धवस्त झाली आहे. इस्त्रायलने येथील पाणी, इंधन, वीज पुरवठा सगळं काही बंद केले आहे.या युद्धात इस्त्रायली नागरिक आणि […]
-
Maratha Reservation : जाळपोळनंतर आता गाड्या फोडण्याचं सत्र; मुश्रीफांची गाडी फोडली!
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या निवासस्थानासह गाड्यांवर हल्ले, जाळपोळ केल्याच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एका राजकीय नेत्याची गाडी फोडल्याचं समोर आलं आहे. मराठा आंदोलकांनी मुंबईतील आकाशवाणी निवासस्थानाबाहेर मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वैजापूरहून आलेल्या तीन जणांना पोलिसांनी ताब्यात […]
-
Uddhav Thackeray : ‘मोदी इस्त्रायल युद्धावर चिंता व्यक्त करतात पण’.. ठाकरे गटाचा हल्लाबोल
Uddhav Thackeray : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच (Maratha Reservation) पेटला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. मागील दोन दिवसात राज्यांत मोठ्या घडामोडी घडल्या. हिंसक आंदोलनेही झाली. तर दुसरीकडे मणिपुरात परिस्थिती अजूनही शांत झालेली नाही. जम्मू काश्मिरात आतंकवादी हल्ले सुरू आहेत, असे असताना भाजप मात्र पाच राज्यांतील […]
-
आता व्हॉट्सअॅपवरही व्हिडिओ फॉरवर्ड अन् बॅकवर्ड करता येणार; लवकरच येतंय नवं फीचर
Whatsupp : आता युट्यूबप्रमाणेच व्हॉट्सअपवरही आता व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येणार आहेत. व्हॉट्सअप कंपनीकडून एक फिचर लॉन्च करण्यात येणार आहे. युजर्ससाठी 10 सेकंदाच्या फरकाने मोठे व्हिडिओ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करता येऊ शकणार आहे. Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी Wabetainfo च्या या रिपोर्टमध्ये व्हॉट्सअॅपच्या नवीन फीचरचा स्क्रीनशॉटही दाखवण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपवर […]
-
जाळपोळीची घटना घडली तेव्हा कुटुंब..; क्षीरसागरांनी सांगितला अंगावर काटा आणणारा ‘तो’ प्रसंग
Maratha Reservation : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. शांततेत सुरू असलेल्या या ठा आंदोलनाला सोमवारी राज्याच्या अनेक भागात हिंसक वळण लागले. आमदार, लोकप्रतिनिधींची घरे, कार्यालये आणि वाहने जाळण्यात आली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेककरून वाहने जाळण्यात आली. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याही घरासह राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवून […]
-
Maratha Reservation : प्रशासन अलर्ट! आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीड, धाराशिव पाठोपाठ आता छत्रपती संभाजीनगरमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक […]
-
World Cup 2023: पुण्यात आज महामुकाबला; न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिका आमनेसामने
SA vs NZ: आज विश्वचषकामध्ये न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हे मैदान नेहमीच फलंदाजांसाठी उपयुक्त ठरले आहे. आजच्या सामन्यातही खेळपट्टीचा मूड असाच असणार आहे. पुण्याची खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक अनुकूल दिसते. वेगवान गोलंदाजही प्रभावी ठरु शकतात. खेळपट्टीवर चांगली उसळी आहे, स्विंग देखील मिळू […]
-
LPG Price Hike : दिवाळीआधीच दणका! LPG गॅसच्या दरात मोठी वाढ
LPG Price Hike : दिवाळीचा सण अगदी तोंडावर आला आहे. या काळातही महागाई (LPG Price Hike) कमी होण्याची शक्यता दिसत नाही. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला झटका (Inflation) बसला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर सुधारीत केले असून यामध्ये वाढ झाली आहे. आजपासून गॅस सिलिंडरच्या दरात 100 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत […]
-
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 1 November 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला […]
-
काँग्रेसची 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर, राष्ट्रीय नेत्यांना उतरवले विधानसभेच्या मैदानात
Rajasthan Congress : राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 56 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. यामध्ये पक्षाने उदयपूरमधून राष्ट्रीय प्रवक्त्याला तिकीट दिले आहे. याशिवाय काँग्रेसने सिवानामधून मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत पक्षाने एकूण 151 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. धोलपूर जिल्ह्यातील भासेरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने संजय कुमार जाटव यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान […]
-
बारामुल्लामध्ये दहशतवादी हल्ल्यात हेड कॉन्स्टेबल शहीद, घरात घुसून गोळी झाडली
Jammu Kashmir Police : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पोलीस कर्मचारी गुलाम मोहम्मद डार हे शहीद झाले आहेत. वेलू क्रालपोरा गावात दहशतवाद्यांनी त्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. डार हे पोलिसांत हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गुलाम मोहम्मद डार गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी एसडीएच तांगमार्ग येथे नेण्यात आले होते. […]
-
Maratha Reservation : ‘मराठा नाही, पण ब्राम्हण मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं’; फडणवीसांसाठी प्रसाद लाड यांची बॅटींग
Maratha Reservation : मराठा मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलं नाही पण ब्राम्हण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं असल्याचं प्रत्युत्तर भाजपचे आमदार प्रसाद लाड(Prasad Laad) यांनी मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांना दिलं आहे. मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावर आता प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. […]
-
अखेर पाकिस्तानने विश्वचषकात विजय मिळवला, बांग्लादेशचा 7 गडी राखून पराभव
World Cup 2023: विश्वचषकातWorld Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय? पाकिस्तानने बांग्लादेशचा दारुण पराभव केला आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर बांग्लादेशला 7 विकेट्सनी पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचबरोबर या विजयानंतर पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. बांग्लादेशविरुद्धच्या विजयानंतर बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर […]
-
Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय’; जरांगे पाटलांचा जोरदार निशाणा
Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीसांना काड्या करायची सवय असल्याचं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. एक उपमुख्यमंत्री कलाकार, सर्व भाजच विद्रुप करुन टाकला असल्याचंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात मराठा आंदोलकांकडून जाळपोळाच्या घटना घडल्याचं दिसून आलं. त्यानंतर आज मनोज जरांगे […]
-
मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचा मार्ग मोकळा; राज्य सरकारकडून GR निघाला
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांनी देखील सरकारला अल्टीमेटम दिला आहे. अशात आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी राज्य सरकारने GR काढला आहे. मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात होणार आहे. GR मध्ये काय म्हटले? […]
-
Maratha Reservation : बीडनंतर आता जालना जिल्ह्यातही इंटरनेट बंद
Jalna Internet Service Cut-जालना : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)मागणीसाठी राज्यात तीव्र आंदोलने सुरू आहेत. परंतु मराठवाड्यामध्ये त्याची धग जास्त आहे. मराठवाड्यात वाहनांची तोडफोड, जाळपोळ झाली आहे. बीड जिल्ह्यात दोन आमदारांची घरे जाळण्यात आली आहेत. बीडमध्ये संचारबंदी लागू करत इंटरसेवा बंद करण्यात आली आहे. आता जालना (Jalna) जिल्ह्यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या जिल्ह्यात […]
-
Maratha Reservation : आमदारांचं घर पेटवलं; 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वातावरण पेटताच बीड जिल्ह्यात आमदारांचं घर पेटवण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी 27 मराठा आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 27 जणांना पोलिसांनी बीड जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने या 27 मराठा आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच इतर 16 मराठा आंदोलकांचा पोलिस तपास घेत आहेत. एका […]
-
ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं कोल्हापुरात निधन
Rajabhau Shirguppe : साहित्य क्षेत्रामधून मोठी बातमी समोर आली आहे.ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं निधन झालं आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कोल्हापुरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस राजाभाऊ शिरगुप्पे मूळचे निपाणीचे होते. […]
-
एका लव्हस्टोरीचा द एन्ड : सचिन पायलट, सारा यांचा घटस्फोट; निवडणूक प्रतिज्ञापत्रातून आले उघडकीस
Sachin Pilot Divorced: दोन राजकीय मातब्बर घराण्यातील आणि जाती-धर्माच्या भिंती तोडणाऱ्या एका लव्हस्टोरीचा तब्बल वीस वर्षानंतर द एन्ड झाला आहे. राजस्थानचे काँग्रेसचे नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुला यांची मुलगी सारा (Sara Pilot) घटस्फोट झाला आहे. या दोघांचा घटस्फोट झाल्याचे पहिल्यांदाच पायलट यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून उघडकीस आले […]
-
Maratha Reservation : CM शिंदेंनी बोलावली सर्वपक्षीय बैठक, शरद पवारांसह अनेक नेत्यांना निमंत्रण
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचं आमरण उपोषण तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून जाळपोळच्या घटना घडत आहेत. अशातच आता राज्य सरकार अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून आले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्वच पक्षातील नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण […]
-
PM मोदींच्या पुणे दौऱ्याचा बोजा महापालिकेवर; एक कोटी 85 लाखांच्या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा यावर्षी 1 ऑगस्ट रोजी पुणे दौरा पार पडला. यावेळी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचा सोहळा, मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा आणि पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या उपस्थितीत पार पडला होता. पण पंतप्रधान मोदी यांचा हाच दौरा पुणे महापालिकेला तब्बस दोन कोटी रुपयांना पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र […]
-
Maratha Reservation साठी अभिनेत्री मैदानात; आता नाही तर कधीच नाही, लढ्याचा भाग होणे माझे कर्तव्य
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आंदोलनं आणि उपोषणं केली जात आहेत. त्यातच आता सेलिब्रेटी देखील या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. त्यात आई कुठे काय करते? या मालिकेतील अभिनेत्रीने देखील या आंदोलनामध्ये सक्रिय […]
-
महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव बंदी; ‘काळा दिवस’ निमित्ताने सीमेवरील वातावरण पुन्हा तापणार?
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी बेळगाव जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्रातील चार नेत्यांना बेळगाव जिल्हा बंदी लागू केली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, शंभुराज देसाई […]
-
एकही निर्णय मान्य नाही… अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha Reservation : राज्य सरकार उद्यापासून कुणबी दाखल्याची (Maratha Reservation) वाटप करणार आहे. पण सरकारच्या या भूमिकेला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी विरोध केला आहे. सरकारने घेतलेला आजचा एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी वाटू नयेत आणि वाटू दिले जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे. […]
-
मोठी बातमी : राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर; शिंदे सरकारचा निर्णय
मुंबई : राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेत या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाने यासाठी मंजुरी दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. (Shinde government’s decision […]
-
Nitesh Rane यांचा जरांगेंना फोन; म्हणाले, आरक्षण मिळत राहिल तुम्ही…
Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासाठीचे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगे यांच्या तब्येतीची चौकशी केली. तसेच ते म्हणाले की, आरक्षण मिळत राहिलं. हे सगळं तुमचंच श्रेय आहे. फक्त तुम्ही तब्येत सांभाळा बाकी काही नाही. काय म्हणाले नितेश राणे? यावेळी नितेश राणे म्हणाले की, नमस्कार, कसं काय? […]
-
‘फडणवीसांनी आधी राजीनामा द्यावा’; जाळपोळ घटनेवर एकनाथ खडसेंची सरकारला सुनावलं
Eknath Khadse Vs devendra Fadnvis : गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे(Eknath Khadse) यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादंग पेटलेलं असतानाच मराठा तरुणांकडून जाळपोळ करण्यात येत आहे. त्यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी […]
-
Hustle Season 3: अमरावतीच्या पोराच्या मराठी रॅपनं सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
Hustle Season 3: टीव्हीवरचा लोकप्रिय शो Hustle चा सिझन 3 (Hustle Season 3) जोरदार सुरु आहे. (Marathi Rap) देशाच्या विविध भागातील रॅपर्सना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी हा शो एक हक्काचं व्यासपीठ बनला आहे. यामध्ये रॅपर बादशाह (Baadshah), स्क्वॉड बॉस इक्का, डी एमसी, डिनो जेम्स आणि ईपीआर हे रॅप शोचं परिक्षण करत असल्याचे बघायला मिळत आहे. […]
-
Maratha Reservation : आंदोलक आक्रमक; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह नेत्यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच पेटला असून राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊना आपला राजीनामा दिला आहे. तर, काहींना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला, पण गुंतवणूकदारांचे भांडवल […]
-
चंद्राबाबू नायडू 52 दिवसांनंतर तुरुंगातून बाहेर; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
N Chandrababu Naidu : कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना आज (31 ऑक्टोबर) उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला. तुरुंगातून बाहेर येताच ते म्हणाले, हा स्नेह मी कधीच विसरणार नाही. त्यांना पाहण्यासाठी नायडू यांचे समर्थक तुरुंगाबाहेर जमले होते. नातू नारा देवांसही आजोबांना भेटायला आला होता. राजमुंद्री तुरुंगातून बाहेर […]
-
Nilesh Lanke : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार लंकेंचे मंत्रालयाबाहेर उपोषण
Nilesh Lanke : राज्यात (Maharashtra)मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation)मुद्दा चांगलाच पेटला आहे. राजकीय नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यातच राज्यातील काही आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी पुढे येऊन आपला राजीनामा (Regignation)दिला आहे. तर, काहींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांना पत्र लिहून मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन (special session)बोलावण्याची मागणी केली आहे. Maratha Reservation : […]
-
Maratha Protest : जाळपोळ करणाऱ्यांवर 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार, फडणवीसांचा इशारा
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रान पेटलं आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे(Manoj Jarange Patil) उपोषणाला बसले आहेत. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांकडून आमदार खासदारांचे घरे पेटवून दिल्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. जाळपोळ करणाऱ्यांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणार असल्याचा कडक इशारा देवेंद्र फडणवीस […]
-
Imraan Khan: ‘या’ दाक्षिणात्य विवाहित अभिनेत्रीच्या प्रेमात पडला अभिनेता
Imran Khan Viral Video: आमिर खानचा (Aamir Khan) भाचा बॉलिवूड अभिनेता इम्रान खान (Imran Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावरून गायब झाला आहे. अलीकडे इम्रान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जोरदार चर्चेत आला होता. त्याची पत्नी अवंतिकासोबतचा (Avantika Malik) त्याचा घटस्फोट जोरदार चर्चेत आला होता. View this post on Instagram A post shared by Instant Bollywood […]
-
Sensex; दोन दिवसांच्या वाढीनंतर सेन्सेक्स पुन्हा घसरला पण….
Stock Market Closing Bell: गेल्या दोन ट्रेडिंग दिवसांत शेअर बाजार दीड टक्क्यांनी सावरला होता. आज पुन्हा चढ-उतार दरम्यान शेवटच्या तासात तो ग्रीन झोनमधून रेड झोनमध्ये आला आणि नंतर सावरला नाही. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक (बीएसई सेन्सेक्स) आणि (निफ्टी 50) इंट्रा-डेमध्ये जवळपास अर्धा टक्का वाढले होते परंतु दिवसाच्या शेवटी ते रेड झोनमध्ये बंद झाले. मात्र, गुंतवणूकदारांच्या […]
-
Maratha Reservation : आरक्षणासाठी राजीनामा सत्र सुरूच…; ठाकरे गटाच्या नगरसेविकेनं दिला राजीनामा
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, यासाठी राज्यात आमदार-खासदार तसेच पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा सत्र (Resignation)सुरु करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)यांना पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation)नगरसेविका कमल सप्रे (kamal sapre)यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे (Dr. Pankaj Javle)यांच्याकडे सुपूर्द केला. Maratha […]
-
Iphone : हेरगिरी अन् हॅकिंगपासून असं संरक्षण करा; आयफोनच्या ‘या’ फिचरबद्दल माहितीये का?
Iphone : अॅपल आयफोन युजर्सचे फोन हॅक झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. देशातील अनेक बड्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर येत असतानाच आता आयफोनमधील एका फिचरमुळे तुम्ही हेरगिरी आणि हॅकिंगपासून संरक्षण करु शकणार आहात. आयफोनच्या या फिचरबद्दल जाणून घेऊयात… Chandrakant Patil : …’त्या’ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रही देण्यात येणार; चंद्रकांत पाटलांची माहिती आयफोनचे फोनमध्येच ‘लॉकडाऊन […]
-
चॅम्पियन्स ट्रॉफीतही इंग्लंडचे गणित बिघडले; विश्वचषकातील खराब प्रदर्शन भोवले
ICC Champions Trophy 2025: यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्या इंग्लंडची अवस्था वाईट आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. 2025 मध्ये पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरू शकेल का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पात्रतेबद्दल बोलायचे तर यजमान असल्यामुळे पाकिस्तान संघाला आपोआप पात्रता मिळाली आहे. उर्वरित 7 संघांची निवड […]
-
Maratha Reservation : ‘मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच’; CM एकनाथ शिंदेंचा घणाघात
Maratha Reservation : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असून त्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नसल्याचा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असतानाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. राज्यातील कॅबिनेट मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आरक्षणासाठी विनंती करा, अन्यथा राजीनामे द्या, […]
-
Chandrakant Patil : …’त्या’ मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्रही देण्यात येणार; चंद्रकांत पाटलांची माहिती
Chandrakant Patil : मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्री चंद्राकांत पाटील (Chandrakant Patil)यांनी बैठकीतील चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले की, मराठा आंदोलनामध्ये 40 दिवसांपूर्वी जुन्या नोंदी शोधून कुणबी दाखला देण्यासाठी. न्यायमुर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिता स्थापन करण्यात आली होती. त्याचा अहवाल त्यांन काल सादर केला. शिंदे समितीचा अहवाल स्विकारला… तो अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला. त्यानंतर तो […]
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला, ओबीसीही नाराज; राज्यातील प्रमुख पक्षांसाठी 2024 ची वाट बिकट?
Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चिघळला आहे. राज्यातील अनेक भागात हिंसक आंदोलने सुरू झाली आहेत. त्यात मराठवाड्यात आंदोलनाची धग तीव्र आहे. बीडमध्ये थेट आमदारांची घरे, पक्षांची कार्यालये जाळण्यात आली आहेत. येथील परिस्थितीत नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बीड, धाराशिव जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसीमधून (OBC reservation) आरक्षणाची […]
-
प्रमुख नेत्यांच्या फोन हॅकप्रकणाला नवं वळण; अलर्टचं कारण सांगण्यास अॅपलचा स्पष्ट नकार
Iphone Hacking : मागील काही दिवसांपूर्वी देशातल्या मोठ-मोठ्या नेत्यांचे फोन हॅक झाल्याचं समोर आलं होतं. या फोन हॅकिंगच्या प्रकरणाला नवं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. देशातल्या मोठ्या नेत्यांच्या आयफोनवर अलर्ट मेसेज आल्यानंतर अॅपल कंपनीने आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीकडून देण्यात येणाऱ्या धोक्याच्या सूचना चुकीच्या असू शकतात, असं स्पष्टीकरण कंपनीने दिलं आहे. Government Schemes : कांदाचाळ […]
-
‘हमास म्हणजे आधुनिक काळातील नाझी, गेल्या 16 वर्षांपासून पॅलेस्टिनींवर अत्याचार’
Israel Hamas War: गेल्या काही दिवसांपासून हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध आणखी तीव्र झाले आहे. यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. युद्ध थांबावं यासाठी सर्वच देशांनी आवाहन केले आहे. मात्र इस्रायलने हमासवर गंभीर आरोप लावले आहेत. गाझातील हमास हा आधुनिक काळातील नाझी आहे. या दहशतवादी गटाला युद्ध विराम नको आहे. ज्यू लोकांचा नाश करण्यात त्यांना […]
-
Raj Thackeray : प्रिय बंधू मनोज जरांगे पाटील, राज ठाकरेंचं जरांगे पाटलांना भावनिक पत्र…
Raj Thackeray : मराठा आरक्षणाच्या (maratha reservation)मागणीसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपसलं आहे. जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी आपलं आंदोलन आणखीच तीव्र केलं आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस चांगलीच बिघडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी मनोज जरांगे यांना भावनिक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला […]
-
Maratha Reservation : आंदोलनाला बळ! मंत्रालयाबाहेर 3 आमदारांचं उपोषण
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन आता चांगलेच पेटले आहे. राजकीय नेते आणि लोकप्रतिनिधींना या आंदोलनाचा फटका बसला आहे. लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देत काही आमदार आणि खासदारांनी राजीनामा दिला आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे. […]
-
Government Schemes : कांदाचाळ अनुदान योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
Government Schemes : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) कांदा पिकाची लागवड मुख्यत्वे करुन नाशिक(Nashik), अहमदनगर(Ahmednagar), पुणे (Pune), सातारा, सोलापूर, बुलढाणा, जळगाव व धुळे या जिल्ह्यात केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र व उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशांतर्गत गरजा भागवून भारतातून (India)कांद्याची मोठा प्रमाणावर निर्यात करुन बहुमोल असे परकीय चलन देखील प्राप्त होते. कांदा दिर्घकाळ टिकविणे. शेतकऱ्यांना (Farmer)रास्त […]
-
Maratha Reservation : ‘xx च्या उलट्या बोंबा’; उद्धव ठाकरेंना भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(udhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरेंच्या भूमिकेनंतर भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘याला म्हणतात xx च्या उलट्या बोंबा’ अशी टीका भाजपने केली आहे. यांसदर्भातील पोस्ट भाजपचे आपल्या एक्स हॅंडलवर केली आहे. मा. @Dev_Fadnavis जींनी मराठा […]
-
Salman Khan: सलमान खानने भाची अलिझेहच्या ‘फॅरी’ सिनेमाचा शेअर केला फर्स्ट लूक
Salman Khan Reveal Farrey Poster: अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी ‘टायगर 3’ या चित्रपटासाठी चर्चेत असतानाच, तो मामा होण्याचे कर्तव्य देखील उत्तम प्रकारे पार पाडत आहे. भाची अलिझेह अग्निहोत्रीची (Alizeh Agnihotri) सुलतान जामतारा फेम सौमेंद्र पाधी दिग्दर्शित ‘फरे’ (Farrey) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तर सलमान खानने आपल्या भाचीच्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त […]
-
Rahul Gandhi : …म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक केले जाताय; राहुल गांधींचा भाजप आरोप
Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधकांच्या फोन हॅकींगच्या मुद्दा आणि अदानींच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरलं आहे. सध्या विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहे. की अदानी समुहावर प्रश्न उपस्थित केल्याने विरोधकांचे फोन हॅक केले जात आहेत. त्यावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार निशाणा साधला. …म्हणूनच विरोधकांचे फोन हॅक यावेळी बोलताना राहुल […]
-
Sanjay Raut : अजितदादांना राजकीय डेंग्यू, फडणवीसांनी राजीनामा द्यावा; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) राज्यात ठिकठिकाणी आंदोलन हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फैलावर […]
-
Vikram Gokhale: विक्रम गोखलेंचा अखेरचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, ‘सुर लागू दे’चा पोस्टर प्रदर्शित
Vikram Gokhale New Marathi Movie Sur Lagu De : मराठी अभिनेता विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचा ‘सूर लागू दे’ (Sur lagu De) हा मराठी सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. (Marathi Movie) आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. (Vikram Gokhale Last Movie) पोस्टर प्रदर्शित झाल्याने चाहत्यांची आता या सिनेमाची प्रतीक्षा वाढत असल्याचे […]
-
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार? शिंदे सरकारचे कॅबिनेटमध्ये तीन मोठे निर्णय
मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या न्या. संदीप शिंदे समितीचा प्रथम अहवाल शिंदे सरकारने स्वीकारला असून आता कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आज (31 ऑक्टोबर) पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (Three major decisions of the Shinde […]
-
Maratha Reservation चा आणखी एक बळी; चिठ्ठीत म्हणाला, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी…
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) सकल मराठा समाज बांधव दिवसेंदिवस अत्यंत आक्रमक होऊ लागला आहे. यातच आरक्षणासाठी अनेकांकडून टोकाचे पाऊल उचलले जाऊ लागले आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात एकाने आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज संगमनेरात एका तरुणाने आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चिठ्ठी लिहित या तरुणाने घेतला गळफास […]
-
‘सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल’; शाहू महाराज छत्रपतींनी घेतली जरांगेंची भेट
Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. आज शाहू महाराज छत्रपती यांनी आंतरवाली सराटी येथे येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी त्यांनी सरकारला आपली मागणी मान्य करावीच लागेल असे स्पष्ट शब्दांत सांगितले. तसेच मनोज जरांगे यांनीही कोणत्याही परिस्थितीत अर्धवट […]
-
Priyanshu Panuli: प्रियांशू पैन्युलीने त्याच्या आगामी प्रोजेक्ट’ची शेअर केली एक झलक
Priyanshu Panuli shares BTS Photo: ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलांग व्हॅली’, मिर्झापूर (Mirzapur), एक्स्ट्रॅक्शन आणि भावेश जोशी मधील अशा त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता प्रियांशू पैन्युली (Priyanshu Panuli ) हा त्याच्या अनोख्या आणि तितक्याच वेगवेगळ्या भूमिकासाठी ओळखला जातो. तो आता आगामी शो “पान परदा जर्दा” मध्ये (Paan Purda Zarda Movie) नवीन भूमिका […]
-
‘पंतप्रधानांपुढे प्रश्न मांडा अन्यथा राजीनामे द्या’ : मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्राच्या मंत्र्यांकडे ठाकरेंची मागणी
मुंबई : केंद्रीय कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना विनंती करावी अन्यथा राजीनामे द्यावे, असे आव्हान शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मोदी कॅबिनेटमधील महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांना दिले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी संसदेचे विशेष अधिवेशनही बोलाविण्यात यावे अशी मागणी […]
-
लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे… संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा! उद्धव ठाकरेंची मागणी
मुंबई : लोकसभेतून मराठा आरक्षण देणे खूप सोपे आहे, त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावे अशी मागणी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. राज्यातील मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. (Shiv Sena (UBT) chief Uddhav Balasaheb Thackeray has demanded that a special session of Parliament […]
-
Maratha Protest : आंदोलनाचे लोण पुण्यापर्यंत, नवले पुलावर जाळपोळ; वाहतूक विस्कळीत
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागात आंदोलक आक्रमक झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. काल (दि.30) बीडसह मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या असून, आता याचे लोण पुण्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी शहरातील नवले पुलावर (Nawale Bridge) टायरची जाळपोळ करण्यात आली आहे. आंदोलकांनी सातऱ्याकडून मुंबईकडे आणि साताऱ्याकडे जाणारी […]
-
Dunki Teaser Release date: किंग खानच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळणार खास गिफ्ट
Dunki Teaser Release Date: शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच चाहत्यांचा लाडका किंग खान त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’मुळे (Dunki Movie ) सध्या जोरदार चर्चेत आहे. आता या चित्रपटाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे, त्याने चाहत्यांना मोठं गिफ्ट दिल आहे. या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानच्या वाढदिवसाला प्रदर्शित होणार असल्याची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. म्हणजेच […]
-
Maratha Reservation ची मशाल नगरमध्येही पेटली; सकल मराठा अहमदनगर तर्फे उपोषण सुरु…
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. आरक्षण मिळावे यासाठी नगर शहरात देखील आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज यांच्या वतीने आज अहमदनगर शहरात मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नगर शहरातील माळीवाडा येथील बसस्थानका जवळील छत्रपती शिवाजी […]
-
Maratha Reservation : राजीनामा सत्र सुरुच! आतापर्यंत चार आमदार अन् दोन खासदारांनी उपसलं हत्यार
मुंबई : मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राजकीय नेत्यांचे राजीनामा सत्र सुरु असतानाच यात आणखी तीन आमदारांची भर पडली आहे. शिवसेनेचे (Shivsena) वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, जुन्नरचे राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार अतुल बेनके आणि काँग्रेसचे (Congress) परभणीचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी आज विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून त्यांनी राजीनामा […]
-
Maratha Reservation चा मुद्दा पेटला, ठिकठिकाणी लालपरीला लागला ब्रेक!
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सकल मराठा समाज दिवसेंदिवस आक्रमक होऊ लागला आहे. यातच अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडत आहेत. यामुळे आता प्रशासन देखील सावधगिरीची भूमिका घेत आहे. आंदोलकांकडून महामंडळाच्या बसेस टार्गेट केल्या जात. असल्याच्या घटनांमुळे नगर जिल्ह्यातील लालपरीची अर्थात राज्य महामंडळाच्या बसेसला आता ठिकठिकाणी ब्रेक लागतो आहे. खबरदारीची भूमिका म्ह्णून अनेक ठिकाणी […]
-
‘द टायगर इफेक्ट’ बॉक्स ऑफिसवर गणपत पलिकडे जाणारा टायगर श्रॉफचा अनोखा प्रवास!
Tiger Shroffs Ganpath Movie Journey: बॉलीवूडमध्ये (Bollywood) प्रत्येक फ्रायडेला सिनेमाचं आणि कलाकारच भवितव्य ठरवलं जात असत. बॉक्स ऑफिसच्या (Box Office) इन्कमवर देखील प्रत्येक कलाकार आणि सिनेमा यांची प्रतिमा ठरवली जात असते. टायगर श्रॉफचा (Tiger Shroffs) त्याचा अलीकडील सिनेमा ‘गणपथ’ ने (Ganapath Movie) फार अपेक्षित कमाई केली नसली तरी देखील त्याची कलाकारी कारकिर्दी ही बॉक्स ऑफिसवर […]
-
Bigg Boss 17 च्या घरात सुशांत सिंग राजपुतसोबतच्या नात्याबद्दल अंकिताने सोडलं मौन, म्हणाली…
Bigg Boss 17 : बिग बॉस (Big Boss 17 ) हा रिअॅलिटी शो नेहमीच चर्चेचा ठरत असतो. यामध्ये असणारे सर्वच स्पर्धकांची काहीना काही खासियत असते. तसेच अनेक चर्चित चेहरे यामध्ये घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच हा शो चर्चेत आणि वादात देखील सापडतो. त्यात अंकिता लोखंडे आणि विकी जैन ही सुपरहिट जोडीने बिग बॉसच्या घरात एंट्री […]
-
Sanjay Raut : ‘मुख्यमंत्री अपयशी, त्यांनी राजीनामा द्यावा’; राऊतांनी केली मागणी
Sanjay Raut : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. आता मुख्यमंत्र्यांनीच राजीनामा द्यावा […]
-
Short And Sweet: सोनाली कुलकर्णीचे आई-बाबा झळकणार ‘शॉर्ट अँण्ड स्वीट’मध्ये
Sonali Kulkarni Movie Short And Sweet : सध्या प्रेक्षक गणेश दिनकर कदम (Ganesh Kadam) दिग्दर्शित ‘शॅार्ट अँड स्वीट’ (Short And Sweet) या मराठी सिनेमाचे (Marathi Movie ) चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. या सिनेमात सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत, यामध्ये आणखीही दोन नवीन […]
-
जरांगेंना मदत करणं आमदार पुत्राच्या अंगलट; ‘फोन पे’ वरून येणाऱ्या चिल्लर पैशांमुळे वैतागला
सोलापूर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, गेल्या सात दिवसांपासून त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. तीव्र आंदोलनापूर्वी जरांगे पाटलांनी राज्यतील विविध भागात जात सभा घेतली होती. जरागेंची सोलापूर जिल्ह्यातील माढा मतदार संघात सभा झाली होती. या सभेला अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार बबनराव शिंदेंच्या (MLA […]
-
Maratha Reservation : CM शिंदेंचा फोन; कापत्या आवाजात जरांगेंनी सांगितलं नेमकी काय चर्चा झाली….
जालना : महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अर्धवट आरक्षण आम्ही घेणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सांगितले आहे अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि जरांगे यांची आज (31 ऑक्टोबर) सकाळी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी या चर्चेत नेमके काय […]
-
Ahmednagar News: पाणीप्रश्न पेटणार! विरोध…आंदोलन…तरी नगरहून आज जायकवाडीला पाणी सोडणार
Ahmednagar News: मराठवाड्याला (Marathwada) पाणी सोडण्यात येऊ नये यासाठी नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) अनेक आंदोलने झाली विरोध झाला मात्र आता हा पाणीप्रश्न पेटणार असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. कारण विरोध असूनही आज मराठवाड्यासाठी नगर, नाशिकच्या धरणातून (Nashik Dam) जायकवाडीत (Jayakwadi Dam) पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान आज नगर, नाशिकच्या धरणातून एकूण 8.603 […]
-
Cash For Query : ‘सरकारकडून माझा फोन हॅक करण्याचा प्रयत्न’; महुआ मोईत्रांच्या आरोपाने खळबळ!
Cash For Query : कॅश फॉर क्वेरी प्रकरण आता अधिकच (Cash For Query) चिघळत चालले आहे. लोकसभेच्या वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांना दिल्याचे मान्य केल्यानंतर खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ई मेल हॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. मला अॅपल कंपनीकडून […]
-
फडणवीसांचा छत्तीसगड प्रचार दौरा वादात; महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडल्याचा विरोधकांचा आरोप
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा छत्तीसगड (Chhattisgarh) प्रचार दौरा वादात सापडला आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलन तीव्र झाले आहे. मराठवाड्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले आहेत. नेत्यांच्या घरांना आणि वाहनांना आग लावली जात आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांची तोडफोड करण्यात येत आहे. त्याचवेळी फडणवीस छत्तीसगडमध्ये भाजपच्या प्रचाराला गेल्याने […]
-
Maratha Reservation : ’40 दिवस सरकार अजगरासारखे सुस्त पडले होते’; वडेट्टीवारांचा घणाघात
Vijay Wadettiwar on Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन (Maratha Reservation) हिंसक बनले आहे. मराठवाड्यात या आंदोलनाची धग जास्त आहेत. बसेसची तोडफोड आणि लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत. या सगळ्या घडामोडींवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिंदे-फडणवीस सरकार 40 दिवस […]
-
World Cup 2023 : विजयाचा षटकार तरीही संकटात टीम इंडिया; ‘या’ 4 समस्यांचं उत्तर काय?
World Cup 2023 : विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (World Cup 2023) सुरूच आहे. इंग्लंडचा पराभव करत भारतीय संघाने विजयाचा षटकार लगावला. या स्पर्धेत फक्त भारतीय संघच (Team India)असा आहे ज्याने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. आता भारताचे आणखी तीन सामने बाकी आहेत. त्यानंतर सेमी फायनलचा टप्पा सुरू होणार आहे. सध्या भारतीय संघ मजबूत दिसत […]
-
Manoj Jarange : मोठी बातमी! CM शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन; जरांगेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Manoj Jarange : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन राज्यभरात चिघळलेले (Manoj Jarange) असतानाच आताच्या घडीला एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना फोन करत त्यांच्याशी चर्चा केली आहे. या दोघांत नेमकी काय चर्चा झाली याची संपूर्ण माहिती अद्याप समोर आलेली नाही. आज सकाळी मनोज जरांगे पाटील थोड्याच वेळात […]
































































































