- Letsupp »
- latestnews
ताजी बातमी
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान
Sangram Jagtap on Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिलाच आहे. मात्र, […]
-
Devendra Fadnavis : ज्यांचे चार खासदार निवडून येतात, त्यांचा धसका कसा? शरद पवारांच्या टिकेवर फडणवीसांचं खरमरीत उत्तर…
Devendra Fadnavis On Sharad Pawar : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी केलेल्या टिकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी धसका घेतला त्यामुळे माझ्यावर आरोप केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले की, ज्यांच्या नेतृत्वाखाली 305 खासदार निवडून येतात. त्यांनी ज्यांच्या […]
-
महेश मांजरेकरांविरोधात ‘पॉस्को’ अंतर्गत गुन्हा दाखल करा; बालहक्क आयोगाचे आदेश
Mahesh Manjrekar Case: नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने दोन चित्रपट निर्मात्यांविरुद्ध त्यांच्या चित्रपट/ओटीटी मालिकांमध्ये अश्लील दृश्यांमध्ये मुलांचा वापर केल्याबद्दल कायदेशीर कारवाई सुरू करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सुप्रसिद्ध मराठी निर्माते-दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्यावर (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे NCPCR चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितले. कमिशनच्या सदस्यांच्या […]
-
Diamond Hub: विरोधक सरकारला टार्गेट करताहेत, डायमंड हब मुंबईतच होणार; उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं
Uday Samant On Diamond trading center : गुजरातमधील सुरत येथील हिरे व्यापाऱ्यांनी (diamond merchant from Surat) 3400 कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र (Diamond trading center) तयार केलं. त्यामुळे वर्षानुवर्षे मुंबईत असलेला हिऱ्यांचा व्यवसाय आता गुजरातमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया […]
-
Sharad Pawar : पवारांचा मोठा गौप्यस्फोट; ‘इंडिया’ आघाडीत सर्वकाही आलबेल नाही
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या टीकेला शरद पवारांनी (Sharad Pawar) आज (दि. 28) पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, यावेळी त्यांनी मोदींविरोधात मैदानात उतरलेल्या विरोधाकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) सर्वकाही आलबेल नसल्याचा मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढण्यासाठी एकत्रित आलेल्या पक्षांमध्ये सहमती आहे, मात्र विधानसभा निवडणुकीबाबत मतभेद असल्याचे पवारांनी यावेळी […]
-
Gaurav More: मराठी सिनेमाच्या दुरवस्थेबद्दल गौरव मोरेनी व्यक्त केली खंत
Gaurav More On Marathi Movie Audience: मराठी सिनेमाच्या (Marathi Movie) दुरवस्थेला मराठी प्रेक्षकच जबाबदार आहे. इतर प्रादेशिक भाषेत येणारे सिनेमा मात्र सुपरहिट होत असतात. त्या ठिकाणची स्थानिक कलावंत एका रात्रीमध्येच सुपरस्टार होत आहेत. याचे कारण त्या त्या भाषेतील लोक आपल्या भाषेतील सिनेमा आवर्जून पाहत असतात. परंतु मराठी सिनेमा आपलेच मराठी प्रेक्षक पाहत नसल्याने, आज मराठी […]
-
Chhattisgarh Election : केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण, कर्जमाफीही देणार…; राहुल गांधींच्या मोठ्या घोषणा
Chhattisgarh Election 2023: छत्तीसगड विधानसभा निवडणुकीची (Chhattisgarh Assembly Elections) घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांनी आपला निवडणूक प्रचार जोरात सुरू केला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) हेही प्रचारासाठी दोन दिवसांच्या छत्तीसगडला दौऱ्यावर आलेत. शनिवारी एका सभेला संबोधित करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार निशाणा साधला. मोदींनी प्रत्येक बँक खात्यात प्रत्येकी 15 लाख रुपये […]
-
Nana Patole : मोदी जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा उद्योग घेऊनच गेले; पंतप्रधान मोदींवर नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On Pm Narendra Modi : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर गभीर आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात (Maharashtra)आले तेव्हा महाराष्ट्रातले उद्योगच घेऊन गेले, असा थेट आरोप कॉंग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी केला आहे. जळगावमध्ये (Jalgaon)आयोजित पत्रकार परिषदेत नाना पटोले यांनी विविध मुद्द्यांवर आपली […]
-
Maratha Reservation आंदोलकांना तानाजी सावंतांचा चकवा; दुसऱ्या हेलिपॅडवरून पोहचले तुळजापुरात
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलकांनी सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी तर केली आहे. त्यात नेत्यांचे ताफे देखील अडवले […]
-
MPSC Recruitment 2023: एमपीएससी अंतर्गत प्राचार्य, अनुवादक पदांची भरती, या ताऱखेपर्यंत करा अर्ज
MPSC Recruitment 2023 : सध्या अनेकजण चांगल्या नोकरीच्या शोधात आहे. अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्राचार्य/संचालक, अनुवादक मराठी गट-क आणि अनुवादक हिंदी गट-क, सहायक वन सांख्यिकी गट-ब या पदांच्या एकूण 32 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवार भरतीसाठी ऑनलाइन […]
-
Shyamchi Aai Trailer: ‘श्यामची आई’ चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची तुफान पसंती
Shyamchi Aai Trailer: सुजय सुनील डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि खोडकर श्याम व त्याच्या प्रेमळ आईमधील संवादांनी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतलं. (Marathi Movie) ट्रेलर मधून साने गुरुजी त्यांच्या आईच्या संस्कारांमध्ये कसे घडले याचं अगदी मार्मिक चित्रण केल्याचा उत्तम दाखला मिळाला. खोडकर श्याम ते आदर्श साने गुरुजी बनण्यापर्यंतचा हा […]
-
Shambhuraj Desai : मुख्यमंत्र्यांच्या सभेत खुर्च्या कधीच मोकळ्या दिसत नाहीत; शंभुराज देसाईंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
Shambhuraj Desai On Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात खुर्च्या मोकळ्या दिसल्याच्या आरोपावर मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai)यांनी पलटवार केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या सभेची उद्धव ठाकरे यांना कोणीतरी चुकीची माहिती देत आहे. त्यामुळे ठाकरेंनी शिंदे गटाच्या सभेचं सगळं रेकॉर्डिंग पाहावं आणि नंतर असं […]
-
गुजरात हादरलं : फर्निचर व्यापाऱ्याने संपूर्ण कुटुंबच संपवलं; एकाच घरात आढळले सात मृतदेह
सुरत : गुजरातमधील सुरतमध्ये (Surat) एकाच घरात सात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी हा सामुहिक आत्महत्येचा प्रकार असावी, अशी शंक्यता व्यक्त केली जात आहे. फर्निचर व्यावसायिक शांतिलाल सोलंकी, त्यांचे वडील कनुभाई सोलंकी, आई शिलाबेन सोलंकी, पत्नी रीटा सोलंकी आणि मुली काव्या सोलंकी, दीक्षा सोलंकी तर मुलगा कुशल सोलंकी अशी मृतांची नावे आहेत. यातील […]
-
रस्त्यांची साडेआठ हजार कोटींची कामं रखडली, NOC न देण्यासाठी वाहतूक पोलिसांवर दबाव, आदित्य ठाकरेंचे आरोप
Aditya Thackeray : मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि मुंबई महानगरपालिका प्रशासनावर आमदार आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) जोरदार टीका केली आहे. मुंबई (Mumbai) शहरात एकूण साडेआठ हजार कोटी रुपयांची कामे खोळंबली आहेत. ही रस्त्यांची कामे होऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांवर एनओसी न देण्याबाबत सरकारचा दबाव असल्याचा आरोप आमदार आदित्य […]
-
World Cup 2023 : ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच केला ‘हा’ कारनामा
AUS vs NZ : यंदाच्या विश्वचषकात (World Cup 2023) ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. ऑस्ट्रेलियाची टीम पहिला सामना भारताविरुद्ध आणि दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध हरली होती. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार पुनरागमन करत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ऑस्ट्रेलियाने सलग तीन सामने तर जिंकलेच पण आपल्या फलंदाजीची ताकदही दाखवली आहे. सलग तीन सामन्यांत 350 हून […]
-
Madhya Pradesh : नोकरी गेली अन् तिकीटही नाही! चौहान सरकारने केला उपजिल्हाधिकाऱ्याचा गेम
छिंदवाडा : माजी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे (Nisha Bangre) यांना तिकीट देणार नसल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीतमध्ये बांगरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र त्या निवडणूक लढवणार नसल्याचे यावेळी कमलनाथ यांनी जाहीर केले. बांगरे यांनीही यावेळी मला पद आणि पैशाचा लोभ नाही. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत न्याय पोहोचावा […]
-
Video Viral: आदित्य रॉय कपूरसोबत अनन्या पांडेचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; कमेंट्सचा वर्षाव
Ananya Panday And Aditya Roy Kapur Video Viral: बॉलीवूडमध्ये सध्या आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अनन्या पांडे (Ananya Panday ) यांच्या रिलेशनशिपबद्दल चांगलीच जोरदार चर्चा रंगत आहे. स्पेन ट्रिप असो किंवा सिद्धार्थ- कियाराच्या लग्नाचं रिसेप्शन हे दोघेही अनेक सोहळ्यांना एकत्र हजेरी लावत असल्याचे बघायला मिळतात. सध्या आदित्य आणि अनन्याचा मुंबईतील एका पार्टीमधील व्हिडीओ […]
-
Government Schemes : शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ कसा घ्याल?
Government Schemes : आपण आज शेतमाल तारण कर्ज योनजेविषयीची (Agricultural Mortgage Loan Scheme)माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला अशा प्रकारच्या कर्जाचा लाभ घ्यायचा असेल, तर ही माहिती नक्की वाचा. आज आपण या योजनेचे उद्दिष्ट्य काय? कोणत्या शेतमालासाठी कर्ज घेता येईल? त्याची परतफेड कालावधी आणि व्याजदर किती असणार? तसेच लागू अटी व शर्ती कोणत्या असणार आहेत? […]
-
मराठा आंदोलकांचा रविकांत तुपकरांना दणका; लातूरमध्ये बैठक उधळली
Ravikant Tupkar : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवली सराटी येथे आंदोलनाला सुरुवात केल्यानंतर राज्यभरातील मराठा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज लातूरमध्ये (Latur) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रविकांत […]
-
आरक्षण नाही तर उपमुख्यमंत्र्यांना कार्तिकी एकादशीला नो एन्ट्री, पूजेला आल्यास काळे फासू; मराठा समाजाचा इशारा
पंढरपूर : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Vitthal temples of Pandharpur) भाविकांची मांदियाळी असते. दरवर्षी कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, यंदा राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदा शासकीय पूजेचा मान कोणत्या उपमुख्यमंत्र्यांना द्यायचा, असा पेच विठ्ठल मंदिर समितीसमोर निर्माण झाला. अशातच आता कार्तिकी यात्रेची पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते न करता शेतकऱ्याच्या […]
-
Cash For Query : होय, हिरानंदानीला लॉगइन आयडी, पासवर्ड दिला होता; मोईत्रांनी कारणही सांगितलं
Cash For Query : संसदेच्या राजकारणात सध्या तृणमूल खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांचे क्वॅश फॉर क्वेरी (Cash For Query) प्रकरण चांगलेच गाजत आहे. सत्ताधारी भाजपा खासदार या प्रकरणात आक्रमक झालेले असतानाच मोठी माहिती समोर आली आहे. व्यावसायिक दर्शन हिरानंदानी यांना लोकसभा वेबसाइटवरील लॉगइन आयडी आणि पासवर्ड शेअर केल्याचे मोईत्रा यांनी अखेर मान्य केले आहे. […]
-
Chala Hawa Yeu Dya : खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम घेणार प्रेक्षकांचा निरोप?
Chala Hawa Yeu Dya: ‘झी मराठी’ (Zee Marathi) वाहिनीवरील खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya ) गेल्या 9 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन (Entertainment) करत आहे. मराठी मनोरंजन विश्वातील विनोदी हा एक कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने अनेक कलाकारांना चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. भाऊ कदम (Bhau Kadam) ते स्नेहल शिदमपर्यंत अशा सर्वच कलाकार या […]
-
Israel Hamas War : भारताचं मोठं पाऊलं; इस्त्रायल-हमास युद्धविराम नाकारत कॅनडाला दिलं समर्थन
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. या प्रस्तावाला दोन तृतीयांश मत मिळाली आणि तो पारित करण्यात आला. Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना […]
-
Israel Hamas War : …तर सगळं जग आंधळ होईल; UNGA त गैरहजेरी अन् प्रियंकांचा केंद्र सरकारवर निशाणा
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राने जनरल असेब्लीच्या विशेष सत्र बोलावण्यात आले होते. मात्र त्याला भारत गैरहजर राहिला. त्यावरून प्रियंका गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. या सत्रामध्ये शुक्रवारी इस्त्रायलकडून गाझापट्टीवर होणारे प्रतिहल्ले तात्काळ थांबवण्याची मागणी करण्यात आली. प्रियंका गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा… […]
-
‘पुन्हा’ यायचं असल्यास तो व्हिडीओ टाकून येतो का? शिंदेंच आमचे CM! फडणवीसांकडून चर्चांचे खंडन
मुंबई : एकनाथ शिंदे हेच आमचे मुख्यमंत्री आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांच्याच पाठिशी राहणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, असं स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मी पुन्हा येईन” च्या व्हिडीओवर उत्तर दिलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) […]
-
Chandrashekhar Bawankule : ‘युती तोडण्याचं कारस्थान केलं, त्याचंच हे फळ’; बावनकुळेंनी राऊतांना सुनावलं
Chandrashekhar Bawankule replies Sanjay Raut : भाजपने काल देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईनचा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. भाजपने आता हा व्हिडिओ डिलीट केला असला तरी विरोधकांनी त्यावर शिंदे आणि अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही फडणवीस पुन्हा […]
-
भाजपच्या ‘वॉर रुम’मध्येच अंतर्गत वॉर! ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओमागे दोन नेत्यांमधील भांडणं?
मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. याचदरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा झाला. या घडामोडीतच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा […]
-
मोदींची टीका त्यांना झोंबली, आता निवडणुकीत कळेलच! बावनकुळेंचा पवारांना इशारा
Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]
-
Anupam Kher: अनुपम खेर यांनी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याबद्दल व्यक्त केल्या भावना; म्हणाले…
Anupam Kher spoke about Ram Mandir : पुढील वर्षी म्हणजेच 22 जानेवारी 2024 दिवशी अयोध्या येथे होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Lalla Mandir in Ayodhya) उद्घाटनाची सध्या जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Prime Minister Narendra Modi) , उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत […]
-
Malaika Arora: ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मलायका अरोरा थिरकली! Video Viral
Malaika Arora Dance Video Viral: बॉलिवूडमधील 90 च्या दशकातील सध्याच्या घडीला अतिशय लोकप्रिय असणारी अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा (Malaika Arora). एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असे मलायकाचे वयाच्या 47व्या वर्षी सौंदर्य आहे. ती अनेकवेळा फिट राहण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी टीप्स देत असल्याचे बघायला मिळत असते. सध्या सोशल मीडियावर (Social media) मलायकाचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल (Video […]
-
Maratha Reservation साठी ठिकठिकाणी रोष; ‘या’ भाजप आमदाराचा ताफा आडवला
Maratha Reservation : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाची ज्योत आता चांगलीच पेटली आहे. महिनाभरात आरक्षण देऊ असे आश्वासन दिल्यानंतर त्याची पूर्तता न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा उपोषण सुरु केले आहे. दरम्यान मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने मात्र सध्यास्थितीला लोकप्रतिनिधी तसेच पुढारी व नेतेमंडळींनी मात्र चांगलीच कोंडी केली आहे. ‘या’ भाजप आमदाराचा ताफा […]
-
आम्ही अजितदादांसाठी कामाला लागलोय; मंत्रिमंडळातील मोठ्या नेत्यानं दंड थोपटले
Darmababa Atram On Ajit Pawar CM Post : मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनीदेखील डोके वर काढले होते. त्या चर्चांना थोडासा पूर्णविराम मिळत नाही तोच काल (दि. 27) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मी पुन्हा येईल हा व्हिडिओ ट्विट करत राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली होती. मात्र, […]
-
Maratha Reservation : पोटात ना अन्नपाण्याचा कण, सलाईनही नाकारले; चौथ्या दिवशी जरांगेची प्रकृती खालावली
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधला मात्र यावेळी त्यांची प्रकृती काहीशी खालावल्याचं स्पष्ट दिसलं आहे. कारण यावेळी त्यांच्या अंगात त्राण तव्हता तसेच त्यांना बोलताना धाप देखील लागत होती. त्यात जरांगे यांनी अन्नासह पाणी देखील सोडलेले आहे. तर डॉक्टरांनी […]
-
“पंतप्रधान पद प्रतिष्ठेचे, नीट माहिती द्या” : 10 वर्षांच्या कामांचा पाढा वाचत पवारांचा PM मोदींवर पलटवार
मुंबई : पंतप्रधानपद हे प्रतिष्ठेचे पद आहे. त्यामुळे त्यांनी माहिती देताना नीट द्यायला हवी. 2004 ते 2014 मी कृषीमंत्री होतो. मी पदभार घेतला तेव्हा अमेरिकेतून गहू आयात करावा लागत होता. त्यानंतर आम्ही काही निर्णय घेतले. गहू, तांदूळ, सोयाबीन, कापूस यांच्या हमीभावात दुप्पट वाढ केली. 2004 ते 2014 मध्ये अनेक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतले, असे म्हणतं […]
-
Sanjay Raut : ‘फडणवीस पुन्हा येत असतील तर स्वागतच करू’; राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on BJP Viral Video : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, […]
-
अजितदादांना बारामतीतच बंदी! मराठा समाजाच्या प्रचंड विरोधामुळे कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की
बारामती : माळेगांव सहकारी साखर कारखान्याच्या 67 व्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रम उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रद्द केला आहे. “शेतकऱ्यांच्या हाताने गळीत हंगामाचा शुभारंभ करा, अशा सूचना करत त्यांनी या कार्यक्रमासाठी बारामतीला (Baramati) न जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Deputy Chief Minister Ajit Pawar has canceled the tour of Malegaon Cooperative Sugar Factory) राज्यात […]
-
Burglary At Pushkar Shrotri House: मराठी अभिनेत्याच्या घरीच चोरांनी मारला डल्ला
Burglary At Pushkar Shrotri House: मराठी मनोरंजनसृष्टीमधील (Entertainment) लोकप्रिय अभिनेता पुष्कर श्रोत्रीसोबत (Pushkar Shrotri) एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घरात काम करणाऱ्या महिलेनेच चोरी केली आहे. या महिलीने अभिनेताच्या घरातील मोल्यवान वस्तू, दागिने आणि रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. (Pushkar Shrotri House Theft) पुष्करला याविषयी कळताच त्याने पोलिसात (Police) धाव घेतली आहे. View this […]
-
Aditi Rao Hydari च्या बर्थ डे निमित्त पाहूयात तिचा सिल्व्हर स्क्रीन स्पेक्टॅकल प्रवास
-
Sanjay Raut : शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार? मोदी-शहांचं नाव घेत राऊतांचा गौप्यस्फोट!
Sanjay Raut on Eknath Shinde : एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाचे स्थान धुळीस मिळाले आहे. याची सर्व माहिती केंद्राला मिळाली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल. राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयाने त्या पद्धतीने निर्णय दिला आहे तो मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश नरेंद्र मोदी आणि अमित […]
-
अजितदादांच्या आणखी एका आमदाराला पवारांचा धक्का; भाजपमधील थेट माजी मंत्र्यांलाच फोडलं
लातूर : माजी राज्यमंत्री आणि अहमदपूरचे माजी आमदार विनायक जाधव-पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात प्रवेश करणार आहेत. भाजपमध्ये खूप गर्दी झाली आहे, त्यामुळे माझी कुचंबना होत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) राम-राम ठोकला. विनायक पाटील (Vinayak Jadhav-Patil) हे यापूर्वी 1999 आणि 2014 या निवडणुकांमध्ये अपक्ष म्हणून निवडून आले होते. तर 1999 मध्ये […]
-
Kiran Mane: ‘जरांगे पाटलांच्या धैर्याला सलाम’; किरण मानेंची मराठा आरक्षणाबद्दल खास पोस्ट
Kiran Mane On Manoj Jarange Maratha Reservation : अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर (Social media) शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर मराठा आरक्षणाविषयी (Maratha Reservation) एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनं […]
-
Rohit Pawar : पुन्हा येण्याच्या मोहापायी…’बॉम्बे डायमंड बुर्स’ स्थलांतरावरून सुळेंनंतर रोहित पवारांचंही टीकास्त्र
Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबईचा हिरे व्यापार गुजरातला जात असल्याच्या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, पुन्हा येण्याच्या मोहापायी गप्प बसून महाराष्ट्राच्या हिताशी किती तडजोड कराल? अशाप्रकारे तडजोड करून महाराष्ट्राशी गद्दारी करणे योग्य नाही. Ashok Gehlot : ‘देशात कुत्र्यांपेक्षा जास्त ‘ईडी’चा […]
-
Ashok Gehlot : ‘देशात कुत्र्यांपेक्षा जास्त ‘ईडी’चा वावर’; गेहलोतांचे वादग्रस्त वक्तव्य
Ashok Gehlot on ED Raids in Rajasthan : राजस्थानात विधानसभा निवडणुका (Rajasthan Election) जाहीर झाल्यापासून राजकारणाचा पारा वाढला आहे. यंदाची निवडणूक भाजप आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची होणार असल्याचा अंदाज आहे. दोन्ही पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच केंद्रीय तपास यंत्रणांची एन्ट्री झाली आहे. गुरुवारी राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांच्या निवासस्थानी ईडीने छापेमारी केल्यानंतर आता मु्ख्यमंत्री […]
-
Vijay Vadettiwar : पुन्हा येऊ शकत नाही, हे माहिती असल्याने ट्विट डिलिट; वडेट्टीवारांचा टोला
Vijay Vadettiwar : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या ट्विटवरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, पुन्हा येणारं अस ट्विट असेल आणि ते डिलिट केले. तर मी पुन्हा येऊ शकतं नाही. हे माहिती असल्याने केले असावे. असं वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. पुन्हा येऊ शकतं नसल्याने […]
-
Rohit Pawar : ‘तुम्ही मंत्रिपद खेळत राहा, लोकच तुम्हाला’.. रोहित पवारांचा फडणवीसांना इशारा
Rohit Pawar : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल […]
-
Lalu Prasad Yadav Biopic: लालूप्रसाद यादव यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा येणार; प्रकाश झा करणार निर्मिती
Lalu Prasad Yadav Biopic: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चांगल्या लोकांना पराभूत करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांची स्वतःची एक खास शैली आहे. त्यांची विनोदी शैली असो किंवा राजकारणातील हेराफेरी असो, ते प्रत्येक गोष्टीत निष्णात आहेत. (Prakash Jha) लालूप्रसाद यादव यांच्या […]
-
Manoj Jarange चौथ्या दिवशीही उपोषणावर ठाम; विशेष अधिवेशन बोलावण्याची केली मागणी
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडे मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर ओबीसीमधील काही जातींना कशाच्या आधारावर आरक्षण देण्यात आलं आहे? असा सवाल देखील यावेळी जरांगेंनी केलाय. उद्या आंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन… दरम्यान मनोज जरांगे […]
-
Aali Ga Bhaagabai Song: तेजस्विनी पंडितचा जबरदस्त डान्स; ‘आली आली गं भागाबाई’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला’
Aali Ga Bhaagabai Song Release Out: एखाद्या गीताची अनोखी जादू अथवा लोकप्रियता सिनेमाला एक अनोखी ओळख निर्माण करून देत असते. (Marathi Movie) अनेक सिनेमा एखाद्या हिट गाण्यांमुळे ओळखले जात असल्याचे आपल्याला बघायला मिळत असते. असंच एक जोरदार गीत आगामी ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या धमाल सिनेमातून आपल्या भेटीला आलं आहे. […]
-
Mukesh Ambani : मुकेश अंबानींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; ई मेल पाठवत 20 कोटींची मागणी
Mukesh Ambani : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यांच्याकडे वीस कोटी रुपये खंडणीची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी एका अज्ञात व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्या ई […]
-
Singham Again: सिंघम परत येतोय… रोहित शेट्टीच्या ‘सिंघम 3’ची झलक पाहिलीत का?
Singham 3 Movie: बॉलिवूडचा (Bollywood) सुप्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) आता त्याच्या आगामी ‘सिंघम 3’ (Singham 3) या सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागल्याचे बघायला मिळत आहे. View this post on Instagram A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty) या सिनेमाबद्दल सध्या नवीन अपडेट समोर […]
-
Uddhav Thackeray : ‘पंतप्रधान असताना मोदींनी काय केलं?’ ठाकरे गटाचा थेट सवाल
Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन (PM Modi) दिवसांपूर्वी शिर्डीत आले होते. येथे त्यांनी विविध विकासकामांचे उद्घाटन केले. तसेच शेतकरी मेळाव्यात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले होते, महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्याने शेतकऱ्यांच्या नावाने आयुष्यभर फक्त राजकारण केले. ते अनेक […]
-
Eknath Shinde : भाजपाची चाल, शिंदेंचं मौन; ‘त्या’ व्हिडिओवर थेट उत्तर टाळलं
Eknath Shinde on BJP Viral Video : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्षांसमोर आमदार अपात्रता सुनावणी सुरू आहे. या घडामोडीतच प्रदेश भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन, […]
-
Israel Hamas War : गाझा पुन्हा हादरलं! इस्त्रायलकडून तुफान बॉम्बफेक; संपर्कही तुटला
Israel Hamas War : इस्त्रायल हमास यांच्यातील यु्द्ध (Israel Hamas War) अजूनही संपलेलं नाही. हमासचा खात्मा करण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या इस्त्रायलने हल्ले आणखी तीव्र केले आहेत. आता या युद्धाच्या मैदानातून आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. इस्त्रायलने जमिनीवरील लढाई आणखी तीव्र केली असून गाझा पट्टीत (Gaza) तुफान बॉम्बफेक केली जात आहे. येथील संपर्क सेवा […]
-
World Cup 2023 : आफ्रिकेच्या विजयाचा टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानचं काय होणार?
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. त्यामुळे पाकिस्तान उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. आफ्रिकेचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 46. 4 षटकांत 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या एडन […]
-
Horoscope Today: ‘मेष’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
Horoscope Today 28 October 2023 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य (Horoscope). मेष (Aries Horoscope Today): आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करू शकता. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याकडे लक्ष देत नाही, असे […]
-
Animal : लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर-रश्मिकाच्या अॅनिमलचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला
Animal : यावर्षी ‘तू झुटी मैं मक्कर’ ने प्रेक्षकांना खळखळून हसवल्यानंतर रणबीर कपूर (Ranbir Kappor)आता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसून येणार आहे. चित्रपटाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या रणबीरच्या चाहत्यांसाठी याच चित्रपटातील रोमँटिक गाणं‘हुआ मैं’ नंतर आता ‘सतरंगा रे’ गाणं रिलीज करण्यात आलं आहे. लग्नानंतरच्या नौकझौकीची झलक! रणबीर रश्मिकाचं हे गाणं लग्नानंतरच्या नवरा-बायकोमधील छोट्या-छोट्या कुरबुरी दाखवणारं आहे. […]
-
Telangana Assembly Elections : मोहम्मद अझरुद्दीन निवडणुकीच्या मैदानात, कॉंग्रेसकडून दुसरी यादी जाहीर
Telangana Congress Candidate List: केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसापूर्वी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली होती. दरम्यान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी (Telangana Assembly Elections) काँग्रेसने (Congess) शुक्रवारी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनसह 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणाच्या निवडणूकीत कॉंग्रेस आणि बीआरएस (BRS) यांच्या काटे की टक्कर होणार आहे. […]
-
Pak vs SA: रोमहर्षक सामन्यात आफ्रिका एका विकेटने जिंकली ! पाकिस्तानने गाशा गुंडाळला?
World Cup 2023 : वर्ल्डकपमध्ये (World Cup 2023) पाकिस्तान व दक्षिण आफ्रिकेमध्ये रोमहर्षक लढत झाली. त्यात आफ्रिकेने पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा उपांत्यफेरीत दाखल होणे अवघड झाले आहे. आफ्रिकेचा संघ आता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आला आला आहे. चेपॉकच्या खेळपट्टीवर पाकिस्तानचा डाव 46. 4 षटकांत 270 धावांवर आटोपला. प्रत्युत्तर दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमने […]
-
Chitra Vagh : मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागा अन्… चित्रा वाघांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
Chitra Vagh : भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Vagh) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई म्हणत पुन्हा निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळेंच्या राज्यातील उद्योग गुजरातमध्ये गेल्याच्या आरोपांना उत्तर दिले आहे. त्याचबरोबर भाजपच्या कार्यकाळात कसे उद्योग वाढले याचा पाढाचं वाचून दाखवला. मोठ्ठ्या ताई, महाराष्ट्राची माफी मागा अन्… महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई, सुप्रिया […]
-
Devendra Fadnavis video : ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडिओ भाजकडून डिलिट, भाजपने केली सारवासारव
Devendra Fadnavis video : राज्यात काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलण्याच्या चर्चांना वेग आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांची खुर्ची जाणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. अशाचत देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) मी पुन्हा येईन याचा व्हिडिओ भाजपने (BJP) ट्विट केला. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास हा व्हिडिओ ट्वीट करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात आणखी […]
-
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती, मुख्यमंत्र्यांचे ‘दिवाळी गिफ्ट’
CM Eknath Shinde on Anganwadi Helpers : मुंबईः केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीस यांना अंगणवाडीसेविका पदावर पदोन्नती देण्याची शक्यता आहे. मदतनीस यांना पदोन्नती देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील […]
-
MP Elections : भापपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातून ‘या’ दोन नेत्यांचा समावेश
BJP Campaigners List : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Madhya Pradesh Assembly Elections) सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली आहे. आता भाजपने (BJP) आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपने पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह, मंत्री राजनाथ सिंह आणि सीएम योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक बड्या नेत्यांची नावे दिली आहेत. Bharat […]
-
Bharat Jadhav : ‘माझ्यातल्या नटाच्या अस्तित्वासाठी मी…’ भरत जाधव पुन्हा रंगभूमीवर; भुमिकेचीही चर्चा
Bharat Jadhav : भरत जाधव (Bharat Jadhav) हा अभिनेता म्हटलं की, सर्वांनाच त्याच्या विनोदी भूमिका, विनोदी चित्रपट हेच पटकन डोळ्यसमोर येत. मात्र आता याच प्रवाहाच्या विरूद्ध जात अभिनेते भरत जाधव यांनी आपल्यातील नटाच्या अस्तित्वासाठी एक नवा प्रयोग हाती घेतला आहे. कारण भरत जाधव आता पुन्हा एकदा नाटकाकडे वळत आहेत. केवळ नाटक हाच बदल नाही. तर […]
-
देशाच्या डोक्यावर 173 लाख कोटींचं कर्ज, आर्थिक परिस्थितीचं कोबंड…; सुप्रिया सुळेंनी फटकारलं
Supriya Sule On Modi : देशावरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर येण्यापूर्वी देशावर 55 लाख कोटी रुपयांचे कर्ज होते. गेल्या नऊ वर्षांत ते 173 लाख कोटी रुपये झालं. त्यामुळं मोदी सरकारच्या काळात तुमच्या-आमच्या डोक्यावरील कर्जात तीन पटीने वाढ झाली आहे. यावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केंद्र […]
-
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री? भाजपच्या ट्वीटमुळे राज्यात नवा भूकंप ?
Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे राज्याचे पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे संकेत भाजपने दिले आहेत.राज्य भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून तशा आशयाचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईल, असे व्हिडिओचे टायटल आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन– @Dev_Fadnavis pic.twitter.com/ht0cMy4WNt […]
-
मोठी बातमी ! रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा स्थगित
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी युवकाच्या प्रश्नावर युवा संघर्ष यात्रा काढली होती. आता त्यांनी ही यात्रा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झाला आहे. अनेक ठिकाणी आरक्षणासाठी गावबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. दसऱ्याच्या दिवशी […]
-
Ajit Pawar यांनी व्यासपीठावरून उठून… मोदींच्या पवारांवरील टीकेवरून देशमुख भडकले
Ajit Pawar : मोदींना शरद पवारांवर टीका केली. तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) त्याच व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी पवारांवरील त्या टीकेवर कोणतेही उत्तर दिले नाही. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी गुरूवारी 26 ऑक्टोबरला अहमदनगर दौऱ्यावर आले होते. मोदींच्या पवारांवरील टीकेवरून […]
-
Nilesh Rane | निलेश राणे यांची नाराजी दूर; निवृत्तीचा निर्णय 24 तासात मागे : LetsUpp Marathi
माजी खासदार निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय अवघ्या 24 तासात मागे घेतला आहे. निलेश राणे यांच्या निवृत्ती नाट्याची स्टोरी ही वडील आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याच आशीर्वादाने लिहिली असल्याचे बोलले जात आहे. परंतु यामागे नक्की काय राजकीय खेळी आहे? याबद्दलचं लेट्स अप मराठीने घेतलेला आढावा.
-
आरक्षणाचा प्रश्न BJP मुळेच चिघळला, फडणवीसांनी मराठा, धनगर समाजाला फसवलं; पटोलेंची घणाघाती टीका
Nana Patole : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation)मागणीसाठी सरकारच्या नाकीनऊ आणणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. जरागेंनी सरकारला दिलेली ४० मुदत संपली असून अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. त्यामुळं त्यांनी अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण सुरू केलं. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, या सगळ्या घडामोडींवरून […]
-
तेलंगणा जिंकण्यासाठी भाजपचा नवा डाव; अमित शाहांनी केली घोषणा
Amit Shah On Telangana Election : तेलंगणामध्ये भाजपची सत्ता आल्यास दलित नेत्याला मुख्यमंत्री करणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी केली आहे. तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी शुक्रवारी काँग्रेससह बीआरएसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सूर्यापेट येथील आयोजित सभेत अमित शाह बोलत होते. Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी […]
-
ते मुख्यमंत्री होते, मी विरोधी पक्षनेता; शरद पवारांनी अंतुलेंबरोबरच्या संघर्षाची आठवण सांगितली
Sharad Pawar on Antule रायगड : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Raigad District Central Co-Operative Bank) स्थलांतरीत श्रीवर्धन शाखेचा उद्घाटन सोहळा आज झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार अनंत गीते उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोदींनी केलेल्या टीकेला […]
-
Tata group iphone: भारतात आता टाटा ग्रुपही बनवणार iPhone
Tata group iphone: स्मार्टफोन युजर्संमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. यामुळं आयफोन विक्रीचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील लोकसंख्येचा विचार करता भविष्यात आयफोनच्या मार्केटला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेऊन भारतातील प्रसिध्द टाटा समूह (Tata Group) आता अॅपल कंपनीच्या (Apple Company) आयफोनची निर्मिती करणार आहे. Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये; कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला […]
-
Ahmednagar News : 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला 3 वर्षांची शिक्षा
Ahmednagar News : अहमदनगरमधील पाथर्डी तालुक्यात एका 12 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायालयाने 3 वर्ष सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित मुलगी शेतात काम करीत असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या खटल्याचं कामकाज सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले. […]
-
Sunny leone चा केनेडी झळकणार MAMI मध्ये; कान्स, सिडनीमध्येही झाला बोलबाला
Sunny leone : कान्स मिडनाईट स्क्रिनिंगमध्ये प्रीमियर झाल्यापासून सनी लिओनीच्या (Sunny leone) केनेडी या सिनेमाचे देशभरातून कौतुक होत आहे. सिडनी फिल्म फेस्टिव्हल, ( Kennedy Movie) दक्षिण कोरियाचा बुकियन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हल (BIFAN), आणि Neuchatel इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म (NIFFF), दक्षिण आशियाचा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (IFFSA) या यशस्वी स्क्रीनिंगनंतर आता सनीचा चित्रपट केनेडी 29 ऑक्टोबरला प्रतिष्ठित […]
-
पाकिस्तानची टीम 50 षटकेही खेळू शकली नाही, आफ्रिकेसमोर 271 धावांचे आव्हान
World Cup 2023 : चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तान (PAK vs SA) संघ संपूर्ण 50 षटके फलंदाजी करू शकला नाही. मार्को जॅनसेन आणि तबरेझ शम्सी यांच्या घातक गोलंदाजीसमोर पाकिस्तानचा संघ 46.4 षटकांत 270 धावांवर गारद झाला. पाकिस्तानकडून सौद शकीलने 52 आणि कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) 50 धावा केल्या. एकेकाळी पाकिस्तानचा […]
-
Kangana Ranaut: भाजपच्या नेत्यावर भडकली कंगना; म्हणाली, ‘महिला केवळ सेक्ससाठी नसतात, तर..’
Kangana Vs Subramniam Swami : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या अभिनयाबरोबरच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती राजकारणाबद्दलही तिची सडेतोड मत मांडत असते. बऱ्याचदा राजकीय घटनांबाबत देखील ती प्रतिक्रियाही देते. अशात आता कंगनाने खासदार सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांना चांगलेच फटकारले आहे. With a swimsuit picture and sleazy narrative you are suggesting that I have nothing […]
-
Arjun Rampal : आईच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अर्जुन रामपालची भावूक पोस्ट, म्हणाला…
Arjun Rampal : अभिनेता अर्जुन रामपालचं (Arjun Rampal) त्याच्या आईशी खास नातं होतं. त्यामुळे तो नेहमीच आपल्या आईविषयीच्या पोस्ट शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त भावूक पोस्ट शेअर केली आहे. तर गेल्या वेळी त्याने टिचर्स डेच्या निमित्त आईविषयी खास पोस्ट केली होती. अर्जुन रामपालची भावूक पोस्ट… अर्जुनने त्याच्या आईच्या पाचव्या पुण्यतिथी […]
-
जुनी पेन्शन, मोफत लॅपटॉप, 15 लाखांचा विमा… काँग्रेसच्या सात मोठ्या घोषणा
Rajasthan Election 2023 : राजस्थानमधील काँग्रेसचे गेहलोत सरकार विधानसभा निवडणुकीत जनतेला आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही. अनेक घोषणानंतर आता मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणखी नवीन सात आश्वासनांंची घोषणा केली आहे. यामध्ये महाविद्यालयातील प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप/टॅबलेट, 15 लाख रुपयांचा मोफत विमा इत्यादींचा समावेश आहे. एवढेच नाही तर सीएम […]
-
Maratha Reservation : चिखलीकरांनंतर आता दानवेंना दणका; ताफ्यावर बांगड्या फेकण्याचा प्रयत्न
Amabadas Danve : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. दोन दिवसांपासून जरांगेंचं उपोषण सुरु असून राज्यातील मराठा तरुणांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. निळवंडे प्रकल्प; दुष्काळी भाग होणार सुजलाम सुफलाम; 182 गावे ओलिताखाली येणार मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण […]
-
Khakee: तब्बल 20 वर्षांनी येणार ‘खाकी’चा सीक्वल; बिग बींसह दुसऱ्या भागात कोण- कोण झळकणार?
Khakee Movie Sequel: तब्बल 20 वर्षांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा ‘खाकी’ (Khakee Movie) हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. ज्याला चाहत्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. किंग खान म्हणजेच चाहत्यांचा लाडका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘कल हो ना हो’ च्यासोबत प्रदर्शित होऊन देखील या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर (box office) मोठा धमाका केल्याचे सांगितले […]
-
थोरल्या पवारांवर टीका, पण धाकट्या पवारांच्या घोटाळ्याचा उल्लेखही नाही; ठाकरेंची मोदींवर टीका
Uddhav Thackeray raigad speech : काल शिर्डीत विविध विकासकामाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते झालं. या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवाल केला. पण त्यांनी काल सत्तर हजार कोटींचा उल्लेख केला नाही. कारण, मोदींच्या शेजारी काल स्टेजवर कुणीतरी बसलं होतं, अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे […]
-
Martha Reservation : मोदी-शाहंकडून ठेंगा! मराठा आरक्षण प्रश्नात लक्ष घालण्यास केंद्राचा नकार?
Martha Reservation : राज्यात मराठा आरक्षणाचा (Martha Reservation) प्रश्न चिघळला आहे. त्यात गुरूवारी पंतप्रधान मोदी राज्यात येऊन गेले. मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यावर देखील जरांगेंसह विरोधकांनी निशाणा साधला. त्यानंतर आता मराठा आरक्षण प्रश्नी तूर्तास हस्तक्षेप टाळत केंद्राने अंग काढून घेतल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्राचा तूर्तास हस्तक्षेप नाही… एका वृत्तपत्राच्या […]
-
‘दिवाळी आलीयं, आमच्या बाबांना पाठवा, वाट पाहतोयं’; आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या लेकीचं CM शिंदेंना पत्र
Hingoli Farmers Suicide News : डोक्यावर कर्जाचा भार, काळ्या मातीतून पीकं येईना, कुटुंबाच्या खळगीचा प्रश्न, या समस्यांना कंटाळून एका कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांने आपलं जीवन संपवलं. शेतकऱ्याने जगाचा निरोप घेतल्यानंतर लेकीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांना भावनिक पत्राद्वारे थेट देवाघरचा नंबर मागून बांबांना परत पाठवण्याची विनवणी केली आहे. सध्या या शेतकऱ्याच्या लेकीचं पत्र सोशल मीडियावर […]
-
Mukhtar Ansari Case: मुख्तार अन्सारीला 10 वर्षांची शिक्षा, गाझीपूरच्या न्यायालयाने दिला निकाल
Mukhtar Ansari 10 Year Jail: मुख्तार अन्सारी याला गँगस्टर अॅक्ट प्रकरणात (Mukhtar Ansari Case) न्यायालयाने 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच मुख्तार अन्सारीला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात सोनू यादवला देखील 5 वर्षांची शिक्षा आणि 2 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. गाझीपूर न्यायालयाने (Ghazipur Court) माफिया आणि माजी आमदार मुख्तार अन्सारी […]
-
Sachin Tendulkar : वानखेडेवर पुन्हा अवतरणार क्रिकेटचा देव; नगरच्या कांबळेंनी कसा साकारला पुतळा? वाचा…
प्रविण सुरवसे,प्रतिनिधी. Sachin Tendulkar : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या देशात क्रिकेटचे महायुद्ध रंगले आहे म्हणजेच क्रिकेट वर्ल्डकप सुरु आहे. यातच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा पूर्णाकृती पुतळा हा लवकरच मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर बसविण्यात येणार आहे. विशेष बाब म्हणजे सचिनचा हा पुतळा अहमदनगरचे प्रसिद्ध शिल्पकार […]
-
…तर आम्हाला मराठा मुख्यमंत्री नको, सीएम शिंदेंविरोधात त्यांचाच पदाधिकारी आक्रमक
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला. अनेक गावांत राजकीय नेत्यांना बंदी करण्यात आली. मात्र, मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केलं. या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. कल्याणमध्येही मराठी क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे. या […]
-
Pollution मुळे हवेतील ऑक्सिजन घटतोय, ही लक्षण दिसताच घ्या डॉक्टरांचा सल्ला
Pollution : सध्या देशभरात थंडीचा चाहूल लागली आहे. मात्र त्याबरोबर प्रदुषणाचा (Pollution) त्रास देखील सुरू झाला आहे. त्यात राज्यातील मुंबई आणि पुणे ही शहरं प्रदुषित हवेसाठी सर्वोच्च स्थानावर आहेत. त्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होत आहेत. त्यात अस्थमा, श्वसनाचे आजार सर्दी खोकला आणि अॅलर्जी यांसारख्या आजारांनी डोकेवर काढले आहे. Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित […]
-
Video : शरद पवार मोदींच्या टीकेला देणार प्रत्युत्तर; भात्यातून कोणता बाण काढणार?
अलिबाग : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि. 26) शिर्डी दौऱ्यामध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. ही टीका करताना पवारांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील मंचावर उपस्थित होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींच्या पवारांवरील टीकेनंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांकडून टीकेची राळ उठवली जात असतानाचा आता खुद्द […]
-
Ambadas Danve : विरोधकांच्या दबावामुळेच ललित पाटील प्रकरणाचा तपास; दानवेंनी स्पष्टच सांगितलं
Ambadas Danve : विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी आज पुण्यातील ससून रुग्णालयास भेट दिली. येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. या प्रकरणात राज्य सरकारकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या समित्या या तोंडदेखल्या आणि बोलघेवड्या आहेत. या समित्या काही करु शकणार नाहीत. […]
-
गृहमंत्री आता तरी कारवाई करतील का? ललित पाटील प्रकरणात अंधारेंचा मोठा पुरावा…
Sushma Andhare On Lalit Patil Case : गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करांचं प्रकरण चांगलचं चर्चेत आलं आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्ज तस्कर ललित पाटील(Lalit Patil Case) याने उपचार सुरु असतानाच धूम ठोकल्याचं समोर आलं होतं. त्यावरुन राज्यभरात वादंग पेटलं होतं. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी आता आणखी एक पुरावा दिला आहे. […]
-
ललित पाटील प्रकरणात माजी महापौर विनायक पांडेची होणार चौकशी, गुन्हे शाखेने पाठवली नोटीस
Vinayak Pandey : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट प्रकरणात एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता या प्रकरणात नाशिकच्या माजी महापौरांचे नाव समोर आलं. नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून दादा भुसे यांचे नाव घेतले जात असतानाच ठाकरे गटाचे माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pandey) अडचणीत आले आहेत. त्यांना पोलीस आयुक्तांनी (Nashik Commissioner of Police) चौकशीसाठी […]
-
Maruti Suzuki Q2 Result: सुझुकी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी; नफ्यात 80 तर महसुलात 24 टक्के वाढ
Maruti Suzuki Q2 Result: शेअर बाजारात निकालांचा हंगाम सुरू आहे. यामध्ये देशातील आघाडीची ऑटो कंपनी मारुती सुझुकीनेही (MARUTI SUZUKI ) सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. (Maruti Suzuki India) कंपनीने 3720 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो एका वर्षापूर्वी याच तिमाहीत 2062 कोटी रुपये होता. याचा अर्थ वार्षिक आधारावर नफा 80 टक्के वाढला आहे. (AUTO […]
-
‘सरकारने विश्वास दिला होता, जरांगेंचा दोष नाही’; शरद पवारांनी उपोषणावर मौन सोडलं
Sharad Pawar Speak On Maratha Reservation : मनोज जरांगे(Manoj Jarange) यांना सरकारने विश्वास दिला होता, त्यामुळे आता मनोज जरांगे यांना दोष देता येणार नसल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी मौन सोडलं आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी याआधी आमरण उपोषण केलं, तेव्हा शरद पवारांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला होता. आता पुन्हा एकदा जरांगे […]
-
BHEL मध्ये सुपरवायझर ट्रेनी ७५ पदाच्या जागांसाठी भरती सुरू, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
BHEL Recruitment 2023 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये नोकरीची उत्तम संधी उपलब्ध आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) यांनी सुपरवायझर ट्रेनी पदांच्या 75 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. सदर भरतीच्या माध्यमातून एकूण 75 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची […]
-
‘फक्त एका गोष्टीमुळे जयंत पाटील आमच्यासोबत आले नाहीत’; मुश्रीफांकडे नेमकं कोणतं सिक्रेट?
Hasan Mushrif on Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अनेक आमदार, पदाधिकारी अजित पवार यांच्यासोबत गेले. निवडणुका जवळ येत आहेत तसे फोडाफोडीचे राजकारणही सुरू झाले आहेत. या काळात शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटाबरोबर जातील अशी चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत असून अजित पवारांच्या गटातील नेत्यांकडूनही त्यास हवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आताही […]
-
Ritabhari Chakraborty: रिताभरी चक्रवर्तीची ‘नंदिनी’ आता ओटीटीवर प्रदर्शित
Ritabhari Chakraborty Debut OTT: अभिनेत्री रिताभरी चक्रवर्तीच्या (Ritabhari Chakraborty) ‘नंदिनी’ (Nandini) या नवीन वेब सीरिजने (Web series) स्ट्रीमिंग जगात तुफान गाजवल आहे आणि तिची कामगिरी यात नक्कीच उल्लेखनीय ठरली आहे. सामाजिक समस्यांचे प्रभावी चित्रण आणि रिताभरीच्या आकर्षक अभिनयासाठी या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता रिताभरी चक्रवर्तीची (Ritabhari Chakraborty)’नंदिनी’ आता ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आली आहे. […]


































































































