- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Horoscope Today 17 June 2023: ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 17 June 2023: आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे तुम्हाला वाटेल. […]
-
अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला नियोजित षडयंत्र, केदार दिघेंचा शिंदे गटावर आरोप
Ayodhya Pol attack : ठाकरे गटाच्या युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करुन मारहाण करण्यात आली आहे. यावरुन ठाकरे गटाचे ठाकरे जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ला एक षडयंत्र आहे, असा आरोप केला आहे. अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्यानंतर केदार दिघे यांनी पोलीस स्टेशन गाठले […]
-
मान्सूनने फिरवली मुंबईकरांकडे पाठ, जाणून घ्या हवामान खात्याचा ताजा अंदाज
Monsoon in Mumbai: गेल्या काही दिवसांपासून बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हलका पाऊस पडत होता. परंतु आता चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने हवेतील आर्द्रता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून 10 दिवस उशिराने मुंबईत दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण-पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या दिशेत कोणताही बदल न झाल्याने मुंबईत मान्सूनने उदासीनता […]
-
अभिमानास्पद! अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाहेर फडकला तिरंगा
Prime Minister Narendra Modi’s visit to America : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20-24 जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर तिरंगा ध्वज फडकताना दिसत आहे. नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. नरेंद्र मोदी 20 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेत असतील. पंतप्रधान अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार […]
-
Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या नेत्या अयोध्या पोळ यांना ठाण्यात शाईफेक करत मारहाण
Ayodhya Pol : ठाकरे गटाच्या फायरब्रँड युवा नेत्या अयोध्या पोळ (Ayodhya Pol) यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर पोळ यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू भक्कमपणे मांडली आहे. यापूर्वीही त्यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली असल्याचा आरोप आहे. ठाणे-कळवा (Thane Kalwa) येथील मनिषा नगर भागात ही घटना घडली आहे. […]
-
आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘टॉप ऑफ माउंट एव्हरेस्ट’ व्हिडिओ; पाहून थक्क व्हाल
Anand Mahindra : प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर नेहमीच अनोखे आणि मनोरंजक व्हिडिओ पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. आता त्यांनी जगातील सर्वोच्च पर्वतशिखर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या माउंट एव्हरेस्टचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ वरून एव्हरेस्ट शिखर दाखवत आहे. हे दृश्य पाहणे खरोखरच एक अद्भुत अनुभव आहे. या व्हिडिओला सोशल मीडिया युजरकडून खूप पसंती मिळत […]
-
सिद्धरामय्या महाराष्ट्रातून लोकसभेचे रणशिंग फुंकणार ! एक सभा घेणार, पवारांनाही भेटणार
Siddaramaiah : कर्नाटकमध्ये काँग्रेसने भाजपला रोखले आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे. कर्नाटकच्या विजयात मोठा वाटा असलेले व मुख्यमंत्री झालेले सिध्दरामय्या यांना आता काँग्रेसने दुसऱ्या राज्यात सक्रीय केले आहे. सिद्धरामय्या (Siddaramaiah) हे महाराष्ट्रात येणार आहेत. ते एक सभा घेणार आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Shard Pawar) यांनाही भेटणार आहेत. (karntaka siddaramaiah-sangli-loksabha-meet-sharad-pawar) […]
-
BCCIच्या माजी प्रमुखांवर अंबाती रायुडूचा मोठा आरोप, म्हणाला ‘माझं करिअर खराब करण्याचा प्रयत्न केला’
अंबाती रायुडूने आयपीएल 2023 नंतर क्रिकेटला अलविदा केले. तो या हंगामात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. मात्र, निवृत्तीनंतर अंबाती रायडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरं तर, बीसीसीआयचे माजी अंतरिम प्रमुख आणि टीम इंडियाकडून खेळणारे शिवलाल यादव यांच्यावर अंबाती रायडूने मोठा आरोप केला आहे. शिवलाल यादवने सुरुवातीच्या दिवसांत आपलं करिअर खराब करण्याचा […]
-
हंगामाच्या नमनालाच बियाण्यासाठी शेतकऱ्यांवर भटकंतीची पाळी, अजित – १५५ बीटी बियाण्याचा तुटवडा; साठेबाजी की टंचाई?
अकोला : निम्मा जून महिना उलटून गेला तरी मृगाच्या पावसाचा अद्यापही थांगपत्ता नाही. मान्सूनचे (Monsoon) यंदा 11 जून रोजी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, अद्यापही अद्याप पाऊस झालेला नाही. त्यामुळे येऊ घातलेल्या खरीप हंगामाची (Rainy season) अद्याप सुरुवात झाली नाही. कोरडवाहू क्षेत्रात कपाशीच नव्हे तर अन्य वाणांचा दाणाही पडला नाही. तथापि, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या […]
-
बीआरएसचा धोका ओळखला ! महाविकास आघाडीत आणखी पक्ष येणार
प्रफुल्ल साळुंखे-विशेष प्रतिनिधी Congress: आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला दलित आणि मुस्लिम मतांची जुळवणी करावी लागणार आहे. या मतांचे विभाजन झाल्यास काँग्रेसला (Congress) मोठा फटका बसतो हे गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिसले आहे. यासाठी काँग्रेस आता नव्या भिडूच्या शोधत आहे. आमच्याबरोबर काही समविचारी पक्ष येतील, अशा नेत्यांसोबत बोलणी सुरू असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना […]
-
फडणवीस अजूनदेखील विसरले नाही, भर सभेत स्वतःचा केला मुख्यमंत्री म्हणून उल्लेख
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद जाऊन साडेतीन वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला असला तरी ते स्वतःला अजूनदेखील मुख्यमंत्री समजतात. आज धाराशिव येथे मोदी@९ निमित्त विशाल जाहीर सभा झाली या सभेत बोलताना फडणवीसांनी स्वतःचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केला. नंतर सारवासारव करत उपमुख्यमंत्री असा केला. (Fadnavis still did not forget, referred to himself as Chief Minister in […]
-
‘आदिपुरुष’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदू सेनेची हायकोर्टात याचिका
Adipurush controversy : ‘आदिपुरुष’ चित्रपटावरुन सुरु झालेला वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही आहे. चित्रपटाच्या टीझरवरून सुरू झालेला वाद रिलीज झाल्यानंतरही सुरूच आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसोबतच चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र न देण्याचे […]
-
कल्याणमधील भाजप-शिवसेना युतीतील वाद मिटताच श्रीकांत शिंदे पुन्हा अॅक्टिव, शनिवारी घेणार मेळावा
Shrikant Shinde : कल्याणमध्ये भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) यांच्यात मिठाचा खडा पडला होता. आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. तसेच मानपाडा पोलिस ठाण्यातून सक्तीच्या रजेवर पाठवलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे निलंबित होत नाही, तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव भाजपने केला होता. हा वाद केंद्रापर्यंत पोहोचला. […]
-
Ashes 2023: नॅथन लियॉनच्या चेंडूवर विचित्र पद्धतीने आऊट झाला हॅरी ब्रूक, पाहा व्हिडिओ
Ashes 2023: चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला जात आहे. एजबॅस्टनच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. खरं तर, ऑस्ट्रेलियन ऑफस्पिनर नॅथन लायनने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूकला ज्या पद्धतीने बाद केले […]
-
सावरकरांचा अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? देवेंद्र फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारने गुरुवारी (15 जून) दोन महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि स्वातंत्र्यावीर सावरकर यांच्यावरील धडा अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आणि दुसरा निर्णय म्हणजे धर्मांतर विरोधी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर […]
-
‘शिंदे हे मुख्यमंत्री होणार, हे फडणवीस यांना माहित नव्हतं’ : देशमुख यांनी भाजपला चोळले मीठ
Nitin Deshmukh : 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 समर्थक आमदारांना सोबत घेऊन शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळलं. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सिंहासन भेटलं, तर मी पुन्हा येईल असं म्हणणारे देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. भावी मुख्यमंत्री मानल्या जाणाऱ्या फडणवीसांनी आपणहून […]
-
Indonesia Open 2023: साईराज-चिरागची चमकदार कामगिरी, उपांत्य फेरीत धडक
Satwiksairaj & Chirag Shetty: भारतीय दिग्गज खेळाडू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीने इंडोनेशिया ओपन 2023 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, परंतु किंदाबी श्रीकांत पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चीनच्या ली शी फेंगने इंडोनेशिया ओपन वर्ल्ड टूर सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडू किंदाबी श्रीकांतचा पराभव केला. मात्र, […]
-
चरणमाळ घाटात अवैध दारुच्या वाहतुकीवर मोठी कारवाई, २२ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हा दाखल
नंदुरबार : अवैध दारूच्या वाहतूकीवर (Illegal Liquor Traffic) नवापूर पोलीसांनी (Nawapur Police) जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील ((Superintendent of Police P. R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई करुन २२ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई चरणमाळ घाटात करण्यात आली. अवैध वाहतूक करत असतांना वाहन सोडून पळून गेलेले पाच संशयीत […]
-
Mohit Kamboj : मोहित कंबोज यांच्यावरील फसवणुकीचे सर्व गुन्हे रद्द, सीबीआयने दिली क्लीन चिट
Mohit Kamboj : कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारे भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj)यांना आता सीबीआयने (CBI) मोठा दिलासा दिला. गेल्या काही महिन्यांपासून तपास यंत्रणा मोहित कंबोज यांची चौकशी करत होत्या. मात्र, आज त्यांना सीबीआयकडून क्लीन चीट मिळाली आहे. कंबोज यांच्यावर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. (All charges of financial fraud against […]
-
बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा भेटणार, फडणवीसांचा महत्वपूर्ण निर्णय
महाविकास आघाडीच्या काळात कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आमच्या सरकारने बारामतीकरांनी अडविलेले पाणी मराठवाड्याला पुन्हा दिले. कृष्णा- मराठवाडा सिंचन प्रकल्पाची पाहणी देवेंद्र फडणवीस यांनी केली, यावेळी ते बोलत होते. कृष्णा – मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे येत्या एक वर्षात नागरिकांपर्यंत पोहोचेल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मी मुख्यमंत्री असताना कृष्णा- मराठवाडा सिंचन […]
-
Ahmednagar Fire : शहरातील आगीच्या घटनेला आमदार जगतापांनी धरले मनपा आयुक्तांना जबाबदार
Ahmednagar Fire : अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू होतं. ( MLA Sangram Jagtap held […]
-
आधी अत्याचार, मग बंदुकीचा धाक दाखवून इस्लाम कबुल करण्याची धमकी
Threat to a minor girl : महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या (Sexual assault) घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात कितीही कठोर कायदे केले तरी या घटना थांबतांना दिसत नाही. काल मुंबईतील धावत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना ताजी असतांनाच आता एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation)करून तिला बनावट बंदूक दाखवून इस्लाम धर्म स्वीकारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण […]
-
सुट्टीदिवशी कष्ट केलं, पुस्तक घेतली अन् लक्ष्मी शाळेत पहिली आली… एका संघर्षाची प्रेरणादायी कहाणी
विष्णू सानप : घरात अठरा विश्व दारिद्र्य. आई-वडीलांचे हातावरील पोट. घरात सात पिढ्यात कोणी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं नाही. पण शिक्षणाची आवड असलेल्या लक्ष्मीच्या यश डोळे दिपणारे आहे. तिने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर परिस्थितीवर मात करत दहावीच्या परीक्षेत 92 टक्के मार्क मिळवले. इतकंच नाही तर ती शाळेतही पहिली आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वेलतुरा हे लक्ष्मीचे […]
-
अमेरिकन संसदेतही आता घुमणार जय श्रीरामचा जयघोष! श्री ठाणेदार करणार हिंदू गटाची स्थापना
वॉशिंग्टन : भारतीय वंशाचे अमेरिकी खासदार श्री ठाणेदार यांनी येथील संसदेत हिंदू राजकीय गट स्थापन करण्याची घोषणा केली आहे. समविचारी खासदारांना एकत्र आणण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. अमेरिकेतील हिंदू समुदायाचे द्वेष आणि कट्टरतावादापासून संरक्षण करणे, हा याचा उद्देश आहे, असे ठाणेदार म्हणाले. कॅपिटॉल हिल येथे आयोजित पहिल्या हिंदू-अमेरिकी संमेलनात बुधवारी (ता. 14) रोजी ठाणेदार […]
-
मोदींच्या दौऱ्याआधीच गुडन्यूज! चीनला टाळून अमेरिकन कंपनी भारताच्या दारात
Narendra Modi America Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अमेरिका दौऱ्याआधीच मोठी गुडन्यूज मिळाली आहे. भारताला थोडेथोडके नाही तर तब्बल एक अब्ज डॉलर्सचे रिटर्न गिफ्ट मिळाले आहे. अमेरिकन चिप मेकर मायक्रोन टेक्नॉलॉजी कंपनीने एक अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. चीन आणि अमेरिकेत सुरू असलेल्या तणावाचा असा फायदा भारताला मिळाला आहे. आगामी काळात […]
-
Aurangzeb Photo Controversy: कोल्हापूर, अहमदनगरनंतर लातूरमध्येही औरंगजेबाच्या स्टेटसवरुन वाद
Aurangzeb Photo Controversy in latur : राज्यात औरंगजेबाचे स्टेटस ठेवण्याचा वाद काही केल्या शांत होण्याचे नाव घेत नाही आहे. कोल्हापूर आणि अहमदनगरनंतर आता लातूरमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणाचा शिवप्रेमींनी निषेध नोंदवला आहे. हे प्रकरण लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावचे आहे. औरंगजेबचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. लातूरच्या किल्लारी […]
-
फक्त नेहरु मेमोरियलच नाही तर मोदींच्या काळात यांचीही नावे बदलली; वाचा यादी
PM Modi Tenure : दिल्लीतील नेहरू स्मारकाचे नामकरण करण्यात आले आहे. आता नेहरू स्मारक पीएम मेमोरियल म्हणून ओळखले जाईल. नामांतरावरून काँग्रेसने सरकारवर हल्लाबोल केला आहे. नावातील बदल हा सूडभावना आणि संकोचवादाचा परिणाम असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी आता पंतप्रधानांचे संग्रहालय आणि सोसायटी म्हणून ओळखली जाईल. अशा प्रकारे एखाद्या ठिकाणाचे नाव बदलण्याची […]
-
Ashish Shelar : ‘उबाठा’ काय वगळणार? काँग्रेस की सावरकर? सावरकरांंचा धडा वगळल्याने शेलार आक्रमक
Ashish Shelar : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे.(Karnataka Remove Savarkars Lesson) त्यावर आता भाजपने (BJP) हा मुद्दा उचलून धरत कॉंग्रेस ( Congress) आणि उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackrey)टीका करायला सुरूवात केली आहे. त्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. […]
-
अदानी समूहाच्या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमींचा आक्षेप, कोळसा खाणीबाबत ‘अदानी’च्या हितासाठी घाईने सुनावणी
Coal Mines : नागपूरमधील कोराडी येथील 2×660 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्पाला विरोध होत असतांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे (Maharashtra Pollution Control Board)13 जुलै रोजी कोळसा खाणीबाबत (Coal Mines)जनसुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे अदानी समूहाला संबंधित खाण मिळाली आहे. अदानी समूहाच्या (Adani Group)खाणीला परवानगी द्यायची असल्यानं कोराडी येथील प्रस्तावित प्रकल्पाची सुनावणी एवढ्या घाईगडबडीत झाल्याचा संशय पर्यावरणवाद्यांनी […]
-
IPL नंतर MPL मध्ये ऋतुराज गायकवाडची तुफानी खेळी, पाहा व्हिडिओ
महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 चा पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. या सामन्यात पुणेरी बाप्पा संघ कोल्हापूर टस्कर्ससमोर होता. ऋतुराज गायकवाडच्या कर्णधार असलेल्या पुणेरी बाप्पाने कोल्हापूर टस्कर्सचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर टस्कर्स संघाने पुणेरी बाप्पासमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. याला प्रत्युत्तर म्हणून फलंदाजीला आलेल्या पुणेरी बाप्पाने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या शानदार खेळीमुळे […]
-
आधी चव्हाण, आता पटोलेंची दिल्लीवारी; काँग्रेसमध्ये पुन्हा खांदेपालट होणार?
Maharashtra Congress : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ येत असल्याने राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. मतदारसंघांची चाचपणी सुरू आहे. नेतेमंडळींच्या दिल्ली वाऱ्या सुरू झाल्या आहेत. काँग्रेसच्या गोटातही जोरदारी हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेस आमदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) दिल्लीत जाऊन आल्यानंतर लगेचच नाना पटोले (Nana Patole) यांनी सुद्धा दिल्ली गाठली आहे. […]
-
रोहित पवार-राम शिंदें यांच्या कार्यकर्त्यांतील वाद टोकाला ! फेसबुक कमेंटवरून भिडले
Ahmednagar Crime: आमदार राम शिंदे (Ram Shinde) व आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांच्या कार्यकर्त्यांमधील वाद टोकाला गेला आहे. राम शिंदेंचे समर्थक व भाजपचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे (Sachin Potare) व त्यांच्या मुलाला मारहाण झाली आहे. आमदार रोहित पवारांच्या विरोधात फेसबुकवर कमेंट केल्याने मारहाण झाल्याचा आरोप पोटरे यांचा आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात […]
-
मोदींनंतर आता पवारांच्या नावानेही होणार स्टेडियम? गहुंजेच्या नामांतर मागणीने धरला वेग
महाराष्ट्रात सध्या नाव बदलण्याचे वारे सुरु आहे. काही महिन्यापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून त्याला छत्रपती संभाजीनगर असे नाव देण्यात आले तसेच उस्मानाबाद या शहराचे नाव बदलून धाराशिव नाव देण्यात आले. तसेच काही दिवसापूर्वी महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची घोषणा मुखमंत्र्यांनी केली. तसेच देशातील सर्वात मोठ्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला नरेंद्र मोदींचे […]
-
अमरावती महानगरपालिकेत परीक्षा न देताच मिळणार नोकरी, महिन्याला 75 हजार रुपये पगार
Amravati Municipal Corporation Recruitment : आजच्या स्पर्धेच्या काळात नोकरी मिळवणं हे महाकठीण काम आहे. मात्र, नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, अमरावती महानगरपालिकेने (Amravati Municipal Corporation) आता विविध पदांची भरती जाहिर केली आहे. यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ही भरती पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट आणि ANM […]
-
Mumbai Water Supply : मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट, पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जेमतेम साठा शिल्लक
Mumbai Water Supply : यंदा जूनचा दुसरा आठवडा उलटून गेला तरी देखील राज्यात मान्सूनच्या पावसाची (monsoon rains)चिन्हे नाहीत. 11 जून रोजी महाराष्ट्रात दाखल झालेला मान्सून कोकणात स्थिरावला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल तूर्तास थांबली असून तो आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. त्यामध्ये आता राज्याची […]
-
पवारांना मी धमकी दिली नाही; सुप्रिया सुळें अन् रोहित पवारांविरोधात मानहानीचा दावा करणार : सौरभ पिंपळकर
Saurabh Pimpalkar On Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दोन काही दिवसांपूर्वी ट्विटरवरुन धमकी आली होती. यानंतर त्यांच्या कन्या आणि राष्ट्र्वादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिसांची भेट घेत तक्रार दाखल केली होती. यामध्ये अमरावतीच्या सौरभ पिंपळकर याने ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर आता सौरभ पिंपळकर […]
-
Manipur Violence: मणिपूरमध्ये जमाव हिंसक, केंद्रीय मंत्र्यांच्या घराला लावली आग
Manipur Violence: मणिपूरमधील केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आणि शिक्षण राज्यमंत्री डॉ. राजकुमार रंजन सिंह (RK Ranajn Singh) यांच्या निवासस्थानावर गुरुवारी (15 जून) रात्री उशिरा जमावाने हल्ला केला. जमावाने इंफाळमधील कोंगबा येथील मंत्र्यांच्या निवासस्थानाची तोडफोड केली आणि जाळपोळ केली. जमावाने हल्ला केला त्यावेळी मंत्री राजकुमार रंजन सिंह हे निवासस्थानी उपस्थित नव्हते. या घटनेवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले […]
-
Kangana Ranaut: पंगा क्विन कंगना लग्नाच्या बेडीत अडकणार? म्हणाली, ‘लग्न करण्याची इच्छा आहे, पण…’
Kangana Ranaut On Marriage: बॉलिवूडची पंगा क्विन अशी ओळख असणारी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. कंगना ही सध्या ‘टिकू वेड्स शेरू’ (Tiku Weds Sheru) या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. कंगनानं या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या कंगना ही सिनेमाचे प्रमोशन करत आहेत. एका मुलाखतीच्या दरम्यान कंगनाने तिच्या वैयक्तिक […]
-
Adipurush च्या रेकॉर्डब्रेक कमाईमागे तुमचाही फायदा होणार! जाणून घ्या गणित…
Adipurush Movie PVR INOX : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे हा चित्रपट रेकॉर्डतोड कमाई करू शकतो. पण आदिपुरूषबरोबर तुम्हाला देखील कमाई […]
-
WTC फायनलमध्ये खेळवलं नाही तरी, कर्णधार रोहितच्या बचावासाठी अश्विन मैदानात
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवामुळे टीम इंडियाचे आयसीसी विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले. अंतिम सामन्यात अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळू शकले नाही, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता आर. अंतिम सामना न खेळण्याची निराशा विसरून अश्विन तामिळनाडू […]
-
उद्धव ठाकरेंसाठी आमचे सर्व दरवाजे बंद; भाजप नेत्याच्या ‘त्या’ ऑफरवर बावनकुळेंचा खुलासा
Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाच्या जाहिरातीवरून सुरू झालेला तणाव काहीसा निवळत असतानाच राजकीय नेत्यांच्या पक्षप्रवेशाच्या ऑफरवरून नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिंदे गटाच्या मंत्र्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना ऑफर दिली तशी काल भाजपच्या मोठ्या नेत्याने उद्धव ठाकरे यांना मैत्रीची ऑफर दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडींवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) […]
-
समान नागरी कायद्यासाठी केंद्राने मागवली मते, 30 दिवसांच्या आत ‘ह्या’ लिंकवर म्हणणे मांडा
Implementation of the Uniform Civil Code : केंद्र सरकारने देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हालचाली गतिमान केल्या आहेत. 22 व्या विधी आयोगाने देशवासीयांसह प्रतिष्ठित धार्मिक संस्थांकडून समान नागरी कायद्यास मूर्त स्वरुप देण्याच्या अनुषंगाने नव्याने मते मागविली आहेत. नागरिकांना म्हणणे सादर करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. यासाठी एक लिंक जारी करण्यात आली असून […]
-
Adipurush Released: ‘आदिपुरुष’वर टीका करणाऱ्या प्रेक्षकाला चाहत्याने धू धू धूतले, Video Viral
Adipurush Released : ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ (Adipurush) सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला. आदिपुरुषबाबत चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ सध्या जोरदार धुमाकूळ घालत आहे. (Adipurush Released) ज्यात दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचे दिसून येत आहे. प्रभासचे चाहते आणि सिनेमा न आवडणारे प्रेक्षक यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. याचे रुपांतर नंतर मारामारीत देखील […]
-
असा मुख्यमंत्री पाहिलाय का? CM शिंदेंचा फडणवीसांशी पुन्हा पंगा
Eknath Shinde and Devendra Fadanvis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजप शिसेना यांच्यात वाद सुरु होता. त्या जाहिरातीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाल्याचे बोलले जात होते. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंबरोबरचे आपले कार्यक्रम रद्द केले होते. पण काल हे दोन्ही नेते एका कार्यक्रमात एकत्र दिसले आणि दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमनं […]
-
भाजप फोडण्यासाठी राष्ट्रवादी तयार! दीड वर्षात करणार आमदारांची घरवापसी
Jayant Patil : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांतून लोक बाहेर जातात पण त्यांना तिकडं करमत नाही. आमच्यातले बरेच आमदार भाजपात गेले आहेत. भारतीय जनता पार्टीचे 105 आमदार आहेत पण तसे पाहिले तर 60 ते 70 आमदारांइतकीच भाजपची ताकद आहे. त्यापेक्षा जास्त नाही. बाकीचे सगळे पळवून आणलेले उधारीवर आणलेले आमदार आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी […]
-
फडणवीस तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला; धाराशिव लोकसभा जागेवर थेट बोलले
Devendra Fadanvis On Dharashiv Loksabha : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज धाराशिवच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी तुळजापूर येथे आई तुळजाभवनीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार राणा जगजितसिंह पाटील, प्रविण दरेकर आदी नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाज देवीच्या दर्शनासाठी आलो असे ते म्हणाले. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन […]
-
कुरघोड्यामुळे राष्ट्रवादी सोडली; बीआरएसमध्ये जाताच शेलारांनी राहुल जगतापांना घेरले !
Ghanshyam Shelar: श्रीगोंद्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार (Ghanshyam Shelar) यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत बीआरएस (BRS) पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचे कारण सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षामध्ये घुसमट होत होती. काही जण पक्षात राहून पक्षाचे नुकसान करत होते. माझ्याविरोधात कुरघोड्या करत होते. पण पक्षामध्ये त्यांनाच महत्त्व […]
-
वर्ध्यात बोगस बियाणांची विक्री करणाऱ्या १० जणांच्या टोळीला अटक, दीड कोटींचे बियाणे जप्त
वर्धा : २३ जून पासून मान्सून (Monsoon) हजेरी लावणार असल्यानं विदर्भात शेतकऱ्यांची सोयाबीन, कपाशीसह विविध बियाणे खरेदीसाठी (Buying seeds) लगबग सुरू झाली. याचाच फायदा घेऊन अनेक बोगस बियाणांची (Bogus seeds) विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार वर्ध्यात उघडकीस आला. वर्ध्यातील बनावट कापूस बियाणे बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी (१४) छापा टाकला. या छाप्यात कारखान्यातून तब्बल १ कोटी […]
-
भाजपच्या जखमेवर पवारांचं मीठ; शिंदे-फडणवीसांनी मिटवलेला वाद पुन्हा उकरला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून विरोधकांची टीका सुरूच आहे. या जाहिरातींवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. शिंदे-फडणवीसांनी जाहिरातीचा वाद मिटवला होता. या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. असे म्हणत शरद […]
-
5 स्टार इमारतीप्रमाणे दिसणारं देशातील पहिलं खासगी विमानतळ तुम्ही पाहिलय का?
-
तीन देशांना जोडणारा गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट, थाई मसाज घ्यायला जाता येणार स्वत:च्या कारने
Kolkata to Bangkok Highway via Myanmar : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतात रस्त्यांचे जाळे तयार केल्यानंतर आता तीन देशांना जोडणारा ड्रीम प्रोजेक्ट पुर्णत्वास येत आहे. येत्या चार वर्षांत भारतातून बँकॉकला बायरोड अर्थात आपल्या खासगी वाहनानेही जाता येणं शक्य होणार आहे. या महामार्गाचं बांधकाम सध्या वेगाने चालू असून येत्या चार वर्षांत हे बांधकाम पूर्ण होणार […]
-
IND vs WI: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात, ‘या’ खेळाडूंचे होणार पुनरागमन
IND vs WI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) 27 जून रोजी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा करणार आहे. टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन कसोटी, तीन वनडे आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना वनडे आणि टी-20 मालिकेत विश्रांती […]
-
महिनाभर आधीच दंगलींचे अंदाज, विरोधकांच्या लॉजिकवर केसरकरांचा संताप
Dipak Kesarkar : राज्यात काही दिवसांपूर्वी दगडफेक आणि दंगलींच्या घटनांनी राज्यातील वातावरण ढवळून निघालं होतं. नगर, अकोला, अमळनेर आण कोल्हापुरात अनेकदा तणवााची स्थिती निर्माण झाली. या घटनांवरून सत्ताधारी विरोधकांत अजूनही आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांकडून केल्या जात असलेल्या टीकेला शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी प्रत्युत्तर दिले. राज्यात ज्यावेळी महाविकास आघाडीचे सरकार […]
-
Adipurush Review : रामायण की सुपरहिरो फिल्म? रामायणातील कथेचा आत्मा हरवलेला सिनेमा
प्रेरणा जंगम Adipurush Review: ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट रामायणावर आधारित असून लहानांपासून मोठ्यांना माहिती असलेली ही पौराणीक कथा रुपेरी पडद्यावर वेगळ्या अंदाजात सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (Adipurush Review) अभिनेता प्रभास श्री रामाची भूमिका साकारतोय. तर क्रिती सनॉन ही सीतेची, सनी सिंह लक्ष्मणच्या भूमिकेत, देवदत्त नागे बजरंगबली हनुमानाच्या भूमिकेत आहे. (Prabhas)रामायण म्हटलं की रामानंद […]
-
अहमदनगर शहरातील पारिजात चौकात दुकानांना आग; अग्निशामक दल घटनास्थळी दाखल
अहमदनगर : नगर शहरातील सावेडी उपनगरात असलेल्या पारिजात चौकात असलेल्या दुकानांना (Shops on fire) आज (शुक्रवारी) दुपारी दीड वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आग लागल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी नगर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला (Fire Department)कळविले. सध्या अग्निशमन विभागाच्या बंबांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. (Shops fire at Parijat Chowk in […]
-
Mumbai News: कपोल विद्यानिधी शाळेत अजान लावल्याने पेटला वाद; शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक, कारवाईची मागणी
Mumbai News : मुंबईमधील कांदिवली भागातील कपोल विद्यानिधी शाळेमध्ये आज सकाळी प्रार्थना झाल्यानंतर अजान (Azan) लावण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. काही पालकांनी यावर आक्षेप घेतला आहे. (kandivali) तसेच शिवसेनेने त्या शाळेविरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सोबतच या शाळेने अशाप्रकारे लाऊड स्पीकर अजान […]
-
ST चा प्रवास आणखी सुखकर होणार; महामंडळाने आणलं तिकीट बुकींगसाठी अॅप
Maharashtra ST : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस म्हणजे एसटी बसने ही राज्यातील सर्वसामान्यांपासून सर्वांचीच प्रवासाची प्रधान्यता असते. एसटीला लालपरी म्हणून देखील ओळखले जातं. गाव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी या तत्वाखाली एसटीने गेली 75 वर्ष राज्यात कार्यरत आहे. तर एसटीच्या संप काळामध्ये राज्यातील जनजीनव विस्कळीत झाल्याचं देखील सर्वांनी अनुभवलं आहे. त्यानंतर आता एसटीने […]
-
आक्रमक भाजप नेत्यांची ‘तलवार’ अचानक म्यान; फडणवीस-बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी
Bjp-Shivsena : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या लोकप्रियतेच्या जाहिरातीवरून भाजप (BJP) आणि शिवसेनेतील (ShivSena) वाद आता शमताना दिसत आहे. आमची जीवाभावाची मैत्री आहे. कोणी किती प्रयत्न केला तरी आमचं बाँडिंग मजबूत आहे. ये फेविकॉल का जोड है टुटेगा नही, असं म्हणतं शिंदे यांनी वादावर पडदा टाकला. तर एखाद्या जाहिरातीने किंवा एखाद्याच्या वक्तव्याने […]
-
जिथं होतं पंडित नेहरुंचं वास्तव्य तिथूनच त्यांचं नाव काढलं; मोदी सरकारच्या निर्णयाने काँग्रेसचा भडका
Modi Government new decision : केंद्र सरकारने काँग्रेसला झटका देणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. राजधानी दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युजियम अँड लायब्ररीचे नाव केंद्र सरकारने बदलले आहे. आता या लायब्ररीला प्राइम मिनिस्टर म्युजियम अँड लायब्ररी या नावाने ओळखले जाईल. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेसने संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, मोदी हे […]
-
मुलीचा भाबडा प्रश्न अन् निरुत्तर बाप… घरातील प्रसंगावरुन सुजय विखे भरसभेत गदगदले
Sujay Vikhe Patil : अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील हे आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. विरोधकांवर बोलताना ते कोणताही हातचा ठेवत नाही, असे बोलले जाते. महाविकास आघाडी सरकार असताना त्यांनी सातत्याने त्या सरकारवर निशाणा साधला होता. पण आपल्या मुलीची आठवण सांगताना सुजय विखे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुजय विखे यांच्यातील कुटुंबवत्सल बाप जागृत […]
-
Devendrs Fadanvis : निर्णय कर्नाटकात, वाद महाराष्ट्रात; फडणवीसांनी टाकली ‘मविआ’ त काडी
Devendrs Fadanvis : कर्नाटकमध्ये हेडगेवार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा धडा पाठ्यपुस्तकांमधून वगळण्यात आला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कॉंग्रेस आणि महाविकास आघाडीसह उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ( Fadanvis Criticizes Congress and Thackrey on Karnataka Remove Savarkars Lesson from Text books ) अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तर माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची […]
-
Gulabrao Patil : विकेट जाण्याची चर्चा अन् पवारांसोबत प्रवास… राजधानी एक्सप्रेस मंत्रिपद वाचविणार?
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेनेची (Shivsena) मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे मंत्रिपद जाण्याची चर्चा आहे. शिंदे सरकारमधील (Shinde Government) 5 मंत्र्यांच्या कामाबद्दल भाजप हायकमांडमध्ये नाराजी असून त्यांचे राजीनामे घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जातं आहे. या 5 मंत्र्यांमध्ये गुलाबराव पाटील यांच्याही नावाचा समावेश असल्याचं सांगितलं जातं आहे. अशात गुलाबराव पाटील आणि […]
-
अजितदादांसाठी मोदी सरकारच उत्तम माध्यम; शिंदे गटाच्या मंत्र्याची खुली ऑफर
Dipak Kesarkar offers Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या मध्यंतरी उठल्या होत्या. त्यानंतर स्वतः अजित पवार माध्यमांसमोर येत मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा थांबल्या होत्या. मात्र, आता पुन्हा राज्य सरकारमधील मंत्र्यांनेच त्यांना ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्याबद्दल मला […]
-
‘अजित पवार हे महाराष्ट्राचे अमिताभ बच्चन’; सुळेंचे केसरकरांना चोख प्रत्युत्तर
Supriya Sule On Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर यांनी अजित पवारांना सरकारमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यावर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन […]
-
Khupte Tithe Gupte: ‘माझं घर जळत होतं, तेवढ्यात बाळासाहेबांचा फोन’; राणेंनी सांगितला ‘तो’ किस्सा
Khupte Tithe Gupte: गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte)चा खुपते तिथे गुप्ते (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमात तिसऱ्या सीझनमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांची एंट्री हिवणार असल्याचे सांगितले जात आहे. हा तिसरा सीझन (Third Season) खूप चर्चेत येणार असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत श्रेयस तळपदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
-
‘आप’ची काँग्रेसला भन्नाट ऑफर! ‘त्या’ निवडणुकीतून माघार घ्या मग, आम्ही सुद्धा…
AAP : दिल्ली आणि पंजाबातील सत्ताधारी आम आदमी पार्टीने (AAP) काँग्रेसला एक खास ऑफर दिली आहे. या ऑफरची देशाच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. कारण, शक्यतो राजकारणात असे कधी होत नाही जे आम आदमी पार्टीने दिलेल्या ऑफरमध्ये दिसून येत आहे. काँग्रेसने (Congress) जर दिल्ली आणि पंजाबात निवडणूक लढण्याचा विचार सोडून दिला तर आप सुद्धा मध्य […]
-
2024 लोकसभेसाठी ओवेसींचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले, हिंदुत्ववादी विचारधारा ही…
Asaduddin Owaisi On Congress : लोकसभा निवडणुकीच्या 2024 संदर्भात, राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणांमधून जातीय अंकगणित मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा लक्षात घेऊन त्यांना सल्ला दिला आहे. यासोबत असदुद्दीन ओवेसी यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीला विष म्हटले. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी ओवेसी यांनी काँग्रेसला सल्ला […]
-
Adipurushच्या शोमध्ये श्रीरामांना भेटायला साक्षात आले हनुमान, Video Viral
Adipurush Released : बहुचर्चित आदिपुरूष हा सिनेमा अखेर आज संपूर्ण देशभरात प्रदर्शित झाला आहे. (Adipurush Released) सिनेमानं रिलीज होण्याअगोदरच कोटींची कमाई केली आहे. आदिपुरूषचा फर्स्ट डे फर्स्ट शो (First day first show) संपूर्ण देशात सुरु झाला. पहिल्याच दिवशी चाहत्यांनी सिनेमाला बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. (Video Viral) थिएटरमध्ये सिनेमाला उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. […]
-
इंदुरीकर महाराजांचे पुढचे किर्तन तुरुंगात? औरंगाबाद उच्च न्यायालयाचा मोठा दणका
औरंगाबाद : प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. PCBNDT (Pre-Conception and Pre-Natal Diagnostic Techniques Act) कायद्यानुसार हा गुन्हा दाखल होणार आहे. संगमनेर सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्धचा खटला रद्द करण्याचा निकाल दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. (Aurangabad Bench of the Bombay […]
-
सुप्रियाताई पहिल्याच दिवशी अॅक्टिव; कार्याध्यक्ष पदाचा चार्ज घेत लोकसभेसाठी खोचला पदर
NCP Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या कार्याध्यक्षा झाल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत पक्षाचा कार्यालयात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यातील महिलांची सुरक्षा ते शिवसेनेची जाहिरात यावरुन त्यांनी सरकारला लक्ष केले. तसेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. याआधी त्यांचे मुंबईतील पक्षाचा कार्यालयात […]
-
Al Pacino : ‘गॉडफादर’ फेम अभिनेता 83 व्या वर्षी झाला बाबा; 29 वर्षीय गर्लफ्रेंडने दिला मुलाला जन्म
Al Pacino Became Father At 83 : हॉलिवूड अभिनेता अल्फ्रेडो जेम्स पचिनो उर्फ अल पचिनो सध्या तो जोरदार चर्चेत आला आहे. (Al Pacino) अभिनेत्याने वयाच्या 83 व्या वर्षी आपल्या चौथ्या मुलाचे स्वागत केले आहे. (Noor Al Fallah) मिळालेल्या माहितीनुसार अल पचिनोची गर्लफ्रेंड नूर अल्फल्लाहने वयाच्या 29 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. अल पचिनोची […]
-
Ajit Pawar मुख्यमंत्री होत नाही तोपर्यंत…’ ‘या’ आमदाराने केली भीष्मप्रतिज्ञा
Ajit Pawar CM : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार राज्याचे मुख्यंमंत्री व्हावे अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी इच्छा आहे. ही इच्छा हे कार्यकर्ते वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त करत असतात. काही दिवसांपूर्वी राज्यात भावी मुख्यमंत्री म्हणून अनेक नेत्यांचे पोस्टर झळकल्याचं पाहायला मिळलं त्यात अजित पवारांचे पोस्टर आघाडीवर होते. तसेच त्यानंतर स्वतः अजितदादांनी देखील मुख्यमंत्री होण्यची इच्छा […]
-
शिर्डीच्या निर्णयाने वादाची ठिणगी! श्रीरामपूर जिल्ह्याची मागणी पुन्हा ऐरणीवर
Ahmednagar Politics : नगर जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यातील चौंडी (ता. जामखेड) येथून जाहीर केला. त्यानंतर जिल्हा विभाजनाच्या चर्चा सुरू झालेल्या असतानाच सरकारने शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयावर श्रीरामपूरमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून शनिवारी (दि.17) श्रीरामपूर बंद ठेवण्यात येणार आहेत. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्या निर्णयाचा […]
-
अभिमानास्पद! नगरसह राज्यातील तीन शाळा जगातील टॉप 10 शाळांच्या यादीत
Worlds Best Schools : जगातील दहा सर्वोत्कृष्ट शाळांमध्ये एकट्या भारतातील पाच शाळांची निवड करण्यात आली आहे. त्यातही अभिमानाची बाब म्हणजे या पाच शाळांपैकी तीन शाळा या महाराष्ट्रातील आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील स्नेहालय संस्थेच्या शाळेचाही यामध्ये समावेश आहे. युकेमध्ये या वर्ल्ड बेस्ट स्कूलचे आयोजन करण्यात आले आहे. पाच कॅटेगरीमध्ये या शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरण […]
-
Adipurush Movie Released : ‘आदिपुरुष’चा ‘फर्स्ट डे फर्स्ट शो’ पाहायला जाताय? तिकिटाची किंमत ऐकून अंगावर येईल काटा
Adipurush Movie Released : अभिनेता प्रभास (Prabhas) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा बहुचर्चित चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. (Adipurush Tickets Price) रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंग एक लाखाहून जास्त तिकीटांची विक्री झाली असल्याची माहिती मिळाली आहे. https://twitter.com/rajeshnair06/status/1669540310765158401?s=20 पहिल्या दिवशी अनेक शो हाऊसफुल्ल चालले आहेत. त्याच वेळी, दिल्ली आणि मुंबईसारख्या […]
-
जाहिरात वाद ते भ्रष्टाचार; अजितदादांच्या गंभीर आरोपांनी शिंदे-फडणवीस घायाळ
Ajit Pawar on Shinde-Fadanvis : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात मोठी घटना म्हणजे राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. त्याचबरोबर राज्यात महिला अत्याचार, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या समस्या, […]
-
Shinde-Fadanvis : ‘एकमेकांकडे पाहायला तयार नव्हते; म्हणे, फेविकॉल का जोड’, राऊतांचा शिंदे-फडणवीसांना टोला
Sanjay Raut on Shinde-Fadanvis : राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे या शिवसेनेकडून मंगळवारी वर्तमानपत्रात देण्यात आलेल्या जाहिरातीवरून झालेला वाद. त्यानंतर शिंदे सेनेने डॅमेज कंट्रोल करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा फोटो असलेली दुसरी जाहिरात दिली. तरी देखील विरोधकांनी मुख्यमंत्री शिंदेंना (Eknath Shinde) टार्गेट करणे सोडलेले नाही. तर दुसरीकडे भाजप कर्यकर्ते आणि नेते यांच्याकडून शिंदेंवर हल्लाबोल सुरू […]
-
Agriculture Raids : मंत्र्यांचेच पीए छापे मारताहेत, अजित पवारांची सत्तारांवर टीका…
राज्यात शेतमालाची साठेबाजी, बोगस बियाण्यांप्रकरणी छापा मारण्यासाठी मंत्र्यांचेच पीए जात असल्याची टीका अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांवर नाव न घेता केलीय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, कृषी विभागाच्या कथित पथकाच्या छापेमारीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलच धारेवर धरलंय. Horoscope Today 16 June: तुमचं करिअर अन् पैशांच्या बाबतीत काय सांगते […]
-
Adipurush Twitter Review: कसा आहे ‘आदिपुरुष’सिनेमा? पहिला शो बघितल्यानंतर प्रभासबद्दल ट्विटर युजर्स म्हणाले…
Adipurush latest update : ओम राऊत दिग्दर्शित (Om Raut) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला आहे. आणि सकाळपासूनच सिनेमागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात रांगा बघायला मिळत आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ सिनेमा अखेर आज (१६ जून ) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. Watched #AdipurushHindi FDFS #ThreeWordReview JAI SHREE RAM⭐⭐⭐⭐ 4/5👍👍Brilliant story, […]
-
Horoscope Today 16 June: तुमचं करिअर अन् पैशांच्या बाबतीत काय सांगते तुमची रास? जाणून घ्या…
Horoscope Today 16 June 2023: आजचे राशीभविष्य, आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष : आज भाग्य तुमच्या सोबत असेल. आर्थिक संकटातून मुक्तता मिळेल. आज लांबचा प्रवासही यशस्वी होऊ शकतो. वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी […]
-
Supriya Sule दिंडीत कशा रमल्या? बघाच!
माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग घेतला.
-
Defence Deal : शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताकडून घातक ड्रोन खरेदी…
Defence Deal : सीमेवर शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रीडेटर MQ-9B रीपर ड्रोन भारत खरेदी करणार असल्याची माहिती समोर आलीय. अमेरिकन कंपनी जनरल अॅटोमिक्सने भारताचा ड्रोन खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून भारत एकूण 30 ड्रोन खरेदी करणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. महाभयंकर ‘बिपरजॉय’ गुजरातच्या विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये धडकणार… भारत-चीन सीमेवर सैनिकांमध्ये कायमच चकमक […]
-
साखर कारखान्याची ‘ती’ अट शिथील होणार? मुख्यमंत्री शिंदेंनी दिले आदेश…
साखर कारखान्याच्या उभारणीसाठी असलेली 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत. कारण 25 किलोमीटर हवाई अंतराची अट शिथील करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आलीय. यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिलीय. 79 मृत्यू, 104 लोक गायब; ग्रीसच्या समुद्रात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला जलसमाधी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली रयत […]
-
महाभयंकर ‘बिपरजॉय’ची गुजरातमधील विध्वंसानंतर आता राजस्थानमध्ये कूच…
Biparjoy Cyclone : अरबी समुद्रातून उठलेले चक्रीवादळ बिपरजॉय गुजरातच्या 940 गावांमधून ताशी 13 किमी वेगाने राजस्थानकडे सरकत आहे. बिपरजॉय चक्रीवादळ अखेर गुजरातमध्ये हजर झालं असून चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार माजवला आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे जवळपास 22 नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. चक्रीवादळ धडकल्यानंतर अनेक झाडे, विजेचे पोल चक्रीवादळामुळे जमीनदोस्त झाली आहेत. गुजरातनंतर आता बिपरजॉय चक्रीवादळाने आता […]
-
79 मृत्यू, 104 लोक गायब; ग्रीसच्या समुद्रात प्रवाशांनी खचाखच भरलेल्या जहाजाला जलसमाधी
Greece Ship Capsized : युरोपातील ग्रीसच्या किनाऱ्याजवळ बुधवारी (१४ जून) रोजी एक जहाज बुडाल्याने 79 जणांचा मृत्यू झाला. मात्र, या अपघातात किमान 100 जणांचा मृत्यू झाल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ही घटना अलीकडच्या काळातील सर्वात धोकादायक बोट अपघातांपैकी एक मानली जाते. बोट बुडाल्यानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. युरोपियन रेस्क्यू हेल्पिंग चॅरिटीच्या मते, […]
-
शिंदे-फडणवीसांचा एकीचा नारा, बोंडेचेही सूर नरमले; म्हणाले, आता फक्त एकच ध्येय…
Anil Bonde : शिंदे गटाने दिलेल्या जाहिरातीवरून जोरदार वाद पेटला आहे. शिंदे गटाचे नेते आणि भाजपात जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल तर भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनू शकत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उद्देशून केली होती. ही टीका शिंदे गटाच्या नेत्यांच्या जिव्हारी […]
-
Cyclone Biparjoy : 200 लाईटचे पोल, 180 झाडं जमीनदोस्त ; बिपरजॉयचा गुजरातमध्ये हाहाकार
Cyclone Biparjoy : महाभयंकर बिपरजॉय (Cyclone Biparjoy) चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार उडवला आहे. यामुळे तेथील नागरिकांच्या ह्रदयामध्ये धडकी भरली आहे. कारण ताशी तब्बल 145 किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ (Saurashtra Kutch region) आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती […]
-
पीक विमा कंपनीकडून बळीराजाची थट्टा, नुकसान भरपाई म्हणून दिले फक्त 173 रुपये
Distribution of crop insurance :गतवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी आणि पूर आला होता. त्यामुळं लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. या पिकांचे पंचनामे सरकारने केले होते. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, या पीक विमा वितरण (Distribution of crop insurance) दरम्यान विमा कंपनीने शेतकऱ्यांची थट्टा […]
-
टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, बुमराह-अय्यर आशिया कपसाठी करणार पुनरागमन?
आशिया कप 2023 ची तारीख जाहीर झाली आहे. 31 ऑगस्टपासून आयोजित करण्यात येणार आहे. या घोषणेसोबतच टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि श्रेयस अय्यर लवकरच मैदानात परतू शकतात. हे दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहेत. एका रिपोर्टनुसार अय्यर आणि बुमराह आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवू शकतात. या […]
-
Jayant Patil : शिंदे-फडणवीस सत्तेसाठी लाचार; 60-70 आमदारांना निवडूण आणण्याइतकीच भाजपी ताकद
Jayant Patil : दोन दिवसांपूर्वी देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात सर्वच वृत्तपत्रांतून प्रसिध्द करण्यात आली. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते आहेत असा दावा करण्यात आला. यावरून दोन्ही पक्षाकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. दरम्यान, आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर […]
-
प्रथमेश लघाटे आणि गायिका मुग्धा वैशंपायन यांचे भावी जीवनाचे सूरही जुळले…
Prathamesh Laghate and Mugdha Vaishampayan : झी मराठी या वाहिनीवरील ‘सा रे ग म प’ लिटल चॅम्प्स या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेले कलाकार म्हणजे प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन होय. या दोन्ही गायक कलाकारांनी आपल्या गायनाच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांवर मोहिनी टाकली आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात देखील त्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करत सोशल मीडियावर आपला फॅन […]
-
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात हाेणार साैर ऊर्जा प्रकल्प
नगर जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 400 एकर परिसरात 100 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहेत. विद्यापीठाचे विद्युत देयके कमी करण्यासाठी महानिर्मितीकडून स्वतंत्रपणे 500 किलाेवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्पही विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पास 472.19 कोटी खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. (rahuri-agricultural-university-solar-power-project) राज्याची विजेची वाढती […]
-
धमकी प्रकरणात कार्यकर्ता मयूर शिंदे यांचे नाव येताच सुनील राऊत म्हणाले…
ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत व त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी सुनील राऊत यांनी धमकीचा बनाव रचला असल्याचे समजते. याप्रकरणी मयूर शिंदे याला अटक करण्यात आली आहे. (When activist Mayur Shinde’s name came up in the threat case, Sunil Raut said…) मयूर शिंदे हा […]
-
Radhakrishna Vikhe : ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांच्या सोयीसाठी, त्यामागे जिल्हा विभाजनाचा विचार नाही’
Radhakrishna Vikhe Patil : अहमनगर जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या सोयीसाठी शिर्डीत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची (Upper Collector Offices) स्थापना करण्यात येणार आहे. या संदर्भातील महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मांडलेल्या प्रस्ताव मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, शिर्डीत हे कार्यालय होणं म्हणजे जिल्ह्याचे विभाजन आणि शिर्डीला नवीन जिल्ह्याचे मुख्यालय करण्याची योजना असल्याची चर्चा […]
-
MPSC चा अंतिम निकाल जाहीर, शेतकऱ्याची मुलगी राज्यात पहिली
MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला.या परीक्षेत बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन म्हात्रे या शेतकऱ्याच्या मुलीने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे […]
-
‘आदिपुरुष’च्या रिलीज आधीच बुकींगचा धमाका; पहिल्याच दिवशी होणार छप्परफाड कमाई
Adipurush Box Office Collection : ‘बाहुबली’ फेम प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा ‘आदिपुरुष’ चित्रपट उद्या म्हणजेच 16 जून रोजी मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे. पण चाहत्यांमध्ये या चित्रपटाची एवढी क्रेझ होती की, रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच त्यांनी त्याची आगाऊ बुकिंग करून घेतली. आता आगाऊ बुकिंगचे आकडेही बाहेर येऊ लागले आहेत. जे पाहून पहिल्याच […]


































































































